

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्याविरोधात तब्बल पाच कोटी रुपयांचा मानहानीचा दावा जिल्हा न्यायालयात दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष सुहास कदम यांनी बाळासाहेब गायकवाड यांच्या विरोधातील आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना पाटील यांनी केलेल्या आरोपांमुळे आपली सामाजिक आणि व्यावसायिक बदनामी झाल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे.
धुळे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित भ्रष्टाचाराविरोधात ‘दक्ष पत्रकार संघ’ आणि ‘जय माता दी महिला बचत गट’ यांचे गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, प्रशासनाकडून आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत संतप्त आंदोलकांनी आज अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. आंदोलकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना ‘बेशरम’चे झाड भेट देत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला बाधा आणणाऱ्या तरतुदी शासन निर्णयात करण्यात आल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ५ ऑगस्टच्या शासन निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता निर्माण झाली असून, विशेषतः २६ वर्षांच्या वयोमर्यादेच्या तरतुदीला विद्यार्थ्यांचा तीव्र विरोध आहे. हा शासन निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे प्रवेश प्रक्रिया सुरू करावी, अशी विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या हल्द्वानी, उत्तराखंड येथील सभेनंतर त्या जागेचे हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीच्या संघटनांकडून गंगाजलाने शुद्धीकरण करण्यात आले. या घटनेच्या निषेधार्थ आज नांदेड शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. खासदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार झिशान सिद्दिकी यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.ही धमकी सिद्दीकी यांना ऑडिओ क्लिप द्वारे देण्यात आली आहे. आठ दिवसांत दोनवेळा सिद्दिकी यांना धमकी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर झिशान यांनी वांद्रे पोलिसांत जाऊन तक्रार दिली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी राजधानी लखनऊ इथं भारत-पाकिस्तान फाळणी निमित्त आयोजित मौन मोर्चामध्ये सहभाग नोंदवला. सरदार वल्लभभाई पटेल यांची प्रतिमा हातात घेऊन लोकभवनपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी भाषण करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तसंच जर मोदी हे भारताच्या स्वातंत्र्यावेळी पंतप्रधान असते तर भारताची फाळणी झाली नसती असं त्यांनी म्हटलं आहे.
नाशिक रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या १४ गावांतील शेतकऱ्यांनी आज कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह साहेब यांची छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या समवेत भेट घेऊन रिंग रोडच्या भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाबाबत सविस्तर चर्चा केली.यावेळी रिंग रोडच्या संदर्भातील विविध बाबींचे पुरावे, कागदपत्रे आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांचा समावेश असलेले सविस्तर निवेदन कुंभमेळा आयुक्तांकडे सादर करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने तिरंगा रॅली निघत आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सहभागी झाले आहेत. संभाजीनगरच्या रस्त्यांवर देशप्रेमी तरुणाई जल्लोष करत असून मोठी गर्दी झाली आहे. संभाजीनगरच्या संभाजी पेठेतील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन या रॅलीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्र्यांसह भाजपचे अनेक नेते, आमदार या रॅलीत सहभागी झाले आहेत.
एटीएम मशीनच्या सेन्सरशी छेडछाड करून 'एरर 902' (Error 902) जनरेट करत पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची तब्बल 3 कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या बहुचर्चित सायबर फ्रॉड प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. उत्तर प्रदेशातील दोन्ही आरोपींची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. आर. मोरे यांनी पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या दोन्ही आरोपींना संशयाचा फायदा मिळाल्याने त्यांची सुटका करण्यात आली आहे.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवार व शनिवार रोजी पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतील कपालेश्वर मंदिर व रामकुंड, गंगाघाट परिसरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित मार्गांवर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे. त्यानुषंगाने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी भाविक व वाहनचालकांनी या कालावधीत संबंधित वाहतूक निर्बंधांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी केले आहे.
नाशिक- त्र्यंबकेश्वर मार्गावर 20 जुलैला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले दिलीप काळे यांचा मृत्यू झालाय. 24 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर दुखापत झाली होती, मात्र हा अपघात खराब रस्त्यांमुळे झाला की इतर काही कारणांमुळे, याबाबत महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कसून तपास सुरूये....तर दुसरीकडे मृत दिलीप काळे च्या कुटुंबीयांनी हा अपघात खड्ड्यांमुळेच झाल्याचा आरोप केलाय.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल केले जात आहेत. त्यासाठी उद्यापासून बैठकाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार व रविवार दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रमुख नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रत्येक जिल्ह्यातील संघटनानात्मक आढावा घेतला जाणार आहे.
पुणे : ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी पुण्यात ओबीसी समाजाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. लक्ष्मण हाके, मंगेश ससाने इतर ओबीसी नेते बैठकीसाठी उपस्थित आहेत. मनोज जरांगे यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यानंतर आणि जरांगे यांनी केलेल्या विरोधानंतर ओबीसी समाज पुण्यात बैठक घेत मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर ओबीसी नेते पत्रकार परिषद घेत निर्णय जाहीर करणार आहेत.
गुरुद्वारामध्ये गुरुवारी झालेल्या हल्ल्यानंतर पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या हाताला दुखापत झाली होती. उपचारानंतर त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्णालयातून बाहेर येताच ते म्हणाले, पंजाबमधील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे आणि राज्यातील शांतता भंग करणे, हेच हल्लेखोरांचे उद्दिष्ट आहे. ते मी कधीही होऊ देणार नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रगती पाहवत नाही. जगातील ३४-३५ देशांनी मोदींना सर्वोच्च सन्मान दिला आहे. विरोधी पक्षातील नेते नेहमीच मोदींवर आरोप करत आहेत. मोदींनी जगभरातील देशांसोबत भारताचे चांगले संबंध निर्माण केले, असे शिंदे म्हणाले आहेत.
दिल्ली हायकोर्टाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. तसा ई-मेल कोर्टाला पाठविण्यात आला आहे. त्यानंतर कोर्टाच्या परिसरात पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
जनगणनेसाठी केंद्र सरकारकडून ४० प्रश्नांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. यामध्ये जात, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या दर्जाचाही समावेश आहे. सरकारी आदेशानुसार, जनगणनेतील लोकसंख्या मोजणीचा टप्पा १ सप्टेंबरपासून हिमाच्छादित भागांमध्ये सुरू होणार आहे.
शिक्षणसंस्था, सामाजिक संस्थांसाठी परदेशातून निधी येतो. पोलिआ हा सामाजिक संस्थांच्या मदतीने भारतातून हद्दपार केला. असे काही उपक्रम सगळे मिळून करू शकतो. पण या सामाजिक संस्था या काहीतरी देशद्रोहाचे काम करत आहेत, असा एफसीआरएची भूमिका आहे. ते आम्हाला मान्य नाही, असे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी FCRA कायद्याला विरोध केला.
कर्नाटक सरकारने सरकारी परिसर आणि सार्वजनिक संपत्तीच्या वापरासाठी नवा कायदा कर्नाटक सरकारने सरकारी मालमत्ता आणि सार्वजनिक जागांच्या वापरासाठी स्वतंत्र कायदेशीर चौकट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता.13) 'द कर्नाटक रेग्युलेशन ऑफ यूज ऑफ गव्हर्नमेंट प्रिमायसिस अँड पब्लिक प्रॉपर्टी बिल, 2026' या विधेयकावर चर्चा केली. प्रस्तावित कायद्यानुसार सार्वजनिक संपत्तीवर कार्यक्रम, सभा किंवा इतर उपक्रम आयोजित करण्यापूर्वी संबंधित प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. या कायद्याचा RSS सह सर्वच खासगी व्यक्ती, संस्था, संघटना आणि इतर गटांना लागू होण्याचा सरकारचा दावा आहे.
बीड जिल्ह्यात विविध बँकांमधील मनी म्युल खात्यांचा वापर करून तब्बल २४ कोटी रुपयांच्या ऑनलाइन सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. राष्ट्रीय सायबर गुन्हे रिपोर्टिंग पोर्टल आणि समन्वय पोर्टलवरील तपासातून सायबर गुन्हेगारांचे मोठे सिंडिकेट सक्रिय असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यासह मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पुढील तीन दिवस पावसाच्या हलक्या सरी पडणार असल्याचा हवामान खात्याने इशारा दिला आहे.
पुणे रेल्वे स्थानकाच्या एस टी स्टँडची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. एसटी स्टँड भागातील स्वच्छता, सुरक्षा आणि कामकाजाबाबत सरनाईक यांच्याकडून आढावा घेतला.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी नाशिकला भेट दिली. पुण्याहून नाशिकला येताना त्यांनी चाकण आणि नाशिकच्या खड्ड्यांचा अनुभव सांगितला. महापालिकेच्या कारभारावर बोलतानाच त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांची दुखरी नस पकडली. राज्यभरातील रस्ते नादुरुस्त आहेत. अगदी समृद्धी महामार्गावर देखील पॅच लावले आहेत. याला जबाबदार कोण? असा प्रश्न करून फेकनाथ शिंदे कोणाच्या आशीर्वादाने मंत्री आहेत? नगर विकास मंत्री कोण आहेत? असा सूचक प्रश्न त्यांनी केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणून त्यांचे मोबिलायझेशन केले जात असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर केला आहे. दानवे यांनी या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, "दहावीच्या पोरांना वेठीस धरणारा हा आहे 'जगातील सर्वात मोठा पक्ष'! छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर उधारीचे दंड फुगवायला इयत्ता दहावीचे मुलं कार्यक्रमासाठी दुपारी १२ पासून क्रांती चौकात आणून बसवले जाणार आहेत. ही फक्त एकाच शाळेची यादी, अगदी मोबाईल नंबर सहित. मुलांच्या करिअरचं, परीक्षेचं काय व्हायचं ते होवो.. साहेबांसमोर गर्दीचा फुगा कसा फुगवायचा एवढाच काय तो येथील भाजपचा 'मास्टरस्ट्रोक'!", अशा शब्दात त्यांनी भाजपला टोला लगावला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे शहराची वाट लागली आहे. त्यावर साधू महंतांनी ही या कामांची गरज आहे का? असा प्रश्न केला. याकडे आदित्य ठाकरे यांनी लक्ष वेधले आहे. हा सर्व जनतेचा पैसा आहे. नासाडी होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कुंभमेळ्यातील कामे मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट वर्क ऑर्डर देऊन फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी जामनेरमधील दोघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून, आणखी पाच ते सात जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
आज पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक
पुण्यातील मनसे शहराध्यक्ष अनेक पदाधिकारी यांच्या जबाबदारीमध्ये बदल करण्याची बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
राज ठाकरे घेणार शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक
गेल्या अनेक दिवसात मनसेमध्ये फेरबदल होणार असल्याची चर्चा होती,मनसे प्रमुख राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून आज महत्त्वाची बैठक होणार आहे
राहुल गांधींनी गुरुवारी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टोलेबाजी केली. मोदींचं परराष्ट्र धोरण कसं आहे, हे दाखवताना राहुल यांनी मंचावरच काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांची गळाभेट घेतली. गळाभेट घेणे हे यांचे परराष्ट्र धोरण आहे, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी आणि दीक्षित यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा होत आहे.
येरवडा येथील राज चौक परिसरात दोन गटांमध्ये जोरदार मारामारी सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनाही अंधाधुंद मारहाणीत दुखापत झाली. घटनेनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत.
चाकण औद्योगिक क्षेत्र परिसरातील कंपनीच्या स्थलांतराच्या अनुषंगाने तसेच औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेंद्र सिंह कुशवाहा, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आज चाकण औद्योगिक क्षेत्रातील विविध रस्त्यांची संयुक्त पाहणी केली. यावेळी एमआयडीसी अंतर्गत रस्ते, तळेगाव-चाकण महामार्ग तसेच पुणे-नाशिक महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.
येरवडा येथील राज चौक परिसरात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. हाणामारी सुरू असताना मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपाई अमोल गायकवाड यांनाही मारहाण करण्यात आली. यामध्ये गायकवाड यांना दुखापत झाली. घटनेनंतर लक्ष्मीनगर पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून, प्रकरणाचा पुढील तपास लक्ष्मीनगर पोलीस करत आहेत.
शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रत्यक्ष, तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
बैठकीत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, पीक विमा, इनाम व गायरान जमिनी, भूमिहीन कुटुंबांच्या घराच्या जागा तसेच खतांचा तुटवडा व लिंकिंग आदी मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित मागण्यांबाबत आवश्यक कार्यवाही करून विषय मंत्रिमंडळ उपसमितीसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अखिल भारतीय किसान सभेचे पदाधिकारी व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.