Maharashtra Political Live Updates : मुंबईच्या महापौर पदासाठी ज्याच्या जागा जास्त तोच दावेदार... प्रताप सरनाईक म्हणाले, हाच युतीचा फॉर्मुला

महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी सगळ्यात वेगवान फक्त एका क्लिकवर.. Sarkarnama Live Updates
Pratap Sarnaik On Mumbai Mayor News
Pratap Sarnaik On Mumbai Mayor NewsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Municipal Corporation : आम आदमी पार्टीचा ‘आघाडीभंग', महापालिका स्वबळावर लढणार..

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडीला विनाशर्त पाठिंबा देणाऱ्या आम आदमी पार्टीचा आता आघाडीभंग झाला आहे. आघाडीतील पक्ष कोणीच कोणाला मदत करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आपने आगामी महापालिका जिल्हा परिषदेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केला. सोबतच नागपूर महापालिका निवडणुकीचा जाहीरनामासुद्धा प्रकाशित केला.

Latur Farmers : कर्जमाफीसाठी लातूरचा शेतकरी पायी निघाला मंत्रालयाकडे.. 

लातूर जिल्ह्यातील सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी पाठीवर नांगर घेत 500 किमीची पायी पदयात्रा करत थेट मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला आहे. आज त्यांच्या या संघर्षाचा नववा दिवस आहे. डोळ्यांत अश्रू आहेत, पायात चपला नाहीत, फोड फुटले आहेत  पण मनात आहे फक्त एकच ध्यास  कर्जमुक्तीचा आणि न्यायाचा. 

Mhada News  : म्हाडाकडून 5,285 घरांची सोडत जाहीर

कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर) येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5 हजार 285 सदनिका व ओरोस जिल्हा सिंधुदूर्ग,  कुळगाव-बदलापूर येथील 77 भूखंड विक्रीकरिता सोडत जाहीर करण्यात आली आहे. सदर सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेचा शुभारंभ 'गो-लाइव्ह' कार्यक्रमांतर्गत सोमवार 14 जुलै, 2025  रोजी दुपारी 1 वाजता 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

प्रताप सरनाईक यांनी महापालिकेच्या निवडणुका आणि महापौरपद यावर भाष्य केले आहे. हे महायुतीचे सरकार आहे. ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा महापौर होता. तिथे त्याच पक्षाला महापौरपद दिलं पाहिजे. ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याच पक्षाला महापौरपद मिळाला पाहिजे ही महायुतीची सूत्रे असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताखाली आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हाताखाली हे सरकार उत्तम काम करत आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com