

महाराष्ट्र सरकारने वीजपुरवठ्याबाबत मोठं पाऊल उचललं आहे. राज्य सरकार आणि अदानी पॉवर यांच्यात वीजपुरवठ्याविषयी महत्त्वपूर्ण करार करण्यात आला आहे. महाराष्ट्राला अदानी पॉवरकडून तब्बल 2 हजार 500 मेगावॅट वीजपुरवठा करण्यात येणार आहे. पुढील 25 वर्षांसाठी अदानी पॉवर राज्यात वीजपुरवठा करणार आहे.
महायुतीच्या उमेदवार म्हणून बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार याच अधिकृत उमेदवार असणार आहेत. त्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी सुरू आहे.निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. सुनेत्रा पवार या प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता दिल्लीवरुन मुंबईत दाखल झाल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आता देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे.
वाशिम जिल्ह्याच्या रिसोडमध्ये एसआयआर मॅपिंग करणाऱ्या बीएलओवर तिघांना हल्ल्याची केल्याची घटना घडली आहे. नवनाथ मुंढे असे बेदम मारहाण झालेल्या बीएलओचे नाव आहे. ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. मुंढे यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे.
पुण्यात झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते, त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली. महापौर मंजुषा नागपुरे यांनी कालच पाहणी केली होती. त्यानंतर आज महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठकही त्यांनी घेतली. पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी आहे, अशी कबुली महापौर नागपुरे यांनी दिली. नव्या धोरणानुसार पाणी वाहून नेणारी मोठी गटारे बांधण्याच्या उद्देशाने काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. महापालिका प्रशासनाकडून काही ठिकाणी दुर्लक्ष होऊ शकतं, असं आम्ही मान्य करतो, असे आयुक्त नवलकिशोर राम यांनी म्हटले आहे.
सांगली जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या सभापती निवडीतील विजयाने माजी मंत्री जयंतराव पाटील यांना आसुरी आनंद झाला आहे. गोपीचंद पडळकरच्या विरोधात मी सभापती करतोय, जयंत पाटलांना वाटतंय की, राज्यपाल करतो की आमदार करतोय, असं फील जयंत पाटलांना यायला लागलं आहे. मी काय असाच पुढारी झालो नाही, अनेक ठोसं देत मी इथपर्यंत आलो आहे. आणखी ठोसं देण्याची संधी मला मिळाली आहे, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला.
अदानी पॉवरसोबत महाराष्ट्र सरकारने दोन हजार 500 मेगावॉट वीज पुरवठ्याचा करार केला आहे. राज्यातील वाढत्या वीजपुरवठ्याची मागणीची पूर्तता करण्यासाठी हा करार झाल्याचे पुढे येत आहे. अदानी पॉवर पुढची 25 वर्षे राज्याला वीजपुरवठा करणार असल्याची माहिती आहे.
माढा तालुक्यातील अंजनगाव येथील खेलोबा मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सलग तिसऱ्या दिवशी गावात तणावाची परिस्थिती जैसे थे आहे.
भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही. या निवडणुकीसाठी भाजपने शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली. तर आता त्यांच्या विरोधात माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काँग्रेस पक्षाने देखील राहुरीची निवडणूक लढवण्याचे संकेत दिले दिले आहेत.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सामाजिक कार्यकर्त्या संगीता तिवारी यांनी दावा केला आहे की, खरातकडे जाणाऱ्या महिला अडाणी नसून श्रीमंत, हायफाय आणि पेजथ्रीवाल्या आहेत. घरात आधार न मिळाल्याने, कौटुंबिक अडचणींमुळे त्या फसतात. खरात त्यांच्या भावनांचा फायदा घेऊन, त्यांना आकर्षित करत असे.
मुंबईतील महापालिकेच्या शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव शिवसेना ठाकरे सेना पक्षाच्या नगरसेविका आणि गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. किशोरी पेडणेकरांच्या या प्रस्तावाचे मनसेनं स्वागत केलं आहे. मात्र, एमआयएमने या प्रस्तावास विरोध दर्शवल्याने आता वेगळाच वाद निर्माण झाला आहे. त्यातच, मनाचे श्लोक संदर्भाने माहिती देताना किशोरी पेडणेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उदाहरण दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणी त्यांच्यावर मनाचे श्लोकचा परिणाम होता, असेही पेडणेकर यांनी म्हटलं.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपल्याला एका अज्ञात व्यक्तीने अशोक खरातचा हा सीडीआर पाठवला असल्याचा दावा केला आहे. यावरून अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे. मागील वर्षभरात रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातला तब्बल 177 वेळा कॉल केला आहे. अशोक खरातची मुलगी तृप्तबाला खरात हिच्यानंतर सर्वाधिक कॉल हे रुपाली चाकणकर यांनी केल्याचं सीडीआरमधून स्पष्ट होत आहे. दोघांमध्ये तब्बल 33,727 सेकंद बोलणं झाल्याचा दावा दमानिया यांनी केला आहे. हेच मिनिटांमध्ये सांगायचं झालं, तर रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांनी मागील वर्षभरात तब्बल 9 तास 36 मिनिटं एकमेकांशी संवाद केला आहे. रुपाली चाकणकर यांच्या बहिणीने देखील अशोक खरातला तब्बल 236 वेळा कॉल केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात गॅस सिलिंडर वितरण व्यवस्थेत अचानक निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि नव्या नियमांमुळे मोठा गोंधळ उडाला. सिलिंडर मिळत नसल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर जोरदार निदर्शने करत भुसावळ-छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प होऊन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.भारत गॅस कंपनीने अलीकडेच सिलिंडर वितरणाबाबत नवीन धोरण लागू केले आहे.
सोलापूरच्या अंजनगावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू असलेल्या वादा प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. रात्रीच्या वेळी पुतळा बसवण्याची गरज काय? असा सवाल करत सुरुवाती छत्रपती शिवाजी महाराज ही आमची अस्मिता आहे. त्यांच्या पुतळ्याला आमचा विरोध नाही. पण त्या ठिकाणी ज्या पद्धतीने जातीवाद केला जात आहे. त्याला विरोध असून यामध्ये राजकारण केलं जात आहे, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. खिळोबा देवस्थानच्या आवारात पुतळा बसवणे कदापि सहन केले जाणार नाही. अन्य जागेत बसवावे, आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात जवाबदारी माझ्यावर द्या,वाजता गाजत पुतळा बसवतो, असेही आमदार पडळकर यांनी म्हटलं.
जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने केळीसह इतर शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मात्र सरकार आणि स्थानिक मंत्री, आमदार केवळ राजकारणात मग्न आहेत, अशी खरपूस टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावरही हल्ला चढवला. शेतकऱ्यांवर संकट आल्यावर ‘संकटमोचक’ कुठे असतात? असा बोचरा सवाल राऊत यांनी केला.
भारतीय नौदलाची किनारपट्टीलगत गस्त करणारी आयएनएस सुनयना ही नौका ‘IOS सागर’ अर्थात इंडियन ओशन शिप सागर मोहिमेसाठी मुंबईतून रवाना झाली. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या उपस्थितीत या जहाजाला हिरवा झेंडा दाखवला. या मोहिमेत भारतासह 16 मित्र देशांच्या नौदल कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. 16 ते 29 मार्च 2026 या कालावधीत बंदर टप्पा पूर्ण केल्यानंतर, आता 2 एप्रिल ते 20 मे 2026 दरम्यान ही मोहीम दक्षिण-पूर्व हिंद महासागर क्षेत्रात सुरू राहणार आहे. या प्रवासादरम्यान ‘IOS सागर’ श्रीलंकेतील कोलंबो, थायलंडमधील फुकेत, इंडोनेशियातील जकार्ता, सिंगापूर, बांग्लादेशातील चित्तगाव, म्यानमारमधील यांगून तसेच माले आणि मालदीव येथील बंदरांना भेट देणार असून, भारतातील कोची येथे या मोहिमेची सांगता होणार आहे.
अशोक खरातचं ज्यावेळी लग्न झालं, त्यावेळेपासून कल्पनाच्या घराची परिस्थिती हलाखीची होती. सुरुवातीला अशोक खरातचे वय जास्त असल्याने या लग्नाला घरातूनच विरोध होता. अशोक खरातच्या लग्नाला एका भावाचाही विरोध होता. मात्र नंतर हे लग्न कसं जमलं ते कोणालाच माहीत नाही. परंतु 1992-93 साल दरम्यान अशोक खरातचं लग्न झालं. मी देखील त्या लग्नात होतो. यावेळी हळद लावताना अंगावरचे कपडे काढायला अशोक खरातने नकार दिला. मात्र सगळ्यांनी सांगितल्यावर कपडे काढले, त्यावेळेस अशोक खरातच्या अंगावर वार झाल्याचे दिसून आले, अशी माहिती एका ग्रामस्थाने दिली.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस António Guterres यांनी पश्चिम आशियातील चालू संघर्षावर शांततामय तोडगा काढण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, हे महाभयंकर युद्ध मनुष्यहानी आणि आर्थिक विनाश घडवू शकते, त्यामुळे आत्ता थांबवणे आवश्यक आहे. गुटेरस यांनी अमेरिका आणि इस्रायल यांच्याही युध्द थांबवण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. तसेच, इराणने आपल्या शेजारी देशांवरील हल्ले थांबवावे, असेही त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण गाजत असतानाच अंधश्रध्दा निर्मूलन परिषदेकडून राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिकमध्येच सुरू असलेल्या या परिषदेमध्ये अंनिसने अशोक खरातविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यभरातून ३०० हून अधिक प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.
माढ्यातील अंजनगाव खेलोबातील तणाव दूर करण्यासाठी माजी आमदार राजन पाटलांकडून बैठक घेतली जात आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेवरून मराठा आणि धनगर समाज आक्रमक झाला आहे. दोन्ही समाजातील काही प्रतिनिधींसोबत पाटील बैठक घेत आहेत.
मुंबईतील मालाडच्या मालवणी परिसरात एका गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांची लांबच लांब रांग लागली होती. यादरम्यान संतापलेल्या नागरिकांनी एजन्सीच्या मालकाला धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे काहीकाळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
इराण युध्दाचा मोठा फटका बसू लागला असून परभणीतील सातही सीएनजी पंप आज बंद आहेत. त्यामुळे रिक्षाचालकांचे हाल सुरू झाले आहेत. सीएनजी मिळत नसल्याने रिक्षाचालकांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आगामी पोट निवडणुकां संदर्भात प्रश्न विचारला असता खासदर संजय राऊत म्हणाले, "आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला पुढे जाणार आहोत. राहुरीच्या जागेवर राष्ट्रवादीचा अधिकार आहे. पण ज्याची ताकद असेल ते लढवतील. बारामतीमध्ये अजित पवारांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांचा पक्ष निवडणूक लढवणार नाही. पण राहुरीमधून आम्ही लढावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा असून भाजपला फायदा होईल अशी भूमिका घ्यायची नाही ही उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे."
एसआयटी पथक कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी सिन्नर मधील पाडळी येथे तिच्या माहेरी गेलं होचं. यावेळी माहेरच्या लोकांनी जवळपास 16 वर्षापासून कल्पना त्यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं आहे.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात मागील पाच महिन्यांपासून कारागृहात असलेल्या बडतर्फ PSI गोपाळ बदने याला अखेर जामीन मंजूर झाला आहे.
आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांना त्यांच्या पक्षाने राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर राघव चड्ढा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी आतापर्यंत राज्यसभेत उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे.
बारामती आणि राहुरी विधानसभा पोटनिवडणुका लढवण्याला काँग्रेस पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे.
पुण्याला काल वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढलं. या पावसामुळे पुणेकरांना चक्क पाण्याखाली गेलेल्या रस्ताने प्रवास करावा लागला. अनेकांना या अवकाळी पावसाचा मनस्ताप सहन करावा लागला. अशातच आता कालचा हा मुसळधार पाऊस पुण्यात तब्बल 130 वर्षांनी पडल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात 130 वर्षानंतर एप्रिल महिन्यातील एका दिवसात झालेला सर्वाधिक पाऊस आहे. यापूर्वी 1896 मध्ये 51.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर काल पुण्याच 65 मिलिमीटर पावसाची नोंद झालीय आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १६ एप्रिलपासून तीन दिवसांसाठी पुन्हा सुरू होणार आहे. त्यावेळी लोकसभेच्या जागांची संख्या 543 वरून 816 करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर करून घेण्याचा आणि महिलांच्या राखीव जागांचा कायदा लवकरात लवकर लागू करण्याचा प्रयत्न असणार आहे. १६ ते १८ एप्रिल यादरम्यान अधिवेशन होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.