Maharashtra Politics Update - ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचाही पाठिंबा

Sarkarnama Headlines Updates : राज्यातील दिवसभरातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर...
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

हिंदी सक्तीविरोधात मनसेसह रस्त्यावर उतरू - आदित्य ठाकरे

हिंदीची सक्ती नसावी आणि आपण पाहतोय, जे महाराष्ट्र तोडूफोडू अन् राजकारण करू हे जे भाजपचं धोरण आहे, त्याविरोधात आम्ही सगळेच एकत्र येत आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे असेल आम्ही सगळे एकत्र येऊन रस्त्यावर लढू. महाविकास आघाडीतील अन्य पक्ष असतील किंबहूना भाजपमधील जर कोणी मराठी प्रेमी असेल आणि जर लाज उरली असेल तर त्यांनीही यावं.

ठाकरे बंधूंच्या मोर्चाला पवारांचा पाठिंबा

शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हिंदी भाषेच्या सक्ती विरोधात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मोर्चा काढण्याचे ठरवले आहे. या मोर्चाला आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. तर काँग्रेसनेही ठाकरे बंधूंच्या या निर्णयाचे स्वागत केलेले आहे.

अपघातग्रस्त युवकाच्या मदतीला धावून आले भुजबळ!

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ येवला मतदार संघातील कामकाज आटोपून नाशिकला येत होते. यावेळी संभाजीनगर महामार्गावर नांदूर नाका येथे वाहन चालकाच्या चुकीमुळे गंभीर अपघात झाला. सुदैवाने यात अन्य वाहन चालक सावध असल्याने कोणतीही प्राणहानी झाली नाही. नेमके याचवेळी मंत्री भुजबळ यांच्या वाहनांचा ताफा जात होता. त्यांनी वाहन थांबून संबंधित जीप चालकास मदत केली. ताफ्यातील पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. जखमी चालकाला रुग्णालयात रवाना करण्यात आले. चालवताना मोबाईल वापरणे घातक असूनही वाहनचालकाकडून ती चूक झाल्याने पोलिसांनी आणि खुद्द मंत्री भुजबळ यांनी त्याला समज दिली.

डोंबिवलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अन् मनसे पुन्हा एकत्र

राज्य शासनाच्या हिंदी सक्ती विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. डोंबिवलीमधून मोठ्या प्रमाणात नागरिक मोर्चात सहभागी होतील. असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सांगितले आहे. यावेळी मनसेचे नेते राजू पाटील यांनाही सोबत येण्याविषयी आवाहन करू असेही त्यांनी सांगितले, यामुळे पुन्हा एकदा डोंबिवलीत मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती दिसणार याची चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com