

पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. खडकवासला,पानशेत यांसह धरणक्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसानंतर मुठा नदीत 45, 571 क्युसेक विसर्ग पाण्याचा प्रवाह सुरु करण्यात आला आहे. या विसर्गाताल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे मुठा नदीवरील बंधाराही फुटल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पुणे शहरातील नदीकाठच्या काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनातर्फे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलन यशस्वी होण्यामागचं श्रेय सोनम वांगचूक यांना दिलं आहे. त्यांनी वांगचुक सरांच्या त्यागाला आणि बलिदानाला आम्ही कधीही विसरू शकणार नाहीत, त्यांनी तब्बल 26 दिवस उपोषण केल्याची भावना बोलून दाखवली. तसेच त्यांनी या आंदोलनासाठी आपल्या जीवाची पर्वा केली ऩसल्याचंही म्हटलं. सोनम वांगचुक यांनी आपला जीव पणाला लावून संपूर्ण देशाला जागं करण्याचं काम केलं. त्यांच्या उपोषणाशिवाय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणं शक्यच नव्हतं असं मोठं विधान दीपके यांनी केलं.
गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं राज्याला झोडपून काढलं आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना महाराष्ट्रासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीनं शनिवारी (ता. 1 ऑगस्ट) मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच प्रचंड मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुण्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाट आणि विदर्भ व मराठवाड्याच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात कारवायांचा धडाका कायम ठेवला आहे. आता एफडीएकडून थेट मुंबई हायकोर्टातील 3 कॅन्टीनला बंद करण्याची नोटीस धाडण्यात आली आहे.
कोल्हापुरात गर्भपात प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांना असं कृत्य करणे गंभीर आहे. या सगळ्या गोष्टींचा तपास सुरू असून या प्रकरणांमध्ये अजूनही अनेकांची नावं बाहेर येण्याची शक्यता आहे , अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापुरचे पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांनी दिली आहे.
मुलींचा जन्मदर कमी होतोय यावर आम्ही अत्यंत गंभीरपणे काम करत आहे. जास्तीत जास्त कारवाया करण्यामध्ये आमचा आग्रह आहे. गेल्या आठवड्यात स्वप्नील पाटीलवर झालेल्या कारवाईमध्येच या डॉक्टरचे नाव पुढे आलं. गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपाताच्या विरोधात कारवाया करण्यासाठी राज्यभरात टास्क फोर्सची निर्मिती केली.
विधिमंडळातील महिला सदस्यांच्या चर्चेनंतर जिल्हास्तरावरील कारवायांची गती वाढवण्यासाठी या टास्क फोर्सची निर्मिती केली आहे. अशा गुन्ह्यातील आरोपींवर मोका लावण्यासाठीच्या निर्णयासाठी दोन बैठका झाल्या. पुढच्या अधिवेशनाआधी कायदा यावा अस अपेक्षित आहे. विधी व न्याय विभागाच्या सूचनेनुसार यामध्ये काही दुरुस्ती केली आहे.
उजनी धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी सुरु असणारा विसर्ग वाढवून दुपारी ३.३० वाजेपासून ७५ हजार क्युसेक्स एवढा भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात आला आहे. नदीपात्रात कोणीही उतरु नये, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन भीमानगर येथील उजनी धरण व्यवस्थापन विभागानं केलं आहे.
मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी एफडीएला दणका दिला. परवाने रद्दचा निर्णय मागे घेत संबंधित हॉटेल्सला कारणे दाखवा नोटीस पाठविण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहे.
राज्य सरकारतर्फे महिलांना देण्यात येणाऱ्या पिंक ई-रिक्षाच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे. यापुढे हे अनदान २० टक्क्यांऐवजी ४० टक्के असेल. तर ६० टक्के आर्थिक भार लाभार्थ्यांना उचलावा लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईतर्फे उभारण्यात येणाऱ्या 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था' या प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले.
खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नदीपात्रालगत राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे.
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्रोफाइलमध्ये बदल केल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चांना वेग आला आहे. मात्र, त्यांनी किंवा भाजपने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी पद सोडल्याची चर्चा सुरू असली, तरी अद्याप त्याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
राज्यात भाजप आणि शिंदेसेनेतील मतभेद अधिक ठळक होत असल्याचे चित्र दिसत आहे. एसटी महामंडळाच्या निधीवर अर्थ खात्याने आक्षेप घेतला असून, ठाण्यात ड्रीम क्लस्टर योजनेवरही विरोध झाला आहे. पुण्यातील आंदोलन आणि मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत तणावाची चर्चा अधिक रंगू लागली आहे.
भिवंडीतील इमारत दुर्घटनेनंतर मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच जखमींवर तातडीने आणि दर्जेदार उपचार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
भिवंडीतील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनास्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. मृतांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांनी जखमींच्या उपचारांची माहिती घेतली. या प्रकरणात त्वरित गुन्हा दाखल करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले.
जळगाव जिल्ह्यातील रावेर यावल तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान असलेले गायबर्डी धरण एक पर्यटन स्थळ सुद्धा नावारूपाला आले आहे. पाल या थंड हवेच्या निसर्ग रम्य पर्यटन सोबतच गारबर्डी धरण हे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पर्यटकांसाठी मोठे ठिकाण ठरले आहे. धरण भरल्याने येथे पर्यटकांची संख्या वाढत आहे.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार झाला असून अमित शाहांच्या हस्ते त्यांचा सन्मान होणार आहे अमित शाह उद्या पुणे दौ-यावर आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ते पुण्यात येत आहेत.
उद्या (शनिवारी) गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुण्यात लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण होत आहे. शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पुणे पोलिसांनी काँग्रेसला परवानगी दिली आहे.
चाकण-शिक्रापूर महामार्गावर आज पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर एक ट्रक बंद पडल्यामुळे तब्बल १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळीच ही कोंडी झाल्याने चाकण औद्योगिक वसाहतीत (MIDC) कामावर निघालेल्या कामगारांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अद्यापही या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
भिवंडी शहरातील बालाजी नगर गंगारामवाडी परिसरात रात्री इमारत कोसळण्याची घटना घडली. इमारतीच्या पिलरचे काम सुरू असताना ही घटना घडली. ही चार मजली इमारत कोसळली असून यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच दोन ते तीन जण ठिगाऱ्याखाली आडकले असल्याची माहिती आहे.
22 जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. सुप्रीम कोर्टात या निवडणुका घेण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. त्यामुळे वर्षा अखेर डिसेंबर महिन्यात या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. थेट शाह यांचे नाव घेत त्यांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवण्याचा आदेश दिल्याचे म्हटले. त्यांच्या या आरोपानंतर सत्ताधारी भाजप खासदार आक्रमक झाले होते.भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी गुरुवारी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्लांकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात हक्कभंग आणि सभागृहाचा अवमान केल्याची नोटीस दाखल केली आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या 76 नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्था आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असतानाच तब्बल ६५ लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवकांना प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला पाठवण्यात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच काही नगरसेवक कुटुंबीयांसह गेल्याच्या दाव्यांमुळे हा अभ्यास दौरा होता की पर्यटन, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.
लोकसभेनंतर राज्यसभेत देखील 'सार्वजनिक परीक्षा संशोधन विधेयक' पास झाले. त्यानंतर रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ जारी करत, पेपर लीक माफिया आणि घोटाळेबाजांना इशारा दिला आहे. तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या एकाही दोषीला सोडले जाणार नाही आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर होणार असे ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.