

डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्स मारहाण झाल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत पाच जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती देताना डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमांडे यांनी सांगितले की, शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्याशी मारहाण व गैरवर्तन झाल्याप्रकरणी संबंधित पाच आरोपींविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता निर्माण झाली असून शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार अशी चर्चा होताना दिसत आहे. याबाबत जयंत पाटील आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यात मुंबईत बैठक झाल्याचे बोले जात असतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीतून या चर्चांवर महत्त्वाचे विधान केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील दहिवली येथील शेलारवाडीतील दरड दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या दोघांचे मृतदेह अखेर एनडीआरएफच्या पथकाने शोधून काढले आहेत. दिवसभर चाललेल्या बचावकार्यानंतर शांताराम बाळा शेलार आणि त्यांचा मुलगा सतीश शांताराम शेलार यांचे मृतदेह दरडीखालून बाहेर काढण्यात आले. ही दुर्घटना काल रात्री मुसळधार पावसामुळे घडली होती. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून बचावकार्य आता पूर्ण झाले आहे.
डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरला झालेल्या मारहाणीच्या घटनेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पक्षाचे प्रवक्ते ॲड. नीरज कुमार यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत, कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. ॲड. नीरज कुमार म्हणाले की, कोरोना काळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर हात उचलणे कुठल्याही परिस्थितीत समर्थनीय नाही. मतभेद किंवा तक्रारी असतील तर त्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. हिंसाचार हा कोणत्याही समस्येचे उत्तर असू शकत नाही.
सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मिरजेतील प्रभाग 20 मधील नगरसेविका अश्विनी कोळी यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीकडून अश्विनी दत्तात्रय कांबळे या नावाने त्यांना देण्यात आलेले अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तात्काळ जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातून धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षक कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्री कौटुंबिक वादातून पतीने स्वतःच्या पत्नीवर गोळीबार केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. यावेळी आरोपी पतीनं त्याच्याकडे असलेल्या गावठी कट्ट्यातून तीन राऊंड फायर केल्यानं पत्नी गंभीर जखमी झाली असून नांदेड येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. आरोपी पती गोळीबारानंतर फरार झाला आहे, त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा आणि आषाढी वारी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता २६ जुलै रोजी होणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) आता सहा सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे, विद्यार्थी बहुप्रतीक्षेत असणारी सेट परीक्षा आणखी लांबली आहे.
क्रॉकोच जनता पार्टीचं ट्विटर हँडल पुन्हा बहाल करा असे आदेश दिल्ली हायकोर्टानं सरकारला दिले आहेत. यामुळं या पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वाराणसीहून नागपूरकडे येणाऱ्या दानापूर–सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये नागपूरच्या महिला प्रवाशांसोबत छेडछाड, अश्लील शेरेबाजी व विनयभंग झाल्याचा गंभीर आरोप. बनारस रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दीचा फायदा घेत काही तरुणांनी महिलांचा छळ केल्याचा दावा. महिलांनी प्रयागराज येथे 139 रेल्वे हेल्पलाइन व RPF कडे तक्रार केली. मात्र, तत्काळ मदत मिळाली उलट क्लोज म्हणून सांगितली. आरपीएफ कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत निघून गेल्याचा महिलांचा दावा.
देहूनगरीत संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यानिमित्त सुनेत्रा पवार भक्तिरसात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळालं. टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात त्यांनी महापूजेनंतर वारकरी परंपरेत सहभागी होत तुकोबांच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतलं. देहूमध्ये यावेळी हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळालं
महिलांसाठी रेल्वेचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो. मात्र नागपुरातील काही महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी रेल्वेचा प्रवास अत्यंत वाईट ठरलाय. देवदर्शन करून वाराणसीहून नागपूरकडे परतणाऱ्या महिला प्रवाशांचा दानापूर-सिकंदराबाद एक्सप्रेसमध्ये विनयभंग झाल्याची संतापजनक घटना घडलीय. आरक्षित डब्यात मोठ्या प्रमाणावर विनातिकीट प्रवासी घुसल्यानं गर्दी झाली होती. रात्री डब्यातील लाईट बंद करून काही टवाळखोरांनी महिलांच्या शेजारी झोपण्याचा आणि छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तक्रार करूनही रेल्वे पोलिसांनी वेळेत मदत न केल्यामुळे संतप्त महिलांनी नैनी रेल्वे स्थानकावर रेल्वे रोको आंदोलन केले.
राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षानं पुढील काळात एनडीएसोबत जावे का, यावर पक्षांतर्गत चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यासोबत बैठकही पार पडली असून, एनडीएला थेट पाठिंबा द्यायचा की बाहेरून मदत करायची, याबाबत पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याकडून खासदार आणि आमदारांची चाचपणी सुरू आहे.
नवी मुंबईतील तळोजा येथील सेक्टर दहामध्ये कारचा भीषण अपघात झाला आहे. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने रस्त्यावरील इतर वाहनांना धडक दिली. या अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असून ८ ते १० जण जखमी झाले आहेत.
उमरेडचे काँग्रेस आमदार संजय मेश्राम यांच्या घरात दिवसाढवळ्या चोरी झाली आहे. रोख रकमेसह सह्या केलेले धनादेश चोरट्यांनी लांबविले. बँकेतून पैसे काढत असतानाच चोरट्यांना पकडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आमचं आंदोलन मोठं होऊ नये म्हणून ढगफुटीची अफवा पसरविण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विषय भरकटवून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. शेतकऱ्यांवर अस्मानी आणि सुलतानी संकट आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज नाशिक येथे केली.
आषाढीवारी मधील १० मानाच्या पालख्या ज्या मार्गावरुन जातात त्या मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग/राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना, वारकरी तसेच भाविकाच्या वाहनांना पथकरातून सूट देणेबाबत सार्वजनिकबांधकाम विभागाचे परिपत्रक जारी.
पुढील तीन तासांत पुणे परिसरात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची दाट शक्यता हवामाना विभागाने व्यक्त केली आहे.
नाशिक परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. पहिने भिलमाळ रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला पूल वाहून गेला आहे.नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत मोठी वाढ दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या खालीपर्यंत गोदावरीच्या पुराचे पाणी पोहोचलं आहे. पाण्याची पाणी वाढत आहे.
कसारा घाट माथ्यावर गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे ही दरड कोसळल्याचे समोर आलं आहे.
जुन्या कसारा घाटात दरड माती कोसळायला सुरुवात झाली आहे. घाटातील हिवाळी ब्रिज पॉईंट जवळ जुन्या कसारा घाटात दरड माती महामार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील सर्व 22 धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या काही नद्यांना आज देखील धोक्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील कथित दानप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी दिलेले राजीनामे विश्वस्त मंडळाच्या बैठकीत औपचारिकरीत्या स्वीकारण्यात आले. तसेच नव्याने विश्वस्त मंडळात सहभागी झालेल्या कृष्णमोहन यांच्याकडे सरचिटणीसपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली. ट्रस्टचे खजिनदार गोविंददेव गिरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुंबईच्या मलबार हिल येथील राजभवन परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. राजभवनाच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाचा (एसआरपीएफ) जवान कौस्तुभ सांगळे याने स्वत:वर गोळी झाडून आपलं आयुष्य संपवलं आहे.
गोकुळची निवडणूक 'आजपासून ९० दिवसांच्या आत घ्या' असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तीन ऑगस्टला ही मुदत संपते. तत्पूर्वी मतदान प्रक्रिया सुरू न केल्यास चार ऑगस्टला म्हणजे ९१व्या दिवशी अवमान याचिका दाखल करणार आहे. संस्थेने अधिकाऱ्यांच्या वेळ काढूपणावर ठपका ठेवला आहे, असा इशारा याचिकाकर्ते पुंगाव, ता. राधानगरी मधील श्री स्वामी समर्थ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेने पत्रकाद्वारे दिला.
मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आता ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व गडकिल्ले, धबधबे, धरणे, तलाव आणि नद्यांवर नागरिकांना जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
हवामान खात्याने मुंबईला आज ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर असल्याचं IMD ने सांगितलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने आज पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून पुणे जिल्ह्यासाठी आज अलर्ट जारी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.