
मराठी चित्रपटांना स्क्रीन न दिल्याबद्दल तसेच नवीन मराठी चित्रपट प्रदर्शित होताच एका आठवड्यात चित्रपट गृहातून काढल्याबद्दल शिंदेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आलं. या पक्षाकडून चित्रपटगृह व्यवस्थापनाला निवेदन देण्यात येणार आहे. परिस्थिती न सुधारल्यास मोठं आंदोलन करण्याचा दिला इशाराही शिवसेनेनं दिला आहे. शिवचित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार आणि विभागप्रमुख कुणाल सरमळकर यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं.
विश्रांतवाडी : येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील लिफ्ट गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे बंद असून नागरिक आणि कर्मचाऱ्यांची दररोज तारांबळ उडत आहे. गुरुवारी दुपारी वडगावशेरीचे आमदार कार्यालयात बैठक घेण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच प्रशासनाने घाईघाईत लिफ्ट दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ बोलावले. मात्र, लिफ्टची दुरुस्ती सुरू असतानाच दोन कर्मचारी लिफ्टमध्ये अडकले. तब्बल १० ते १५ मिनिटानी त्यांची सुटका करण्यात आली. सुदैवाने जीवितहानी टळली.
देशातील आघाडीच्या ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्रा. सुलोचना गाडगीळ (वय ८१) यांचे बेंगळुरू येथे निधन झाले. गेल्या पाच दशकांपासून हवामानशास्त्र आणि विशेषत: मॉन्सूनवर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. मॉन्सूनवर संशोधन करणाऱ्या जगातील प्रमुख शास्त्रज्ञांपैकी त्या एक होत्या.
सध्या ‘सैयारा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असून बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली आहे. पण याच सिनेमामुळे थिएटर मालकांनी ‘येरे येरे पैसा 3’ या मराठी चित्रपटाच्या शो कमी केल्याने मनसे आक्रमक झाली आहे. जर मराठी चित्रपटांचा शो कमी केले किंवा नाकारले तर मनसेकडून खळ्ळखट्याकचा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातून धक्कादायक अपडेट समोर येत आहे. सुमारे 40 ते 50 कोटी रुपये किमतीचे 39 किलो ॲम्फेटामाईन ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. जळगावातील महामार्ग पोलिसांनी बोढरे फाटा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये 25 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आहे. वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सरकारवर विरोधकांचा दबाव वाढतच चालला आहे. याचदरम्यान, फडणवीस आणि शाह यांच्यातील भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
छावा संघटनेचे प्रदेशाध्य़क्ष विजय घाडगे यांनी शुक्रवारी(ता.25) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवारांशी काय काय चर्चा झाली याची माहिती दिली. यावेळी घाडगे यांनी सूरज चव्हाण यांना आता पुन्हा पक्षात घेतलं जाणार नाही असं अजित पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे सूरज चव्हाण यांना लातूरमधील मारहाण प्रकरण भोवणार असल्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट घेतली. राज्याचा आर्थिक कारभार शिस्तबध्दपणे सुरू असल्याचे त्यांनी या भेटीत म्हटले आहे. तसेच या भेटीत राज्यातील काही महत्वाच्या प्रकल्पांच्या निधीबाबतही चर्चा झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
औरंगाबाद शहर व जिल्ह्यात मागील सहा वर्षात वर्ग २ जमिनीचे वर्ग १ मध्ये बेकायदेशीररित्या रूपांतर करुन संगणमताने कोटयावधीचा भ्रष्टाचार होत असल्याचा दावा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. हे काम करणारे भुमाफिया, दलाल आणि संबंधित महसुल अधिकारी यांची उच्चस्तरीय चौकशी करुन फौजदारी कारवाई करावी आणि जमिनींची पुनर्तपासणी करुन ती मूळ स्थितीत पुन:वर्गीकरण करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
छावा संघटनेचे नेते विजय घाडगे यांनी शुक्रवारी पुण्यात अजित पवारांची भेट घेतली. या भेटीदरम्यान अजित पवार यांनी लातूरमध्ये मारहाणीचा संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला. तर घाडगे यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी अजित पवारांकडे केली. त्यांची हकालपट्टी न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा घाडगेंनी दिला आहे.
दिल्लीत काँग्रेसतर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठं विधान केले आहे. ते म्हणाले, मी २००४ मध्ये राजकारणात आलो. पण त्यावेळी ओबीसींच्या समस्यांकडे तितक्या गांभीर्याने लक्ष देऊ शकलो नाही. अन्यथा त्याचवेळी जातनिहाय जनगणना केली असतील. ती माझी चूक होती, काँग्रेसची नाही, असे राहुल म्हणाले आहेत.
छावा संघटनेचे नेते विजय घाडगे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुण्यात भेट घेणार आहे. त्यांचे शिष्टमंडळ पुण्यातील सर्कीट हाऊस येथे दाखल झाले आहे. याठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. छावाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून माध्यमांसमोर ही भेट व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सूरज चव्हाण व इतर कार्यकर्त्यांनी लातूर येथे बेदम मारहाण केली होती.
भाजपच्या नेत्या व माजी खासदार पूनम महाजन यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. संसद भवनामध्ये ही भेट झाली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या मंदिरात आरती करण्यासाठी त्यांना आमंत्रित केल्याची माहिती पूनम महाजन यांनी सोशल मीडियातून दिली आहे.
दिल्ली येथे 'द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) तर्फे साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांना 'इंडस्ट्री एक्सीलन्स अवॉर्ड २०२५' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कारखान्याच्या माध्यमातून मिळालेले हे पुरस्कार म्हणजे कारखान्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान असल्याची भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
जलजीवन मिशन योजनेच्या दीड कोटींच्या थकीत बिलामुळे कंत्राटदार असणाऱ्या सांगलीच्या हर्षल पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्याप्रकरणी शिवसेना नेते, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजीनामाची मागणी आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. गुलाबराव पाटलांनी केलेलं विधान बेजबाबदारपणाचे असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी खोतांनी केली आहे.
मराठी भाषेच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात निशिकांत दुबेंचा समर्थक देवता पांडेय याला अटक केली आहे. झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबुलाल मरांडी यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिकी शेअर केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयासाठी बँकेतून घेतलेले 100 कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक नुकतीच संपली आहे. मराठीच्या मुद्यांवर मराठी खासदार एकत्र आले, ही आनंदाची बाब आहे, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केले. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
हडपसर येथून नागपुरकडे निघालेल्या दारु विक्री करणाऱ्या एका अवैध ट्रकवर राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे-बोर्डिकर असं नाव ठळक अक्षरात लिहिण्यात आले आहे. हा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. ट्रकवर भाजप आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांचे नाव असल्याचे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून निषेध करण्यात आला. मुंबई आग्रा महामार्गावरील बाबळे फाट्यावर येथे कोकाटेच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी कृषिमंत्री कोकाटे यांची गाडी कार्यक्रम स्थळी पोहोचत असताना अडवण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सुत्रांनी दिली. येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार असल्याची माहिती आहे. य़ा निवडणूका तीन टप्प्यांत होतील. सुरवातीला जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नंतर महापालिकेची निवडणूक होईल.
मक्कल निधि मैयम (एमएनएम) पक्षाचे प्रमुख आणि अभिनेता कमल हासन आज राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी त्यांनी तमिलनाडूतील सत्ताधारी डीएमके सोबत जुळवून घेतले आहे. द्रमुकने त्यांना मिळालेल्या सहा जागांपैकी एक जागा कमल हासन यांच्या पक्षाला दिली आहे.
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभांमध्ये जागा वाढवण्यासाठी सीमांकन प्रक्रिया राबवावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
संजय राऊत म्हणाले, मी मागील काही दिवसांपासून सांगत होतो की चार मंत्र्यांना मंत्रिमंडळातून जावे लागेल. संजय शिरसाठ, माणिकराव कोकाटे, योगेश कदम आणि संजय राठोड यांना जावे लागेल, अशी दिल्लीत आता चर्चा आहे.
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर याचे नाॅन क्रिमीलेअर प्रमाणपत्र नाशिकच्या विभागीय आयुक्तांना चुकीचे ठरवले आहे.दरम्यान, पूजा हिचे ओबीसी प्रमाणपत्र कायम ठेवण्यात आले आहे.
देशाच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहण्याचा इंदिरा गांधींचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोडला आहे. शुक्रवारी (ता.२५ )नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत. सलग पंतप्रधानपद भूषवण्याचा इंदिर गांधींचा विक्रम मोडत मोदी हे दुसऱ्या स्थानी आले आहेत. इंदिरा गांधी यांनी १९६६ ते १९७७ अशा 11 वर्षात सलग ४०७७ दिवस पंतप्रधानपद भुषवले होते. सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवण्याचा विक्रम अजुनही पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे.
पुणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३-४ तासांत या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तर. रायगड, कोल्हापूर, सातारा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली तसेच नागूपर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील आळते आणि खानापूर तालुक्यातील कार्वे या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला शीवरस्ता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पुढाकाराने व दोन्ही गावच्या सरपंचांच्या सहकार्याने खुला करण्यात आला. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासह कोणत्याही वैयक्तिक कारणांसाठी, इतर पात्र रजेव्यतिरिक्त, दरवर्षी ३० दिवसांची भरपगारी सुट्टी घेता येणार आहे. तसेच २० दिवसांची अर्धवेतन रजा, ८ दिवसांची कॅज्युअल रजा आणि २ दिवसांची मर्यादित सुट्टी घेता येणार आहे. केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली आहे.
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयीचे केलेल्या वक्तव्यबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल नाशिकमध्ये खटला सुरु आहे. गुरुवारी या खटल्याची सुनावणी झाली. न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीत महिला उमेदवारांची सासर आणि माहेरकडील तिची दोन्ही नावे ईव्हीएमवर येतील,असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.