

Mumbai News: मुंबईसह राज्यातील प्रमुख महानगरपालिकेचे प्रभाग आरक्षण जाहीर झाले आहे. अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायती, महापालिकांच्या आरक्षणात फेरबदल झाल्यामुळे काही इच्छुकांची राजकीय गणिते कोलमडली आहेत.
नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळवी सुरु झाली आहे, त्यासाठी लागणारी अन्य कागदपत्रे जमा करण्यासाठी धावाधाव सुरु झाली आहे.
तिकीट मिळवणे, प्रचारासाठी निधी कसा उभा करायचा, निवडणूक अर्जासोबत लागणारे कागदपत्र जमा करणे यासाठी काही इच्छुकांची दमछाक होत आहे. प्रभागात कुठल्या समाजाचे वर्चस्व आहे. त्यानुसार पक्ष, संघटना आपले उमेदवार मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहेत.
काही प्रभागांमध्ये अनपेक्षितपणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा महिलांसाठी आरक्षण लागू झाल्याने इच्छुक उमेदवार आता सुरक्षित आणि खुल्या प्रभागांचा शोध घेत आहेत. ज्याठिकाणी आरक्षण पडले आहेत. अनेक जणांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही ते मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे.
सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरवात केली आहे. दोन्ही शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली, यासाठी इच्छुकांनी आपआपल्या पक्षाकडे अर्ज दाखल केले आहेत. आपल्याचा तिकीट मिळावे, यासाठी वरिष्ठांकडे फिल्डिंग लावली आहे. नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.
निवडणूक अर्ज भरण्यापूर्वी थकीत कर भरणे गरजेचे असते, हा कर भरण्यासाठी ग्रामपंचायती, महापालिका कार्यालयासमोर इच्छुक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसत आहे.
निवडणुकीसाठी करण्यात येणाऱ्या खर्चाचे व्यवहार स्वतंत्र बँक खात्यातून करावे लागतात, त्यासाठी निवडणुक आयोगाच्या नियमानुसार स्वतंत्र बँक खाते असणे गरजेचे असते. त्यासाठीही इच्छुक व्यग्र आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.