Chhatrapati Sambhaji Nagar News: मराठा आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारकडून लिखित मसुदा अद्याप न मिळाल्यामुळे संताप व्यक्त केला आहे. मसुद्यावर सही करण्यासाठी मंत्र्यांच्या हातात ताकद नाही का, असा सवाल करत फराळ भरपूर करा आणि आधी सह्या करा, असा टोलाही त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
उपोषणस्थळी येऊन या मंत्र्यांना बोलायला कसं जमतं. आम्हाला नादी लावू नका. केवळ सह्यांसाठी जर लिखित मसुदा आम्हाला मिळत नसेल तर आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही दोन दिवस म्हटले होते, आता सात-आठ दिवस झाले आहेत. आम्हाला आडमुठी भूमिका घ्यायची नाही म्हणून तुम्हाला वेळ देत आहोत.
आमची चेष्टा करू नका, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. इतर जातींमध्येही आता कुणबी नोंदी आढळून येत आहेत. त्यांनीही आरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे आता छगन भुजबळ यांची फजिती होणार आहे. आता भुजबळ कोणाकोणाला विरोध करणार, आता त्यांच्या काय भावना आहेत. यावर भुजबळ यांनी उत्तर द्यावे, असे जरांगे यांनी म्हटले.
मनोज जरांगे हे पत्रकार परिषदेत बोलत होते. मारवाडी, लिंगायत, माळी, मुस्लिम, आदिवासी आणि धनगर यांच्या कागदपत्रांमध्ये कुणबी अशा नोंदी आढळून आल्या आहेत. त्यांच्याकडूनही ओबीसी आरक्षणाची मागणी करण्यात येत असल्याचे जरांगे यांना पत्रकारांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी याचे उत्तर छगन भुजबळ यांनी द्यावे.
भुजबळ एकटेच आरक्षणास विरोध करतात, त्यांनी विरोध बंद करावा आम्ही त्यांच्याविरोधात काही बोलणार नाही, असे स्पष्ट करत धनगर समाज जागा झाला याचा आनंद आहे. मराठा समाजाप्रमाणे आम्हाला पण धोका देण्यात आला आहे, अशी भावना धनगर समाजात झाली आहे, पण धनगर समाजाने भावनेच्या आहारी जाऊ नये, त्यांनी कोणाच्या नादी लागू नये. आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांनी एक राहिले पाहिजे. मराठा समाजाचं आणि धनगर समाजाचं दुखणं एकच आहे, असे ते म्हणाले.
मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. तुम्ही आठमुठेपणा केला तर आम्हीही बघून घेऊ. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. आता चौथा टप्पा असेल. असे सहा टप्पे असतील. सरकारने जास्तीचे मनुष्यबळ द्यावे.
सध्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. या मोहिमेमुळे मराठा समाजाचे लपवून ठेवलेले आरक्षण आता समोर येत आहे. मुख्यमंत्री लिखित स्वरूपात जे देणार आहेत, ते लवकर द्यावे. वेग वाढला तर २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळून जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.