Manikrao Kokate : ‘रमी’च्या धक्क्यातून सावरताच कोकाटेंकडे नवी जबाबदारी : अजितदादांनी दिवाळीपूर्वी दिले मोठे गिफ्ट!

NCP leader Manikrao Kokate News update: कोकाटे यांचा अधिवेशनात ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडिओ आपण पाहिला होता. त्यांनंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणावरुन विरोधकांनी महायुती सरकार विरुद्ध रान पेटवलं होते.
Manikrao Kokate
Manikrao Kokate Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. याच रमी डावाने कोकाटेंकडून कृषी खातं गेलं अन् क्रीडा खात्यावर डिमोशन झालं. त्यानंतर कोकाटे फारसे सक्रिय नव्हते, पण आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी त्यांना पुन्हा सक्रिय केले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर असताना कोकाटेंवर राष्ट्रवादीने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्याच्या संपर्कमंत्री म्हणून अजितदादांनी त्यांची नियुक्ती केली आहे. जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्याच्या संपर्कमंत्रीपदी त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी ताकद आहे. पण धुळे आणि जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षवाढीसाठी त्यांना प्रयत्न करायचे आहेत.

राज्याचे कृषिमंत्री असताना माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशनात सभागृहात ऑनलाइन रमी खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यांनंतर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणावरुन विरोधकांनी महायुती सरकार विरुद्ध रान पेटवलं होते. राज्य सरकारवर चारही बाजूने टीका झाल्यावर कोकाटेंचे क्रीडा मंत्रीपदावर डिमोशन द्यावे झाले होते.

Manikrao Kokate
Bapu Pathare: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमदाराच्या विरोधात गुन्हा; अजित पवार समर्थकाच्या तक्रारीवरुन कारवाई

दरम्यान, नाशिकचे पालकमंत्री रिक्त असताना महापालिका निवडणुकीत कोकाटे हे नाशिकचे संपर्कमंत्री झाल्याने गिरीश महाजन यांना नाशिकमध्ये आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याकडे लक्ष देणे अधिक सोयीचे ठरणार आहे. कोकाटेंचा नाशिकमध्ये जनसंपर्क दांडगा असल्याने त्यांचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होईल, या उद्देशाने राष्ट्रवादीने त्यांच्याकडे धुळे, जळगावसह नाशिकच्या संपर्कमंत्रीपदी नियुक्ती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com