Manoj Jarange Maratha Reservation Indefinite Hunger Strike : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) आंदोलनाबाबत षडयंत्र रचत असून, याबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे माणसे देखील आहेत.
फुटीर लोकांना बरोबर घेऊन दिल्ली घेऊन जात आहेत. षडयंत्र काय आहे दोन-तीन दिवसात कळेल, पण हेतू मात्र निश्चित कळाला आहे, असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालवली आहे. बोलताना त्यांच्या आवाजात कंप सुटला आहे. 'साम टीव्ही'शी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'OSD'च्या छुप्या कारवायांवर गंभीर आरोप केला.
सरकार आणखी एक षडयंत्र रचत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'OSD' काही माणसं दिल्लीपर्यंत घेऊन जात आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माणसे देखील सहभागी आहेत. हा षडयंत्र सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यात नेमकं काय होत आहे, हे कळायला दोन-तीन दिवस लागतील. परंतु हेतू निश्चित कळाला आहे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांचा 'OSD' दिल्लीपर्यंत माणसं कशी घेऊन जात आहे हे आम्ही सर्व कळतं. ही फुटीर माणसं आहेत. त्यांना बकरा केले जात आहे. डाव काय रचला जात याची माहिती आम्हाला मिळते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे 'OSD' मुख्यमंत्र्यांबरोबर राहून हसून-खेळून गोड बोलून मराठ्यांचा कार्यक्रम करत आहे. 'OSD' चे असे दोन-चार वेळा प्रकार झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या 'OSD' ने मराठ्यांच्या अन्नात तेल का ओतत आहे. त्यांनी गपचूप बसावे. सरकारच्या सर्व यंत्रणा, संस्था असून देखील आमच्यासारख्या गोरगरिबांच्या पोराला हे माहित होत आहे, हे काय कमी आहे का? 'OSD' आता दिल्लीपर्यंत लोकांना घेऊन जाऊ लागले आहेत. मुंबई संपली आता. तिकडून काय साचा बनवून आणत आहे, हे थोड्याच दिवसात कळेल. मला बदनाम करतील किंवा मराठ्यांना बदनाम करतील असे म्हणून काय सरकार, काय 'OSD', असे मनोज जरांगे यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांच्या 'OSD' बरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माणसे बरोबर आहेत. काहीही षडयंत्र रचू देत त्याचा काहीच परिणाम होणार नाही. यातून 'OSD' फक्त मुख्यमंत्र्यांची बदनामी करेल. 'OSD' यांचे तेच काम दिसते आहे. चांगले करायचे काम केली पाहिजे. फुटलेल्याला लोकांना जवळ करता. गोरगरिब मराठा समाजाला जवळ करा. काय करायचे ते तुमचं तुम्हाला लक लाभ असेही मनोज जरांगे यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.