Maharashtra Political Updates : दिवसभरात काय राजकीय घडामोडी घडल्या? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज शनिवार, दिनांक 7 मार्च 2026 रोजीच्या राज्यासह देश आणि जगभरातील विविध राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

जीएसटी १ कोटी लाच प्रकरण : एक सहायक, दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी

नाशिक जीएसटी अधिकारी १ कोटी लाच प्रकरणी एक सहायक आणि दोन उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना 9 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. मुंबईच्या एसीबी पथकाने काल जीएसटी अधिकाऱ्यांना 20 लाखांची लाच घेताना अटक केली होती. मुंबई एसीबीचे पथक पुन्हा जीएसटी विभागात येऊन चौकशी करत आहे. एका बांधकाम व्यावसायिकाविरोधात कारवाईचा तपास पूर्ण करण्याच्या मोबदल्यात लाच मागितली होती.

अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीनं धरणे आंदोलन

भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्याच्या भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकारकडून दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. याच पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख कर्मचारी कृती समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन सुरू आहे.

मुंबईत लोकल रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट,रविवारी दोन मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबईत लोकल रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता.8 मार्च) रेल्वेच्या दोन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असला, तरीही त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार,CM फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना कोणत्याही बँकेचा शेतकरी कर्जदार असला, तरीही त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी राष्ट्रीयकृत बँक,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे थकीत कर्ज सरकार माफ करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांचा सवाल

राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या नीरा-कऱ्हा उपसा सिंचन प्रकल्पाची घोषणा केली आहे. तथापि या योजनेसाठी निधीची तरतूद मात्र केली नाही. अर्थसंकल्पात तशी तरतूदच दिसत नाही, असे सांगत ही केवळ घोषणाच असल्याचे सिद्ध होत आहे, असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून हा प्रकल्प नेमका कधी व कसा पुर्ण करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Congress News : बुलढाण्यातील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार श्वेता महाले यांच्या उपस्थित पार पडला. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू सवडतकर, काँग्रेसचे नेते गुलाबराव सपकाळ, काँग्रेसचे चिखली शहराध्यक्ष राहुल सवडतकर, चिखली पंचायत समितीचे माजी सभापती अरविंद देशमुख, किसान काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद पालवे, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष अमोल काकडे, शेलोडीचे माजी सरपंच दिलीप नरवाडे, शिवव्याख्याते संतोष गवारे पाटील, विशाल सवडतकर, प्रदीप सवडतकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

Mumbai News फेरीवाल्यांची दादागिरी, बीएमसी पथकावर फेरीवाल्यांकडून हल्ला

कारवाईसाठी गेलेल्या बीएमसी पथकावर फेरीवाल्यांकडून हल्ला झाला. कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरात हा प्रकार घडला. बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या दादागिरीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. समता नगर पोलिस स्टेशनमध्ये फेरीवाल्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांची तत्काळ कारवाई करुन 3 फेरीवाल्यांना अटक केली आहे.

Rahul Gandhi  : आसाममध्ये काँग्रेसचा हटके प्रचार! व्हिडीओ व्हायरल

आसाम मध्ये कॉंग्रेसकडून प्रचाराचा हटके फंडा समोर आला आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी राहुल गांधी व गौरव गोगाईंचा ai व्हिडीओ प्रचारासाठी वापरला आहे. दोघांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Iran-USA Tension Escalates इराणच्या 30हून अधिक युद्धनौका बुडवल्याचा दावा 

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव टोकाला पोहोचलाय. अमेरिकेने 'USS जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश' ही तिसरी विमानवाहू युद्धनौका मध्य पूर्व भागात तैनात केलीय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला शरणागती पत्करण्याचा इशारा देत इराणची लष्करी ताकद नष्ट करण्याचे संकेत दिलेत..यानंतर अमेरिकन नौदलाने तिसऱ्या विमानवाहू युद्धनौकेचा ताफा इराणच्या दिशेने रवाना केला आहे.

मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोगसह 88 ग्रामपंचायतच्या निवडणूका होणार

बीड जिल्ह्यात राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापणार असून दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोगसह जिल्ह्यातील तब्बल 88 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूका लागणार आहेत. सदस्य आणि थेट सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी या निवडणुका होणार असून प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून पोटनिवडणुकांच्या राज्य निवडणूक विभागाच्या घोषणेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

केडीएमच्या उद्धव सेनेच्या 'त्या' तीन नगरसेवकांला पक्षाचा अंतिम इशारा

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीत उद्धव सेनेकडून निवडून आलेल्या त्या तीन नगरसेवक कोणत्याही गटा सामील झालेले नसल्याने त्या नगरसेवकांचे सदस्य पद रद्द करण्याची प्रक्रिया कोकण विभागीय आयुक्तांनी करावी. याबाबतचा खुलासा येत्या ४८ तासात संबंधित नगरसेवकांनी पक्षाकडे करावा अन्यथा त्यांचे पद रद्द करण्याची ही अंतिम नोटिस पक्षाकडूने देण्यात आल्याच्या पक्षाच्या जिल्हा प्रमुखांकडून सांगण्यात आले आहे.

काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हा उपाध्यक्षांचा राजीनामा

अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. महापालिकेत स्वीकृत नगरसेवक पदाची संधी न दिल्यामुळे नाराज झालेल्या रावदेल यांनी राजीनामा दिला. रावदेव हे अकोल्यातील काँग्रेसचे जुने, निष्ठावंत आणि वैचारिक फळीतील प्रमुख नेते समजले जातात.

इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केल्याने तरुणाला मारहाण

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील एक तरुणाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर ‘द पिताश्री ऑफ ऑल इस्लामीक पातशहा’ अशा आशयाची पोस्ट टाकली होती. ज्यामुळे मुस्लिम समुदायाच्या ८ ते ९ जणांनी या तरुणाला मारहाण केल्याची घटना काल रात्री घडली आहे. ज्यामुळे राणीसावरगाव येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पीडित तरुणाच्या फिर्यादीवरून जवळपास ९ जनावर पिंपळदरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अन्यायाची भावना : वैभव नाईक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. आंबा काजू बागायतदारांनी कर्ज घेतल मात्र हे शेतकरी त्या कर्जमाफीत बसत नाहीत. खावटी कर्जासाठी एकही रूपयांची तरतूद नाही. तसेच सिंधुरत्न योजनेसाठी मुदतवाढ दिली मात्र एकही रूपयांची तरतूद केली नाही त्यामुळे राज्य सरकारने सिंधुदुर्ग जिल्ह्यावर या अर्थसंकल्पात अन्याय केल्याची भावना नक्कीच राहील अशी टीका वैभव नाईक यांनी केली आहे.

कमर्शियल गॅस सिलिंडरचे वितरण बंद; हॉस्पिटलचं काय? वितरकांचा सवाल

अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाच्या झळा भारताला बसत असून घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी महागला आहे. तसेच व्यासायिक गॅस सिलिंडर वितरणाला केंद्राने मज्जाव केला आहे. त्यामुळे रूग्णालयांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वितरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. रूग्णालयांमध्ये सिलेंडर द्यायचे की नाही? असा सवाल वितरक करत असून त्यांच्यात संभ्रमाचे वातावरण बनले आहे.

भाजपचे नगरसेवक तथा सुजय विखे यांचे निकटवर्तीय दहरथ तुपे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.

राज्यसभेतून बिनविरोध खासदार होणाऱ्या प्रा.डॉ.ज्योती वाघमारे आज 2 वाजता प्रथमच सोलापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत.

Rohit Pawar : अजित पवार विमान अपघाताबाबत चर्चा करण्यासाठी आज आमदार रोहित पवार माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत.

अमरावती स्थायी समितीच्या अध्यक्षपदी मार्डीकर

अमरावती महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आल्या आहेत. गटनेते अविनाश मार्डीकर हे स्थायी समितीचे सभापतीपदी निवडून आले आहेत. त्यांनी काँग्रेसचे प्रशांत महल्ले यांचा पराभव केला. विरोधी पक्षापैकी एमआयएमने यावेळीही तटस्थेतेची भूमिका घेतली.

एक कोटीची लाच घेताना सहाय्यक आयुक्ताला अटक

1 कोटींची लाच मागणाऱ्या जीएसटीच्या 2 सहाय्यक आयुक्तांसह एकाला अटक करण्यात आलीये. नाशिकमध्ये ही कारवाई करण्यात आली, 20 लाखांचा पहिला हफ्ता स्वीकारताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. सहाय्यक आयुक्त सोमनाथ पागे आणि मच्छिंद्र दोंदेसह एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आले.

कर्जमाफीची घोषणा अर्धवट, फसवी - रोहित पवार

सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले, ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकबाकीदार शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची सरकारने केलेली घोषणा ही अर्धवट, शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आणि स्वतःच दिलेल्या शब्दापासून पळ काढणारी आहे. यंदा अतिवृष्टीमुळं संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक अक्षरशः वाहून गेल्याने यंदाही कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये सरसकट समावेश करणं गरजेचं आहे. बजेटवर बोलताना ही बाब आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून देऊ आणि सरसकट कर्जमाफी करण्यास सरकारला भाग पाडू..!

तटकरेंना बोलवलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या सदस्यांची दांडी

सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत राजकारण उफाळून आले आहे. अशातच भाजपवर नाराज असलेल्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला गैरहजर लावत खळबळ उडवून दिली आहे.

भूम, परंडा, वाशी पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता, तानाजी सावंतांची रणनीती यशस्वी

माजी मंत्री, आमदार तानाजी सावंत यांनी भूम परंडा वाशी या तीन तालुक्याच्या पंचायत समितीवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. सावंत यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आली आहे. या तिन्ही पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे उमेदवार सभापती म्हणून विजयी झाले आहेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com