Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde
Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shindesarkarnama

Narendra Modi Cabintet : महायुतीच्या पिछाडीचे मोदींच्या मंत्रिमंडळात रिफ्लेक्शन, मित्रपक्षांना नगण्य स्थान

Loksabha Election Result 2024 Shivsena BJP : शिंदे गटाला उमेदवारांना भाजपने ताकद दिली मात्र त्या ताकदीचा योग्य वापर करण्यासाठी शिंदे गटाकडे यंत्रणा नव्हती.
Published on

Loksabha Election Result : नरेंद्र मोदी सरकार 3.0 मध्ये भाजपने महाराष्ट्रातील मित्रपक्ष शिवसेनेला (शिंदे गट) अवघे एक राज्यमंत्रीपद दिले आहे. तर, अजित पवार गटाला देखील मंत्रि‍पदासाठी वाट पाहण्यास सांगून योग्य तो संदेश दिला आहे. महाराष्ट्रात झालेला पराभव हा भाजच्या जिव्हारी लागल्याचेच यातून दिसत आहे.

शिंदे गटाचे 7 खासदार विजयी झाले असतानाही त्यांना एक राज्यमंत्रिपद (स्वतंत्र कार्यभार)देण्यात आला. त्याहून जास्त राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना देणे शक्य नसल्याचा सांगण्यात आल्याचे समजते. शिंदे गटाला कॅबिनेटची अपेक्षा होती मात्र ती पूर्ण होवू शकली नाही.

शिंदे गटाला उमेदवारांना भाजपने ताकद दिली मात्र त्या ताकदीचा योग्य वापर करण्यासाठी शिंदे गटाकडे यंत्रणा नव्हती. त्यामुळे भाजपची मदत घेण्यास शिंदेंचे उमेदवार सरस ठरले नाहीत. शिवाय अजित पवार गटाने अपेक्षे इतकी चांगली कामगिरी केली नाही. त्यांना त्यांची मते देखील टिकवता आली नाहीत, असे भाजपला वाटते.

Ajit Pawar, Narendra Modi Eknath Shinde
Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संपूर्ण यादी ; वाचा फक्त एकाच क्लिकवर!

संख्याबळ कमी असताना देखील एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देण्यात आले. ते समजून घेत शिंदे गटानेही केंद्रीय मंत्रिमंडळात अवाजवी मागणी केली नाही मात्र भाजपने मंत्रिमंडळात अत्यल्प प्रतिनिधित्व देत आगामी राजकारणाची चुणूक दाखवल्याचे मानले जाते.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com