Maharashtra Politics Live Update : गुंड निलेश घायवळ विरोधात 'ब्लू कॉर्नर' नोटीस

Marathi latest Politics live news updates : जिल्हा परिषद, पंचायत समिती गट आणि गणाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. काँग्रेस पदाधिकारी मामा पगारे यांच्या संघावरील वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे. एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर टीका केली आहे, यासह राज्यभरातील विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Beed Crime: बीडच्या कारागृहात धर्मांतरासाठी मारहाण

बीड कारागृहातून जामिनावर बाहेर आलेल्या कैदाने कारगृहाचे अधिक्षक पेट्रस गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, गायकवाड हे कैद्यांवर धर्मांतरणासाठी दबाव टाकत मारहाण करत असल्याचे कैद्याने म्हटले.

Pune : गुंड निलेश घायवळ विरोधात 'ब्लू कॉर्नर' नोटीस

पुणे पोलिसांकडून इंटरपोल शी पत्र व्यवहारानंतर गुंड निलेश घायवळ विरोधात 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी करण्यात आली आहे. फौजदारी गुन्ह्यांत सहभागी असलेल्या आरोपींच्या तपासासाठीची माहिती आणि ठावठिकाणा मिळावा यासाठी ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते.

Ajay Bagul Arrested : भाजप नेते सुनील बागूल यांना अटक

नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजप नेते सुनील बागूल यांना अटक केली आहे. गंगापूर गोळीबार प्रकरणात सुनील बागुल यांच्यासह त्यांचा पुतण्या अजय बागुलला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मुख्य आरोपी अजय बोरीा आणि तुकाराम चोथवे हे अद्याप फरार आहे.

पाच समुद्रकिनाऱ्यांना 'ब्लू फ्लॅग पायलट' दर्जा -अदिती तटकरे

महाराष्ट्रातील 5 समुद्रकिनाऱ्यांनी 'ब्लू फ्लॅग पायलट' हा आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवला आहे. समुद्रकिनाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व पर्यावरण स्नेही धोरणांतून भविष्याची वाट निश्चित करण्यासाठी आपण केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना आलेले हे यश प्रेरणादायी आहे. आंतरराष्ट्रीय ब्लु फ्लॅग पायलट दर्जासाठी महाराष्ट्रातील पाच समुद्रकिनाऱ्यांची घोषणा "ब्ल्यू फ्लॅग इंडिया" या संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.' महाराष्ट्रातील पर्णका बीच (डहाणू, पालघर), श्रीवर्धन बीच (रायगड), नागाव बीच (रायगड), गुहागर बीच (रत्नागिरी) आणि लाडघर बीच (रत्नागिरी) या समुद्रकिनाऱ्यांना मिळालेले हे यश म्हणजे शाश्वत आणि जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या शासनाच्या कटिबद्धतेची आणि दूरदृष्टीच्या कामाची पावती आहे. भविष्यात आपल्या किनाऱ्यांवर जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील, ज्यामुळे पर्यटन वाढेल आणि स्थानिक रोजगाराला चालना मिळेल हा मला विश्वास आहे, असे अदिती तटकरे यांनी म्हटले.

'प्रधानमंत्री धन–धान्य कृषी' योजनेचा शुभारंभ

'प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजने'चा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृह, पुसा, नवी दिल्ली येथून दूरदृष्यप्रणालीद्वारे झाला. प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत राज्यातील ९ जिल्ह्यांची निवड झाली असून केंद्राच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे यांचा सन्मान

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जालिंदरनगर (कनेरसर) (ता.खेड) आणि वाबळेवाडी (ता. शिरुर) शाळेत राबविण्यात येणारे नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तापूर्ण, दर्जेदार, तंत्रज्ञानयुक्त शिक्षण, लोकसहभागातून शाळा विकास आदी बाबींची राज्य शासनाने दखल घेतली असून या बाबी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या आहेत, त्यामुळे या शैक्षणिक पॅटर्नची राज्यभरामध्ये अंमलबजावणी करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

Maharashtra Politics Update : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूच्या बैठकीत शरद पवार, अजित पवार पुन्हा एकत्र येणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज एकत्र येणार आहेत. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये दुपारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला दोन्ही नेते एकत्र येतील. या बैठकीमध्ये साखर कारखान्यांच्या संदर्भात महत्त्वाची चर्चा होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com