Political News : राज्य सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी दिलेला शब्द पाळला नाही, त्याशिवाय सरसकट गुन्हे मागे घेतले नाहीत त्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. सरकारने विनाकारण तिघावर कारवाई केली त्यामुळे आमचा सरकारवर विश्वास राहिला नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारच्या कामगिरीविषयी नाराजी व्यक्त केली.
छत्रपती संभाजी नगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटलांवर उपचार सुरु आहेत. त्या ठिकाणी जाऊन सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व रोहयो मंत्री संदीपान भुमरे व जालन्याचे पोलीस अधीक्षक बलकवडे आदी जण उपस्थित होते. यावेळी शिष्टमंडळाने राज्य सरकारकडून सुरु असलेल्या कारवाईच्या माहितीचे पत्र दिले. यावेळी शिष्टमंडळाने जरांगे पाटील (Manoj Jharange ) यांच्या सोबत चर्चा केली.
राज्य सरकारला वेळ मागितला त्यावेळी दिला नाही. विशेषतः अडचणी काय ते समजून घ्याला हव्या आहेत. राज्यात ५४ लाख कुणबी नोंदी आढळल्या आहेत. जर ठरल्याप्रमाणे राज्य सरकारने केले तर समाधान वाटेल. सरकारने विनाकारण तीन जणांवर कारवाई केली. सरकारने दिलेला शब्द पाळला जात नसल्याने अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
मीडियासमोर हो म्हणता अन नंतर ..
मराठा आरक्षणप्रश्नी ठरल्याप्रमाणे करा. त्याप्रमाणे तुम्ही केले तर विरोध करणार नाही पण जर मीडियासमोर हो म्हणता अन नंतर त्यावर काहीच होत नाही. यावेळी शिष्टमंडळाने राज्य सरकारकडून सुरु असलेल्या कारवाईच्या माहितीचे पत्र दिले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यावेळी बॊलताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले, मराठा आरक्षणबाबतीत अडचणी काय आहेत तुम्हाला माहित आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गोष्टी होत आहेत. मराठा आरक्षणबाबतीत राज्य सरकारने शब्द फिरवला नाही. काम सध्या सुरु आहे.
तुमच्यातला एक माणूस फार गडबड करतोय
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी तुमच्यातला एक माणूस फार गडबड करतोय, असा कुणाचे नाव न घेता मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
(Edited by Sachin Waghmare)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.