

पुणे : ‘‘ जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याला लगेच देशविरोधी, शहरी नक्षलवादी किंवा इतर कोणतेही लेबल लावले जात असल्याची परिस्थिती सध्या आहे. पण प्रश्न विचारणे हा लोकशाहीचा आत्मा आहे. मतभिन्नता म्हणजे राष्ट्रविरोध नव्हे. उलट, विचारांचे स्वातंत्र्य आणि संवाद यांमुळेच लोकशाही जिवंत राहते,’’ असे मत ‘भारतीय कम्युनिस्ट पक्षा’चे राष्ट्रीय महासचिव डी. राजा यांनी व्यक्त केले.
पुणे : पुणे महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांकडून विशिष्ट ठेकेदारांनाच कामे मिळावीत यासाठी प्रशासनावर वाढता दबाव टाकला जात आहे. अधिकारी आणि अभियंत्यांच्या दालनात ठाण मांडून निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप केला जात असून, त्यातून नगरसेवकांमध्येही वाद निर्माण झाले आहेत. या हस्तक्षेपाचा थेट फटका शहरातील विकासकामांना बसला असून शेकडो कोटी रुपयांच्या निविदा रखडल्या आहेत. या प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने तक्रारी येत असून, त्यांनीही या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दौंड : बनावट कागदपत्रांआधारे मिळविलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्याने दौंड नगरपालिकेचे नगरसेवक रोहित पाटील यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एका आदेशाद्वारे सदस्यत्व रद्द केले आहे.
नव्या निविदा प्रक्रियेचे काम राणीच्या बागेचे होते. मात्र महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख केला गेला. या वादामुळे टेंडर मागे घेण्याचे आदेश मी दिले असल्याची अधिकृत माहिती महापौर रितू तावडेंनी यावेळी दिली.
शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर राहुल शेवाळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच कोर्टातून बाहेर पडताना संजय राऊत यांनी दाखवलेल्या व्हिक्ट्री साईनवरही त्यांनी भाष्य केलं. राहुल शेवाळे म्हणाले, “दावा कोणीही करेल, परंतु निर्णय देण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा आहे. त्यामुळे खरं तर असा दावा करता येत नाही, कारण तो सर्वोच्च न्यायालयाचा अपमान होईल. त्यामुळे असा दावा करता येत नाही.”
शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यामध्ये ठाकरेंच्या वतीने सडेतोड युक्तिवाद करण्यात आला. शिंदेंसोबत गेलेले त्यावेळचे आमदार अपात्र ठरतात. त्या आधारे निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यावेळी घेतलेले निर्णय चुकीचे ठरतात, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला.
दिल्ली उच्च न्यायालयाने राजधानीतील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीनची उपलब्धता तपासण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी (ग्राउंड सर्व्हे) करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस ठाण्यांतील मासिक पाळी स्वच्छतेसंदर्भातील जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा आदेश दिला. 'जस्टिस फॉर राइट्स फाउंडेशन'च्या वतीने आम्ही ही याचिका दाखल केली आहे.
अंबरनाथ पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाट काढताना अंबरनाथकरांचे दररोज मोठे हाल होतात. शिवाय खड्ड्यांमुळे उड्डाणपुलावर मोठी वाहतूक कोंडीही होते. मनसे शहर उपाध्यक्ष बबलू खान आणि प्रकाश नलावडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेनं आज उड्डाणपुलावर पीपीई किट घालून खड्ड्यांमध्ये मुन वॉक केला. हे खड्डे पाहून आपण जणूकाही चंद्रावरच आहोत, असा भास होत असल्यामुळे पालिकेचे या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आपण हे आंदोलन केल्याचे मनसेचे बबलू खान यांनी सांगितले.
मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण ही विधेयके पारित करण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन तृतियांश बहुमताची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न सध्या केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारकडून सुरू आहेत. जेव्हा ही विधेयके पारित करण्यासाठी पुरेसे संख्याबळ जमल्याची सरकारला खात्री होईल. तेव्हा संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाणार आहे. ही विधेयके पारित करण्यासाठी 17 ऑगस्टपासून संसदेचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याबाबत केंद्र सरकारकडून कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
जय पवार म्हणतात मी प्रत्येक महिलांच्या पाठीशी आहे, तर जयदादा तुम्ही महिलांच्या मागे असल्याचे सांगता तर मग धनंजय मुंडेंची पक्षातून हकालपट्टी करणार का? असा सवाल करुणा शर्मा यांनी विचारला आहे. दरम्यान, काँग्रेसने केलेल्या ट्विटमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल 'गुंगी गुडिया' असे वक्तव्याचा बीडमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये संताप दिसत आहे.
कुकडी आणि सीना लाभक्षेत्रातील कालव्यांच्या कामांसाठी निधीची कमरता भासणार नाही. लाभक्षेत्रातील शेवटच्या गावांना पाणी मिळावे, असा प्रयत्न जलसंपदा विभागाचा असून, कालव्याची काम करण्यासाठी पुढील तीन महिन्यात सर्व्हेक्षण करून दुरुस्तीचा प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमृता वहिनींचा आदेश शंभर टक्के पाळतात. (स्व.) गोपीनाथ मुंडेंच्यानंतर 966 कोटींचा एकच रस्ता आम्हाला दिला. दिवाळीला आम्ही फडणवीसांना त्या कामासाठी आणणार आहोत. मात्र वहिनीसाहेब हात जोडून विनंती करतो की, साहेबांना सांगा आमच्याकडे शासकीय मेडिकल कॉलेज द्या. आम्हाला इकडे मेडिकल कॉलेजची आवश्यकता आहे, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आह. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या पायाचे पूजन चक्क त्यांच्या बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांने केले. कुटुंबीयांसोबत पोलिस कर्मचारी देखील आमदार तानाजी मुटकुळे यांच्या पायाच दर्शन घेत आहे. यामुळे आमदार तानाजी मुटकुळे यांचे संरक्षण करण्यासाठी पोलिस आहेत की, दर्शन घेण्यासाठी? अशी चर्चा रंगली आहे.
गुवाहाटीत असताना आमदारांनी सरकार पाडण्यासाठी भाजपसोबत संगनमत केल्याचा दावा सिब्बल यांनी कोर्टात केला. भाजपच्या नेत्यांशी हे आमदार सतत संपर्कात होते. शिवसेनेने त्यांच्या पक्षविरोधी कारवायांबाबत निवडणूक आयोगाला कळविले होते, अशी माहितीही सिब्बल यांनी दिली.
पक्षचिन्ह राजकीय पक्षाचे की विधिमंडळ पक्षाचे, हा खरा प्रश्न असल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. तसेच भारतीय निवडणूक आयोगाचे पक्षातील बहुमतासाठी काही सुत्र आहे का, असाही प्रश्न कोर्टाने उपस्थित केला आहे.
विधिमंडळ पक्षातील एखादा गट नेता किंवा प्रतोद बदलू शकत नाही. हा अधिकार पक्षप्रमुखांचा असल्याचे कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरून हटविण्याबाबत सिब्बल यांंनी आमदारांच्या संख्याबळाची त्यासाठी आवश्यकता नसल्याचे कोर्टात सांगितले. हा अधिकार पक्षप्रमुखांचा असल्याचेही सिब्बल यांनी स्पष्ट केले.
पक्षाच्या घटनेनुसार निवडणूक आयोगाला माहिती दिली होती. २०२९-२२ मध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये एकनाथ शिंदेंनी काम केले. ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत कधीच आक्षेप घेतला गेला नाही, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला.
शिवसेना पक्ष-चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल बाजू मांडत आहेत. त्यांच्याकडून संपूर्ण घटनाक्रम सांगितला जात आहे. एकनाथ शिंदे यांची गटनेता म्हणून उद्धव ठाकरेंनीच नियुक्ती केली होती, असेही सिब्बल यांनी कोर्टात सांगितले.
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला बीड जिल्हा कारागृहात राजकीय प्रभावामुळे बेकायदेशीर सुविधा दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी कारागृह अधीक्षक यांना लिहिलेल्या पत्राद्वारे केला आहे. या आरोपीची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर नव्या अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीसाठी आज जिल्हा बँकेच्या सभागृहात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अपेक्षेप्रमाणे राहुल लोणीकर यांची अध्यक्षपदी तर निर्मला मरकड यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा काँग्रेस पक्षाकडून सोशल मीडियावर गुंगी गुडिया असा उल्लेख झाला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने त्याचा निषेध केला. आज नाशिक शहरात काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापासून काँग्रेस कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर निषेधाच्या घोषणा देत होते. काँग्रेस कार्यालयासमोर आल्यावर या मोर्चाला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत विरोध केला.
"बीडमधील पत्रकार परिषदेबाबत माझे धनंजय मुंडे यांच्याशी अद्याप बोलणे झालेले नाही. त्यामुळे नेमके काय घडले, याची मला माहिती नाही. मात्र, पालकमंत्र्यांच्या बैठकीत आमदार बाजूला बसणे ही सामान्य बाब आहे. पण पत्रकार परिषद ही मुख्य व्यक्तीची असते."
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेर रुपाली चाकणकरांना उत्तराधिकारी शोधला आहे. चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Special Intensive Revision (SIR) मोहिमेत सहभागी होण्यासाठी मतदारांना आता अधिक वेळ मिळणार आहे. फॉर्म सादर करण्याची अंतिम मुदत वाढवल्यामुळे अर्ज न भरलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. अनेकांचे अर्ज प्रलंबित असल्याने भारत निवडणूक आयोगाने सुधारित वेळापत्रक जाहीर करत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त संधी उपलब्ध करून दिली आहे. 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत घराघर जाऊन मतदारांची पडताळणी आणि फॉर्म संकलनाची प्रक्रिया पूर्ण करतील.
CJPच्या कोअर कमिटीची आज संभाजीनगरमध्ये महत्त्वाची बैठक होत आहे. अभिजीत दीपके यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीत संघटनेची पुढील वाटचाल, आंदोलनाची रणनीती आणि भविष्यातील भूमिका निश्चित केली जाणार आहे. सौरभ दास यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बैठकीसाठी दाखल झाल्याने नव्या राजकीय पक्षाच्या चर्चांनाही वेग आला आहे.
राज्यातील पोटखराब, वन आणि वतन जमिनीधारक अनेक शेतकऱ्यांना फार्मर आयडी तयार करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कर्जमाफी आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. या पार्श्वभूमीवर फार्मर आयडीसाठीच्या अटी शिथिल करून पात्र शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या अधिकृत एक्स हँडलवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या कथित आक्षेपार्ह पोस्टनंतर नांदेडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली. राज्य उपाध्यक्ष कैन्हया कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली.
थकीत पगाराची मागणी केल्याच्या रागातून मुक्ताईनगर ढाबामालकाने सुरक्षारक्षकाच्या डोक्यात काठीने मारहाण केली. ही घटना मुक्ताईनगर -बऱ्हाणपूर महामार्गावरील उचंदा शिवारात घडली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ५५ वर्षीय सुरक्षारक्षकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. गोकुळ तारासिंग जाधव (वय ५५, रा. मुक्ताईनगर, मूळ रा. निंबादूर, जि. बऱ्हाणपूर) असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव आहे.
राज्य शासनाच्या कामगार विभागणी 13 जुलैला काढलेला अध्यादेश बांधकाम कामगारावर घोर अन्याय करणारा असून तो रद्द करावा या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक झाली असून कामगार संघटनेने धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केल आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातील आज तिसरा दिवस असून, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये पुन्हा एकदा जोरदार संघर्ष होण्याची शक्यता आहे. विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली असून, आजचे संसदीय कामकाजही गदारोळात पार पडण्याची चिन्हे आहेत. सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी एकजूट दाखवली असून, अनेक महत्त्वाच्या विषयांवर सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) हँडलवरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह उल्लेखाच्या निषेधार्थ नांदेड शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली. राज्य उपाध्यक्ष कैन्हया कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.