मालेगाव महापालिकेतील लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली; इस्लाम पार्टीचे नेत बचावले..

ZP Eelection Live Updates : राज्यभरातली ताज्या घडामोडी पहा एकाच क्लिकवर ...
Live Update
Live UpdateSarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis : गडचिरोलीतील सर्वात मोठे आॅपरेशन, फडणवीसांकडून नक्षलवाद्याविरोधीतल कारवाईचे कौतुक..

गडचिरोली पोलीसांच्या सी-६० जवानांचे अभिनंदन करतो. अतिशय महत्वाचे आॅपरेशन त्यांनी केले आहे. नक्षलवाद्यांची एकच कंपनी आता राहिली होती. त्यातील सात मेजर मारले गेले आहेत. तीन दिवस गडचिरोली पोलीस हे आॅपरेशन करत होते. नक्षलवाद्यांचा मोरक्या प्रभाकर यालाही ठार मारण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 मालेगाव महापालिका इमारतीत आज मोठा अपघात घडण्याची शक्यता असतानाच सुदैवाने जीवितहानी टळली आहे. महापालिका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून लिफ्ट अचानक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त भार झाल्याने तसेच लिफ्टची चैन तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या लिफ्टमध्ये एकूण 18 नागरिक अडकले होते. चौथ्या मजल्यावरून खाली कोसळताना लिफ्ट थेट तळमजल्यापर्यंत न जाता पहिल्या मजल्यावर लिफ्टचा दरवाजा अडकल्याने मोठा अनर्थ टळला. यामुळे लिफ्टमधील सर्वजण सुखरूप राहिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com