Maratha Reservation : मराठा समाजासाठी मोठा निर्णय, मराठा-कुणबी दाखले रद्द होणार नाहीत..., मराठा कक्षावर विशेष जबाबदारी!

Maratha-Kunbi Certificates Maratha Cell : मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा कुणबी, कुणबी मराठे दाखले रद्द होत असलेल्या तक्रारची दखल घेण्यात आली.
Maratha Reservation
Maratha Reservation sarkarnama
Published on
Updated on

Maratha Cell News : राज्य सरकारने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी मनोन जरांगेंनी सरकारला इशाऱ्या दिल्यानंतर सरकार सरकार अॅक्शन मोडवर आले आहे. राज्यात मराठा आरक्षण कक्षावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत सामान्य प्रशासन विभागात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्याला मंजुरी देण्यात आली. आता मराठा आरक्षण कक्षासाठी विधी सचिव ऐवजी अवर सचिव पदाची निर्मिती केली जाणार आहे.

मराठा-कुणबी दाखल रद्द होत असल्याची तक्रार मनोज जरांगे पाटील यांनी करत थेट सरकारला इशारा दिला होता. त्याबाबत देखील सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. मराठा कुणबी नोंदी आणि जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द होऊ नयेत यासाठी मराठा आरक्षण कक्ष काम करणार आहे.

Maratha Reservation
Manoj Jarange patil : मराठा-कुणबी दाखल्यांच्या व्हॅलिडिटीवरून मनोज जरांगेंचा एल्गार; ' कॅमेऱ्यासमोर दाखवले पुरावे, फडणवीस-शिंदेंना थेट सवाल

शिंदे, फडणवीस टार्गेटवर

पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांना सूचक इशारा दिला, ‘चूक सुधारा, अन्यथा कधी न पाहिलेले दिवस पाहावे लागतील’, असे ते म्हणाले. साताऱ्याच्या राजेंनीच नव्हे, तर सर्वच मराठा आमदार आणि खासदारांनी जातीच्या लेकरांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

Maratha Reservation
Maratha-Kunbi Certificates : मनोज जरांगेंच्या दाव्यातील सरकारने हवाच काढली; वैध मराठा-कुणबी प्रमाणपत्रांची आकडेवारीच दाखवली, मराठवाड्यातही तब्बल 20 हजार....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com