Maharashtra Politics News live : मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणे म्हणजे प्रशासनाचा नाकर्तेपणा - रोहित पवार

Sarkarnama Headlines Updates : राज्य व देशातील राजकीय व प्रशासकीय बातम्या वाचा एका क्लिकवर...
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar : खडसेंच्या मुलीची छेड प्रशासनाच्या नाकर्तेपणा - रोहित पवार

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी रोहित पवार यांनी प्रशसानावर ताशेरे ओढले आहे. ट्विट करत पवार म्हणाले आहेत की, टवाळखोरांनी शासकीय सुरक्षा असतानाही मुलींची काढलेली छेड हे प्रशासनाच्या नाकर्तेपणाचे लक्षण नाही का? इतकं होत असतानाही सरकार मात्र निव्वळ राजकीय पतंगबाजी करण्यात व्यस्त आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी आरोपींना अद्दल घडेल अशाप्रकारची कारवाई करावी व राज्यभरात महिला सुरक्षेबाबत सरकारने कठोर उपाययोजना कराव्यात, ही विनंती.

मविआ एकत्र दिसत नाही- मुख्यमंत्री फडणवीस

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की महाविकास आघाडीकडून आम्हाला ९ पानांचे पत्र देण्यात आले आहे. मात्र, या पत्रात दोन आमदारांच्या सह्याच नाहीत. त्यामुळे ते कुठे आहे हे मला शोधावे लागेल. हम साथ साथ हे म्हणणारी महाविकास आघाडी एकत्र दिसत नाहीत.

Vijay Wadettiwar: मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का? - विजय वडेट्टीवार

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली आहे. पोलिस सुरक्षा असताना केंद्रीय मंत्र्यांच्या मुली आज महाराष्ट्रात सुखरूप नाही तिथे शेतात, नोकरीवर जाणाऱ्या सामान्य आई वडिलांच्या मुली दररोज स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी काय ‘स्ट्रगल‘ करत असतील आणि किती मानसिक त्रास त्यांना सहन करावा लागत असेल हा अंदाज महायुतीतील मंत्र्यांना नाही.लाडक्या बहिण म्हणून मिरवणाऱ्या महायुती सरकारला त्यांच्याच केंद्रीय मंत्र्यांनी आरसा दाखवला आहे.आता तरी मुख्यमंत्री,दोन उपमुख्यमंत्री जागे होणार आहेत का? असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला आहे.

Shivsena : दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी

ठाकरे गटाच्या वतीने रविवारी ठाण्यात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी आनंदआश्रमासमोर ठाकरे-शिंदेंची सेना आमने-सामने आली आहे. यावेळी दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.

Rupali Chakankar : समाजातील ही विकृती कमी झाली पाहिजे

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीबाबत जो प्रकार घडला. त्याकडे मी स्वतः लक्ष दिले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. त्या टवाळखोराला पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे. बऱ्याच गोष्टी समोर येतील. यात जो दोषी आढळला जाईल, त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. त्या टवाळखोरांनी व्हिडीओ काढला. गार्डने त्यांना खाली आणल्यानंतर हटकले होते. यापूर्वी त्या टवाळखोरांवर गुन्हा दाखल आहेत. ही लोकं, माणसाच्या कळपातील विकृती आहेत. ही विकृती कमी झाली पाहिजे, असे चाकणकर यांनी म्हटले.

Balasaheb Ajbe : सुरेश धसांकडून आष्टीमध्ये आमची अडवणूक : बाळासाहेब आजबे

आष्टी मतदारसंघात आमची कामं भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून अडवली जात आहेत. कार्यकर्त्यांची बिलं अडवली, त्यासंदर्भात तक्रार करूनही महायुतीकडून दखल घेतली जात नसेल तर स्वतंत्र निर्णय घेऊ. भले एमआयएममध्येही जाऊ, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार बाळासाहेब आजबे यांंनी दिला आहे.

रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री भरत गोगावले आणि खासदार सुनिल तटकरे यांनी एकत्रित एकाच गाडीतून प्रवास केला. त्यामुळे रायगडचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटणार असल्याचे बोलले जाते.

रक्षा खडसेंच्या मुलीची छेड; महिला आयोगाने घेतली दखल

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याच्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. या प्रकारात मी स्वतः लक्ष दिले आहे. गुन्हा दाखल झालेला आहे, त्या टवाळखोर याला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतले असेल. आता बऱ्याच गोष्टी समोर येतील, जो यात दोषी आढळले जाईल त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहे.

Raksha Khadse Daughter Molestation: केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या मुलीसोबतच छेडछाड

केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड केल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी चार टवाळखोरांच्या विरोधात मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tuljapur Drug Case live: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण 12 आरोपी

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणांमध्ये राजकीय लोकांचे फास आवळले जात आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात राजकीय पार्श्वभूमी असलेला मोरक्या पिंटू मुळे याला अटक करण्यात आली आहे. त्याला 13 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणात सुरवातीला पकडण्यात आलेल्या तीन आरोपींना पोलीस कोठडी संपल्यानंतर आता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात एकूण 12 आरोपी असल्याची पोलिसांना माहिती आहे.

Trupti Desai News : पुण्याला बदनाम केलं म्हणता तर स्वारगेट नेपाळमध्ये आहे का? तृप्ती देसाईंचा रूपाली ठोंबरे पाटलांना सवाल

स्वारगेट येथे झालेल्या अत्याचार प्रकरणाला आता वेगळे वळण पाहायला मिळत आहे. आरोपीच्या वकीलांनी केलेल्या दाव्यामुळे सध्या टीका होत असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत पुणे नाहकच बदनाम झाले आहे, असे म्हटलं आहे.

Anjali Damania News : धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अन्यथा आम्ही पेटून उठू

धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. यानंतर आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जोरदार हल्लाबोल करताना, धनंजय मुंडे यांना बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. वाल्मिक कराड हाच खरा सूत्रधार असून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, अन्यथा आम्ही पेटून उठू असाही इशारा सरकारला दिला आहे.

Bharat Gogawale News : भरत गोगावलेंची आदिती तटकरेंवर कुरघोडी

उपमंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी पुन्हा एकदा मंत्री आदिती तटकरेंवर कुरघोडी केली आहे. देवाच्या दर्शनावरून त्यांनी आदिती तटकरेंवर निशाना साधताना पहिलं दर्शन घेईल त्यालाच देव पावतो. आता पर्यंत जे मागितलं ते देवानं दिलं आहे. आता मनात आहे ते देखील मिळेल, असे म्हणत आदिती तटकरेंना डिवचलं आहे.

Prashant Koratkar : शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्याला न्यायालयाकडून अंतरिम जामीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रशांत कोरटकरने केले होते. यानंतर राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याच्या अटकेची मागणी होत असतानाच कोरटकरला न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Chandrasekhar Bawankule News : सर्व प्रकारचे दाखले आता फक्त 48 तासांत

महसूल खात्यामार्फत लोकांना 48 तासांत जातीचे, तसेच विविध प्रकारचे दाखले दिले जातील, अशी ग्वाही राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शी व गतिमान सरकारची विकासकामे आणि शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले.

Dhananjay Munde News : धनंजय मुंडे राजीनामा देणार? जवळच्या व्यक्तीच्या पोस्टमुळे चर्चेला उधाण

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरून विरोधक अधिवेशनात गोंधळ घालण्याची शक्यता आहे. पण याच्याआधीच ते राजीनामा देतील अशी फेसबुक पोस्ट त्यांच्या जवळच्या व्यक्तीने केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ही पोस्ट करूणा मुंडे यांनी केली आहे.

Himani Narwal Murder Case News : भारत जोडो यात्रेत सामील झालेल्या काँग्रेसच्या महिला नेत्याची हत्या; सुटकेसमध्ये सापडला मृतदेह

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय असणाऱ्या तसेच ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या रोहतकच्या नेत्या हिमानी नरवाल यांची हत्याची घटना उघडकीस आली आहे. त्यांचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडल्याने हरियाणात खळबळ उडाली आहे.

Maharashtra Politics News : उद्यापासून विधिमंडळाचे अधिवेशन; विरोधकांना घेरण्यासाठी प्रश्नच प्रश्न

सोमवारपासून (ता.3) राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, स्वारगेट बलात्कार घटना, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासह कायदा-सुव्यवस्थाच्या प्रश्नावर आवाज उठवता येणार आहे. तर याच अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मविआला मिळणार का? याचेही उत्तर मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com