पुणे : अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा ‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या सिनेमाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातील काही वादग्रस्त दृश्यांमुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी वादात सापडला आहे. याबाबत महिला आयोगाने पत्र लिहून चित्रपटावर नाराजी व्यक्त केली आहे.
‘वरन भात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ मधीलआक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकावेत,'' अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत मांजरेकरांना नोटीस पाठविली आहे. याबाबत खुलासा करण्यास सांगितले आहे. हा सिनेमा १४ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.
मांजरेकरांनी या चित्रपटांचा ट्रेलर १० जानेवारी रोजी युट्यूबवर प्रदर्शित केला आहे. याबाबत विविध स्तरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यात एक महिला व अल्पवयीन मुलांचे दृश्य आहे, यावरुन आँनलाइन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. यामधील काही आक्षेपार्ह विधान, दृश्य आहेत, ते काढून टाकावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. या तक्रारींची दखल महिला आयोगाकडे घेतली असल्याचे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) सांगितलं. ''मांजरेकरांनी याबाबत नोटीस पाठविली असून त्यांनी भूमिका स्पष्ट करावी,'' असे या आयोगाने पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. मुंबईतील गिरणी कामगारांच्या आयुष्यावर हा सिनेमा असल्याचे समजते. राष्ट्रीय महिला आयोगाकडेही याबाबतची तक्रार आली आहे. त्यांनी आक्षेपार्ह सीन चित्रपटातून काढून टाकावेत,'' अशी मागणी माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.
सिनेमाचा ट्रेलर फेसबुक, युट्युब, ट्विटर इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दर्शकांसाठी वयाचे कोणतेही बंधन न ठेवता प्रसारित केला गेला आहे. अल्पवयीन मुलांसाठीही तो पाहण्यासाठी उपलब्ध आहे, जे निश्चित नियमापलीकडचं आहे, असे आयोगाने पत्रात म्हटलं आहे. प्रोमोमधील काही दृश्यांवर भारतीय स्त्री शक्ती या संस्थेने राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावत केंद्रीय माहिती प्रसारण खात्याकडे तक्रार केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.