
बीडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका 21 वर्षीय विवाहित तरुणीची एकाच महिन्यात ३ ठिकाणी विक्री करून जबरदस्तीने तीन वेळा लग्न लावून दिल्याचा संताापजनक प्रकार समोर आला आहे. या त्रासाला कंटाळून पीडितेनं विष पिऊन आत्महत्येचाा प्रयत्न केला होता. या प्रकरणी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात मानवी तस्करी करणारं रॅकेट असल्याचं साांगितलं जात आहे.
आर्णी-केळापूरचे भाजपचे आमदार राजू तोडसाम यांचा मारवाडी समाजाबाबत शिवीगाळ करणारा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते माजी आमदार संदीप बाजोरिया तसेच मारवाडी समाजाबाबत अपमानास्पद वक्तव्य करत असल्याचे दिसत येत आहे. दरम्यान, मारवाडी समाजाचा अवमान केल्याप्रकरणी आमदार राजू तोडसाम यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून केली आहे.
आज रंगपंचमी आणि महिला दिनाच्या दिवशी पंढरपूर इथल्या माढा तालुक्यात चिंचोली गावात दोन गटात शेतीच्या पाण्यावरून वाद भडकला. यामध्ये जीव घेण्याहाणामारीत दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सीना–माढा उपसा सिंचन योजनेच्या कॅनलवरून दोन गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला. मात्र काही वेळातच या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. काठी-लाथाबुक्क्यांनी झालेल्या या मारहाणीत महिलांसह सुमारे दहा जण जखमी झाले.
मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायलमधील संघर्ष आता निर्णायक आणि अधिक धोकादायक वळणावर पोहोचला आहे. इराणने इस्रायलच्या ऊर्जा क्षेत्राचा कणा मानल्या जाणाऱ्या 'हाइफा बे' इथल्या 'बाजान ग्रुप'च्या सर्वात मोठ्या ऑईल रिफायनरी कॉम्प्लेक्सवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यामुळे संपूर्ण आखातात खळबळ उडाली असून, याचे थेट पडसाद भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक हितांवर पडण्याची शक्यता आहे.
मध्य-पूर्वेत सुरू असलेल्या भीषण संघर्षामुळे जागतिक शांतता धोक्यात आली असून, रशियाने आता आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर परिस्थिती अधिक हाताबाहेर गेली असून, रशियाने आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी सदस्यांची तातडीची शिखर परिषद बोलावण्याचे आवाहन केले आहे.
पिंपरी चिंचवडमधील सायलीने आपल्या पतीला सोडून पुन्हा हिंदू धर्मात वापसी केली आहे. 2019 ची मिस इंडिया स्पर्धेतील सुंदरी सायली सुर्वे हिचं शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात समाविष्ट करण्यात आलं. लग्नानंतर मला 4 मुले झाली आहेत, त्या मुलांसाठीच माझा छळ होत असतानाही मी सासरी राहिल्याची कबुली सायलीने धर्मांतरानंतर दिली.
बांगलादेशमध्ये निवडणुका होऊन नवे सरकार स्थापन झाले असले तरी हिंदूंवरील अत्याचाराच्या प्रमाणात कुठलीही घट झालेली नाही. बांगलादेशमधील कोमिला इथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काली मंदिरात भाविक पूज करत असताना एक मुखवटा घातलेला इसम मंदिरात आला. तसेच त्यानेन तिथे एक स्फोटके असलेली बॅग ठेवली. काही वेळाने या बॅगेमधील स्फोटकांचा स्फोट होऊन मंदिर परिसर हादरला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला 20 वर्षे पूर्ण होता आहेत त्यानिमित्ताने नोंदणी सप्ताह घेण्याचे ठरले आहे. 9 ते 19 मार्च दरम्यान हा कार्यक्रम असणार आहे. दरवर्षी मुंबई पुणे सारख्या शहरात आम्ही नोंदणी करतो.
मात्र, यावेळी छत्रपतींना अभिवादन करून याला सुरुवात करावी अशी कल्पना आली. त्यानुसार उद्या रायगडावर छत्रपतींच्या समाधी स्थळ आणि मेघडंबरीला अभिवादन करून याची सुरुवात करीत आहोत.
ज्यांना ज्यांना पक्षात काम करायची इच्छा आहे त्यांनाही या नोंदणी सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज रायगड दौऱ्यावर आहेत. ते दौऱ्यावर असताना दरम्यान महाडमधील राही दळवी या चिमुकलीने शिव वंदना म्हणली. मुंबई ते महाड स्वतः ड्रायव्हिंग करून आलेले राज ठाकरे थांबले आणि त्यांनी राही साळवी या चिमूकलीची शिव वंदना कौतुकाने ऐकली.
राष्ट्रवादी समाज पक्षाचे नेते आणि माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबाबत प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातील सुमारे 99 टक्के जनतेच्या मनात अजित दादांच्या मृत्यूबाबत संशय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणायचे असेल, तर केंद्र आणि राज्य सरकारने स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यासाठी सीबीआयमार्फत चौकशी नेमून, सुप्रीम कोर्टातील निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास करण्यात यावा, असे जानकर यांनी सुचवले.
राज्यभरात रंगपंचमीच्या सणाचा उत्साह पाहायला मिळत असतानाच सोलापुरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी करण्यात आली. सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौर पदाची संधी डावलल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांविरोधात हे आंदोलन करण्यात आले. सोलापुरात 1993 नंतर पहिल्यांदाच मराठा समाजाला महापौरपदाची संधी आली होती. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना ही संधी दिल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे पुत्र निशांत कुमार आज सक्रीय राजकारणात दाखल झाले. त्यांनी संयुक्त जनता दल या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. नितीश कुमार यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिहारमध्ये या राजकीय घडामोडी घडत आहेत.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र जय पवार यांची सोमवारी मुंबईत होणारी पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. वडील अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत जय पवार यांच्याकडून पत्रकार परिषदेत माहिती दिली जाणार होती. मात्र, आता ही पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.
पुण्याच्या विद्यापीठ चौकातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचं नाव द्यावं, अशी मागणी केंद्रिय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डबल डेकर उड्डाणपूलाचे उद्घाटन झाले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होत्या.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी जयराम चाटे तब्बल 14 महिन्यांनंतर काही तासांसाठी जेलबाहेर येणार आहे. त्याच्या धाकट्या भावाच्या निधनानंतर होणाऱ्या धार्मिक विधीस उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस बंदोबस्तात जाण्याची परवानगी दिली आहे.
अजित पवार यांचा लहान मुलगा जय पवार हे उद्या पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत जय पवार VSR या कंपनीबाबत गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यानंतर जेल बाहेर पडणार आहे. निधनानंतर केल्या जाणाऱ्या धार्मिक विधीसाठी जयराम चाटेला न्यायालयाने पोलीस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारने देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रोटोकॉलचे पालन न केल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे. यावर ममता बनर्जींनी स्पष्टीकरण दिलं आहे. राष्ट्रपती सचिवालयाने मंजूर केलेल्या अधिकृत कार्यक्रमसूचीमध्ये मुख्यमंत्री किंवा राज्य मंत्र्यांना उपस्थित राहण्याची कोणतीही अट नव्हती. तसंच हा कार्यक्रम 'आंतरराष्ट्रीय संथाल परिषद' या खाजगी संस्थेने आयोजित केल्याचा दावा बॅनर्जी यांनी केला आहे.
देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या नवव्या आंतरराष्ट्रीय संथाल परिषदेत सहभागी होण्यासाठी पश्चिम बंगालला गेल्या होत्या. यावेळी ममता बॅनर्जींकडून राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचे पालन न झाल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. तर राष्ट्रपतींच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या सरकारवर टीका केली आहे.
सायबर भामट्यांना रोखण्यासाठी विविध उपाय सातत्याने केले जात आहेत. मात्र हे प्रबोधन पुरेसे ठरत नाही असे चित्र दिसत आहे. विशेषत: नाशिकमध्ये फसवणुकीच्या घटना थांबण्याची चिन्हे नाहीत. राष्ट्रीयकृत बँकेचे क्रेडिट कार्ड देण्यासाठी आलेल्या फोनवरून व्यापाऱ्यांना मोठा झटका बसला आहे. क्रेडिट कार्ड घेण्यासाठी संबंधितांचे बँक खाते हॅक करण्यात आले. त्यातून तिघांना ३१.४२ लोखांचा गंडा घालण्यात आला आहे. नाशिक शहर हे सायबर भामट्यांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरत आहे. गेल्या दोन वर्षात सायबर ठगांनी १११ कोटींना गंडा घालण्यात आला आहे. यामध्ये प्रामुख्याने निवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश अधिक आहे.
भाजपाने जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभेत पराभवाची सवय लावून घ्यावी, असा टोला खासदार विशाल पाटील यांनी भाजपला लगावला आहे. सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपाला जनतेने नाकारलं मात्र तरी देखील सत्तेत घुसण्यासाठी प्रयत्न केला जातोय, असे देखील ते म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुप्रतीक्षित एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण रविवारी (दि. ८ मार्च) सकाळी १० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
मुळशी तालुका पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदासाठी ९ मार्च रोजी निवडणूक होत आहे. चायत समितीमध्ये सहा जागांपैकी तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस विजय झाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दोन सदस्य निवडून आले आहेत. आणि भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहेत.
पुणे महापालिकेत काँग्रेसच्या वाट्याला एक एक स्वीकृत नगरसेवक पद येणार आहे. या पदासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठी काँग्रेसच्या नेत्यांकडून दिल्लीत बोलणी करण्यात येत आहे.दिल्ली दरबारी नेत्यांशी स्थानिक नेत्यांचा संपर्कात आहे. एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी तब्बल 68 अर्ज आले आहेत. राज्य पातळीवर नेमण्यात आलेल्या तीन नेत्यांकडून अहवाल प्रदेश कार्यालयात पाठवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.