Maharashtra Political Live updates : मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार

Marathi latest Politics live news updates : राज्यात सोयाबीन हमी भाव केंद्र केंव्हा सुरू करणार असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. यासह राज्यातील आणि देशातील आज 16 ऑक्टोबरच्या विविध घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Live Updates
Maharashtra Live Updatessarkarnama

मंत्री माणिकराव कोकाटेंचे बंधू आज भाजपमध्ये प्रवेश करणार

राज्याचे क्रीडामंत्री व राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे हे आज अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का आहे.

गोकुळच्या कार्यालयात आंदोलनकडून जनावरे घुसवण्याचा प्रयत्न; पोलीस आणि आंदोलकांमध्ये राडा

Gokul Dudh Mahasangh : मोर्चात जनावरे आणल्याने पोलिसांकडून जनावरे हटवण्याचा प्रयत्न

गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली संस्थाचालक आणि जिल्ह्यातील दूध संस्था व दूध उत्पादक आपल्या गायी व म्हशींसह शासकीय विश्रामगृहापासून ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयावर मोर्चा काढणार आहेत. मात्र, मोर्चामध्ये कोणतेही जनावरे आणू नका अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्या होत्या. पण त्यानंतरही दूध उत्पादकांनी जनावरे आणल्याने पोलिसांनी ही जनावरे हटवण्याची केली मागणी. आंदोलन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने पोलिसांनी दबावाचा वापर करत जनावरे मोर्चातून बाहेर काढली.

Gokul Dudh Mahasangh : गोकुळच्या मोर्चात आंदोलन आणि पोलिसांमध्ये झटापट

गोकुळच्या मोर्चात आंदोलन आणि पोलिसांच्या झटापट

मोर्चात जनावरे आणल्याने पोलिसांकडून जनावरे हटवण्याचा प्रयत्न

त्यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांच्या झटापट झाली आहे.

डिबेंचरची रक्कम कपात केल्यानंतर आक्रमक झालेल्या संस्थाचालकांचा गोकुळवर आज मोर्चा काढण्यात आला आहे.

Supriya Sule : यंदा दिवाळी साजरी करणार नाही, पवार कुटुंबियांचा मोठा निर्णय

यंदा दिवाळी साजरी करणार नाही, पवार कुटुंबियांचा मोठा निर्णय घेतला असून, सुप्रिया सुळेंनी याबाब ट्विट करत माहिती दिली आहे.

PM Modi News : पंतप्रधान मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर; 13,430 कोटी योजनांचा करणार शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. ते १३,४३० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. ते कुर्नूल येथे होणाऱ्या सुपर जीएसटी-सुपर सेव्हिंग्ज कार्यक्रमातही सहभागी होतील, ज्यासाठी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना आमंत्रित केले आहे.

दिल्लीप्रमाणे मुंबईही भाजप नवं कार्यालय उभारणार, 18 ऑक्टोबरला भूमिपूजन

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भाजपने पक्षाचं मोठं भव्य असं कार्यालय उभारलं आहे. असचं कार्यालय आता मुंबईतही उभारलं जाणार आहे. या नव्या प्रदेश कार्यालयाचं 18 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडणार आहे.

मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत 17 ऑक्टोबरला बीडमध्ये महाएल्गार सभा

मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये महाएल्गार सभा होणार आहे. या सभेची तयारी आता बीडमध्ये वेगाने सुरू असून गावोगाव बैठका घेतल्या जात आहेत. या सभेसाठी मंत्री छगन भुजबळ, आमदार, धनंजय मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे लक्ष्मण हाके उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक सुभाष राऊत यांनी दिली आहे

NCP SP : तीन जिल्ह्यांत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार

जेष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुलढाणा, हिंगोली आणि अहमदनगरच्या जिल्हाध्यक्षांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे आता ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे.

Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, 34500 बोनस जाहीर

नवी मुंबई महापालिकेने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन 2024 - 25 या आर्थिक वर्षाकरिता महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना 34,500 रुपये तसेच करार / तात्पुरत्या स्वरूपातील कर्मचारी यांना 28,500 आणि आशा वर्कर यांना 18,500 रुपयांचा रक्कमेचे सानुग्रह अनुदान म्हणजेच दिवाळी बोनस जाहीर केला आहे.

चितळे उद्योग समूहाकडून मुख्यमंत्री सहायता निधीस 1 कोटींची मदत

चितळे उद्योग समूहाने पूरग्रस्तांसाठी एक कोटीची मदत दिली आहे. चितळे उद्योग समूहाने आपली सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीस एक कोटीची मदत केली. या मदतीचा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

राजकारणात महिलांच्या बाबतीत खालच्या पातळीवर टीका करणे योग्य नाही - रूपाली चाकणकर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर केलेली टीका आणि त्यानंतर दिलीप पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीबाबत केलेलं वक्तव्य हे अत्यंत चुकीची आहे. राजकारण हे आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि राजकारणामध्ये अशी टीकाटिप्पणी करणे योग्य नाही, असं मतं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. राज्य महिला आयोगाकडे तक्रार झाली असती तर टीका करणाऱ्यांना नोटीसा पाठवली असती असंही त्या म्हणाल्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com