Maharashtra Politics Live Updates : सिंहासन खाली करो, ठाकरे आए है.. संजय राऊत जोशात..

महाराष्ट्रातील सर्व राजकीय ताज्या घडमोडी फक्त एका क्लिकवर.. Sarkarnama Live Updates
Sanjay Raut | Raj Thackeray | Uddhav Thackeray
Sanjay Raut | Raj Thackeray | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Sanjay Shirsat : राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर आमचं काही पोट दुखणार नाही

आम्ही 40 चे 60 झालो आहोत. त्यांचा आम्हाला फरक पडणार नाही. हे एकत्र आले तर आम्हाला कौतुक आहे. एकत्र राहा आमचं काही पोट दुखणार नाही. हे सोबत येऊ नये, यासाठी आम्ही काही देव पाण्यात बुडवून बसलेलो नव्हतो. मेळावा चांगला होता, मात्र लोकांचं लक्ष राज ठाकरे काय म्हणतात, याकडं होतं. त्यांनी अतिशय मुद्देसूद आणि संयमी आजच्या मराठी भाषेवर असलेल्या मुद्द्यावर भाषण केलं, अशी प्रतिक्रिया समाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली.

MLA Sanjay Gaikwad : संभाजी महाराज, जिजाऊ, ताराराणी अनेक भाषा शिकले, मग ते.. शिंदेंच्या आमदाराची जीभ पून्हा घसरली

फक्त हिंदीचा विषय नाही, जगात आज टिकायचं असेल तर तुम्हाला अनेक भाषा शिकल्या पाहिजेत. छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकल्या. ते मुर्ख होते का? तसेच शिवाजी महाराजही बहुभाषिक होते. जिजाऊ, ताराराणी, येसूबाई यांनी अनेक भाषा शिकल्या. ते सर्व लोक काही मुर्ख होते का? असेही अपशब्द वापरले.

Sudhir Mungantiwar : उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करणार नाहीत, अशी अपेक्षा करणं चुकीचं

उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करणार नाहीत, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. ते राज्याच्या प्रगतीसाठी काही विषय मांडतील, शोषित पीडित जनतेसाठी काही विषयांची मांडणी करतील ही अपेक्षाच नाही. दोन भाऊ एकत्र आले याचं स्वागत आहे. मात्र, त्यांनी कुठल्या मुद्द्यावर एकत्र यायचं हा त्यांचा विषय आहे. दोन भाऊ एकत्र आल्याने आम्ही आमचा अभ्यास काही कमी करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

Chhagan Bhujbal : ज्या मुद्यावर राज-उद्धव ठाकरे वेगळे झाले ते प्रश्न सुटले का?

निवडणुकांसाठी ते एकत्र येतील का नाही याची मला काही कल्पना नाही? एकत्र येणे शक्य आहे का ते येणारा वेळ सांगेल. दोघांनी आमच्या भांडण पेक्षा मराठी मुद्दा जास्त महत्वाचं आहे असे सांगितले. मनापासून एकत्रीत येणं हे वेगळं आहे, ज्या मुद्यावर ते वेगळे झाले ते प्रश्न सुटले का? कदाचित पुढे जाऊन ते प्रश्न सुटतील देखील. सभा आणि रॅली पुरता ते एकत्र आले आहेत पण त्यांचे मनोमिलन झाले पाहिजे ही लोकांची इच्छा आहे. लोकांची इच्छा आहे ते एकत्र आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी ठाकरेंच्या मेळाव्यावर दिली.

आता पुढे जे बसले आहेत महाराष्ट्राचे शत्रू सत्तेत. त्यांनी आवराआवर केली पाहिजे. सिंहासन खाली करो, ठाकरे आए है ही घोषणा आम्ही देणार आहोत. राणे वगैरे कसले विरोधक आहेत. मोदी आणि शहा यांनी हवा भरलेले फुगे आहेत. कोण शिंदे , कोण राणे. हे मोदी शाह हवा भरतात म्हणून फुगले. टाचणी मारली तर फुटून जातील, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात जून महिन्याचे पैसे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 पासून सुरु करण्यात आली आहे.  या योजनेचा 12 वा हप्ता महिलांच्या खात्यात या निमित्तानं जमा होईल. आदिती तटकरे यांनी जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.  

Nitesh Rane : एकत्र आले, पण नवरा कोण अन् नवरी कोण?

दोन ठाकरे बंधू एकत्र आले ते चांगलंच झालं, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं असा टोला राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी लगावला. यांच्या स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड लोक दिसले, आता यांनी फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची राहिली आहे अशी टीकाही नितेश राणे यांनी केली.

Sanjay Raut : आनंदाचा क्षण, मराठी घराघरात आज गोडधोड होत असेल!

मला वाटतं की आम्ही आज सण साजरा करत आहोत. नक्कीच आनंदाचा क्षण आहे. प्रत्येक मराठी घराघरात या निमित्ताने गोडधोड होत असेल. सण होत असेल. मला घरामध्ये सांगितलं आज इतका मोठा कार्यक्रम होत आहे. आपल्यासाठी आनंदाचा सण आणि क्षण आहे. तुम्ही त्यासाठी सुंदर एक कोट घालून जा. हे मला घरच्यांनी सांगितलं. प्रत्येकाच्या घरातील याच भावना आहेत” असं राऊत म्हणाले.

Ashok Patil Dongaonkar : माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगांवकर यांचे निधन..

माजी राज्यमंत्री माजी आमदार अशोक पाटील डोणगावकर यांचे शनिवारी दुःखद निधन झाले. गेल्या आठ वर्षांपासून ते आजारी होते सरपंच ते राज्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. 1995 ते 97 या काळात शिवसेना भाजप युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री होते. काँग्रेस पक्षातून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात करणारे अशोक पाटील डोणगावकर यांचा जन्म गंगापूर तालुक्यातील डोणगाव येथे 1945 मध्ये झाला. 1977 ते 80 या काळात गावचे सरपंच म्हणून ते कार्यरत होते.

Shivsena News : एक मराठी प्रेमी दुसरा खुर्ची प्रेमी ! ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिवसेनेचे भाष्य..

राज आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्या शिंदेंच्या शिवसेनेची प्रतिक्रिया समोर आली आहे. दोन्ही नेत्यांच्या भाषणाचा दाखला देत शिवसेनेने राज ठाकरे यांची स्तुती केली तर उद्धव ठाकरेंवर टीका. एक प्रबोधक, एक प्रक्षोभक असा टोला शिवसेनेने उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. एक उजवा, दुसरा डावा, एक मराठी प्रेमी दुसरा खुर्ची प्रेमी अशी टीका करण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये हिंदी सक्तीवर काही मुद्दे नव्हते. केवळ आता मला राज ठाकरे यांची गरज आहे. केवळ मला सत्ता आणायची आहे. आम्ही दोघं मिळून सत्ता आणू. हेच मुद्दे भाषणामध्ये होते. मराठी भाषा संदर्भात जी काही जाहिरातबाजी केली होती, ती खोटी ठरली. त्यांचे जे काही गुजराती पार्टनर आणि त्यांचे मुलांचे मित्र कोण आहेत? एकनाथ शिंदे आधी 'जय महाराष्ट्र' बोलले नंतर 'जय गुजरात' म्हणाले होते, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी विजयी मेळाव्यावर बोलतांना दिली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com