तुम्ही अर्बन नक्षलवाद्यांसारखं वागाल, तर तुमची अटक होईल. तुम्ही अर्बन नलक्षवाद्यासारखे वागत नाही, त्यामुळे तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही. जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील, त्यांच्यासाठी हा जनसुरक्षा कायदा आहे. आंदोलकांच्या विरोधात हा कायदा नाही. सरकारच्या विरोधात बोलण्याची पूर्ण मुभा आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेली कमेंट ही कायदा न वाचता केलेली कमेंट आहे, असे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना दिले आहे.
शिवसेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे, त्यानंतर आज सोलापूर शहरातील तब्बल अकरा पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहेत. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर सोलापुरात शिवसेनेला धक्का बसला आहे.
भ्रष्टाचाराने उघड झालेले चेहरे आता आपल्याला जनतेसमोर घेऊन जावे लागतील. त्यांच्या विरेाधात आंदोलन करण्याची वेळ आली असून शिवसेनेकडून लवकरच या भ्रष्टाचाऱ्यांविरोधात आंदोलन करणार आहे. सर्व पुरावे देऊनही कारवाई केली जात नाही, एवढे हतबल मुख्यमंत्री मी यापूर्वी कधी पाहिले नव्हते. कोणी कोणाला जाब विचारू शकत नाही. धुळ्याच्या शासकीय विश्रामगृहात पकडलेली रोकड, पैशाची बॅग घेऊन बसलेले अशी प्रकरणे आहेत. मात्र कारवाई होत नाही, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला
गुजरातमधून बिहारींना एकदा नव्हे; तर दोनदा हाकलून दिलं होतं. पहिल्या वेळी 20 हजार लोकांना हाकलून दिले. अल्पेश ठाकोर यांनी हे आंदोलन केले होते, त्या आंदोलनानंतर त्यांना भाजपत प्रवेश देऊन आमदार करण्यात आले. वीस हजार बिहारींना हाकलून देणाऱ्या माणसाचा गुजरातमध्ये सत्कार आणि सन्मान होतो आणि राज ठाकरे जेव्हा बोलतो, त्या वेळी तो संकुचित आणि देशद्रोही कसा असतो, असा सवालही राज ठाकरे यांनी केला.
शेकापचा 78 वा वर्धापन दिन यंदा पनवेल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी संजय राऊत यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली. यावेळी त्यांनी शेतकरी, कामगार वर्ग जोवर टिकवू, तोवर महाराष्ट्र आपल्या हाती असल्याचे स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर मनसेचे पप्रमुख राज ठाकरे उपस्थित होते.
सध्याचे आजार आणि महाराष्ट्राचं राजकारण फारसं वेगळं नाही अशा शब्दात महाराष्टर नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टिप्पणी केली. शेतकरी कामगार पक्षाच्या (शेकाप) 78 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आवर्जून हजेरी लावली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतही उपस्थित होते. यावेळी त्यांनी त्यांच्या मिश्कील शैलीत भाषण करत राज्यातील सध्याच्या राजकारणावरून टोला लगावला.
शेतकरी कामगार पक्ष अर्थात शेकापचा 78 वा वर्धापन दिन यंदा पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. आज 2 ऑगस्टला नवीन पनवेल येथे शेकापचा वर्धापन दिन मेळावा होतोय. दरम्यान, विशेष म्हणजे या मेळाव्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मंचावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील दिसणार आहेत. कारण पनवेलमधील शेकापच्या मेळाव्याला राज ठाकरेंनी हजेरी लावली आहे. यावेळी एकाच मंचावर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि राज ठाकरे एकाच मंचावर बाजू-बाजूला बसल्याचे पाहायला मिळातंय.
राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे या कालपासून नाशिक दौऱ्यावर आहेत. आज (दि. २) त्यांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा केली.
शेतकरी कामगार पक्षाचा आज 78 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. पनवेल येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेकाप पक्ष जिवंत आहे, हे या मेळाव्यात दिसेल अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांनी दिली.
वाकडं काम केलं तर तुम्हाला सोडणार नाही असा इशारा रोहित पवार यांनी नवनियुक्त कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना दिला आहे. वाकडं करतात त्यांचीच नोंद माणसं ठेवतात असं कृषीमंत्री भरणेंनी म्हटलं होतं. त्यावर रोहित पवारांनी त्यांना हा इशारा दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचा आज 78 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. पनवेल येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच शेकाप सरचिटणीस जंयत पाटील यांच्यासह शेकापची सर्व नेतेमंडळी या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहे.
माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना 10 कोटींची खंडमी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी धमकी देणारा आरोपी दिलशान खान याला अटक केले आहे. मुंबई विमानतळावरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
शेतकरी कामगार पक्षाचा आज (शनिवार) वर्धापन दिन पनवेलमध्ये साजरा केला जाणार आहे. त्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत.
कर्नाटकमधील राजेडी पक्षाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा हे घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. न्यायालायाने या संदर्भात आज निकाल देणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे या आज शरद पवार यांच्या भेटीला गेल्या आहेत. त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. रोहिणी खडसे यांनी पोलिसांवर आरोप करत त्यांच्या विरोधात कोर्टात जाणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्या शरद पवारांच्या भेटीला वेगळेच महत्त्व आले आहे.
जुलै महिन्याचा माझी लाडकी बहिणी योजनेचे 1500 रुपये निधी आठ ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे. 9 ऑगस्टला रक्षाबंधन असल्याने त्याच्या पूर्वसंध्येला निधी महिलांना मिळणार आहे.
यवत प्रकरणातील दोषींवर योग्य ती आणि कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी मी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा अत्यंत दक्ष आहे व परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. जमावबंदी लागू करण्यात आलेली असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करत संयमानं राहावं, असं मी सर्वांना आवाहन करतो. जातीय सलोखा टिकवून ठेवणं ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असे आवाहन अजित पवार यांनी यवतमध्ये झालेल्या दोन गटातील हिंचासाराच्या पार्श्वभूमीवर आवाहन केले आहे.
ईश्वरपूर (पूर्वीचे इस्लामपूर) शहरात भरदिवसा तिघा जणांनी एका रोहित पंडित पवार या रेकाॅर्डवरील आरोपीचा पाठलाग करत खून केला. हल्लेखोरांमध्ये आणि रोहितमध्ये आर्थिक देवाणघेवाणमधू वाद होता. रोहित यांच्या मानेवर डोक्यावर आरोपींनी शस्त्रांनी हल्ला केला त्यात तो गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला
शुक्रवारी संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बिहार मतदारयाद्या पुनरावलोकनावरून चर्चा होती. राज्यसभेत सरकारविरुद्ध आक्रमक सदस्यांना रोखण्यासाठी थेट सरकारकडून थेट कमांडो बोलावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. खासदार प्रमोद तिवारी यांनी हा लोकशाहीतील काळा दिवस असल्याचे म्हणत सरकारचा निषेध केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.