Maratha Reservation: मराठा आरक्षणावर आज तोडगा निघणार? दोन नेत्यांच्या भेटीकडे लक्ष

Uday Samant and Vikhe Patil to meet over Maratha reservation issue: मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा वाढत आहे. उद्या (ता.29) सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर राज्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना होत आहेत.
Maratha Reservation
Maratha Reservation sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षण मिळवून परत येणार, असा ठाम निर्धार करुन मराठा आंदोलन मनोज जरांगे (Manoj Jarange)हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. त्यांच्यासोबत हजारो आंदोलक आहेत. मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण पाटील, आणि शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्यामध्ये बैठक होणार आहे.

मुंबईत सकाळी अकरा वाजता दोन्ही नेत्यामध्ये ही चर्चा होईल. जरांगे यांचे आंदोलन, मराठा समाजाची आरक्षणाची मागणी याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. बंद दाराआड चर्चा होणार नाही, असे जरांगे यांनी गणेशचर्तुथीच्या दिवशी जाहीर केले आहे.

मंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर मंत्री विखे पाटील यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की सामंत यांच्या भेटीबाबत प्रयोजन नाही. अशा कुठल्या भेटी संदर्भात माझं अन् मंत्री उदय सामंतांशी बोललं झालेलं नाही. पण आज पुन्हा या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

Maratha Reservation
Congress News: संघटनात्मक बांधणी अन् मतदार याद्यांच्या पडताळणीसाठी काँग्रेस सज्ज

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील मराठा समाजातील नागरिकांनी महिनाभर पुरेल एवढे धान्य घेऊन आंदोलनात सहभागी झाले आहेत. गहु, ज्वारी, किराणा, गॅस आदी साहित्य घेऊन आंदोलक मोर्चात सहभागी झाले आहेत.मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम सध्या जुन्नरमध्ये आहे. येथे आज सभा होणार असून त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने निघणार आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला राज्यातून पाठिंबा वाढत आहे. जालन्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्या (ता.29) सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत.त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Maratha Reservation
Amit Satam: मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष अमित साटम यांच्या समोरील 'ही' आहेत प्रमुख आव्हाने

मराठा समजाला ओबीसींतून आरक्षण घेऊन परतणार, हा त्यांचा निर्धार आहे. मराठा समाजाच्या न्यायहक्काची लढाई जरांगे यांनी अधिक तीव्र केली. हजारो आंदोलकांचे हे वादळ मुंबईत धडकणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com