फडणवीस यांच्यावर खोटारडे आरोप करत मलिक स्वतःची कबर खणत आहेत

(Bjp State President Chandrakant Patil) कोणावर तरी निष्ठा दाखविण्यासाठी फडणवीसांवर आरोप करत नवाब मलिक खड्ड्याच्या दिशेने धावत आहेत, असा टोला देखील पाटील यांनी लगावला.
Chandrakant Patil-Nawab Malik
Chandrakant Patil-Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी नवाब मलिक यांचे गैरव्यवहार उघडकीस आणल्यानंतर मलिक सैरभैर झाले आहेत. फडणवीस यांच्यावर बेछूट आणि खोटारडे आरोप करून ते स्वतःची कबर स्वतःच खणत असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आम्ही सर्वजण एकजुटीने देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

नवाब मलिक हायड्रोजन बॉम्बचा स्फोट करणार होते, पण त्यांनी प्रत्यक्षात फुसके आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नवाब मलिक हादरले आहेत आणि सैरभर झाले आहेत. टाडाच्या आरोपींकडून कवडीमोल किंमतीने जमीन खरेदी केल्याचे ते स्वतःच मान्य करत आहेत.

नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर गुन्हेगारांना मदत केल्याचा आणि राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचा आरोप केला. भारतीय जनता पार्टी हा आरोप स्पष्टपणे फेटाळते. भाजप फडणवीस यांच्या पाठीशी आहे, असेही पाटील म्हणाले.

फडणवीस यांनी आता एकाच विषयाची माहिती उघड केली आहे, त्यांच्याकडे इतरही अधिकची माहिती आहे. ती ते योग्य यंत्रणांकडे सादर करणार आहेत. त्यानुसार जी चौकशी आणि कारवाई होईल त्याला तोंड देण्याचा विचार नवाब मलिक यांनी करावा. कोणावर तरी निष्ठा दाखविण्यासाठी फडणवीसांवर आरोप करत नवाब मलिक खड्ड्याच्या दिशेने धावत आहेत, असा टोला देखील पाटील यांनी लगावला.

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा बाबत बोलतांना पाटील म्हणाले, भाजपा एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना पाठिंबा देण्याने राजकारण होत असेल तर भाजपा ते राजकारणही करेल. राज्य सरकारने गेल्या १७ महिन्यांचा पगार द्यावा आणि पंधरा हजार रुपये बोनस द्यावा या एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ताबडतोब मान्य केल्या पाहिजेत. त्यांच्या इतर मागण्यांबाबतही चर्चा केली पाहिजे.

Chandrakant Patil-Nawab Malik
विधान परिषदेसाठी भाजपकडून संजय केनेकर यांना उमेदवारी निश्चित !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com