Maharashtra Politics Live Update : बच्चू कडू यांना लोणीच्या युवा शेतकऱ्याचं प्रत्युत्तर; वाहन फोडणाऱ्या तीन लाख रुपये देणार

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates : काँग्रेस आज मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्याजवळ फलटण डाॅक्टर महिलेच्या आत्महत्येप्रकरणी आंदोलन करणार आहे, नगरपंचायत आणि नगरपरिषदेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे यासह 10 नोव्हेंबर 2025 च्या राज्य आणि देशभरातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेऊया.
Bachchu Kadu
Bachchu KaduSarkarnama

BJP Politics : बच्चू कडू यांना लोणीच्या युवा शेतकऱ्याचं प्रत्युत्तर; वाहन फोडणाऱ्या तीन लाख रुपये देणार

'प्रहार'चे बच्चू कडू यांना भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील लोणी इथून एका युवा शेतकरी प्रतीक कदम यांनी फोन करून प्रतिक्रिया दिली. 'तुमचे वाहन फोडताना, तीन लाख रुपये देणार', असे प्रत्युत्तर दिले. बच्चू कडू यांनी काल माध्यमांना प्रतिक्रिया देताना, 'मंत्री विखे पाटलांची वाहन फोडणाऱ्यांना एक लाख रुपये देणार', असे म्हटले होते.

NCP Baramati Politics : जय पवार निवडणूक लढविणार नाही; अजित पवार यांची माहिती

जय पवार बारामती नगरपरिषदेची निवडणूक लढविणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. जयबाबत तसं मी काही ऐकलं नाही. तसे काही होणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले.

ब्रम्हपुरीत भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

ब्रम्हपूरी तालुक्यातील हळदा, मुडझा, वांद्रा, कोसंबी, बल्लारपुर, चिचगाव, आक्सापुर, बरडकीन्ही तसेच गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथील शेकडो भाजपा कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, तालुका काँग्रेस सरचिटणीस गुरुदेव वाघरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे यांसह अन्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस युवक अध्यक्षाकडून पत्नीला पेटवण्याचा प्रयत्न

बुलढाण्यातील युवक काँग्रेस अध्यक्ष विशाल काकडे यांने अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीवर राॅकेट टाकून पेटवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने पत्नीने साडीला लागलेली आग पाणी टाकून विझवली. या प्रकरणी चिखली शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

महेश गायकवाडांची संपर्कप्रमुखपदी नियुक्ती

महेश गायकवाड यांची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या कल्याण पूर्व आणि उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिंदेंनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी, उपजिल्हाप्रमुख मल्लेश शेट्टी, शहरप्रमुख निलेश शिंदे उपस्थित होते.

विकास म्हात्रेंचा शिवसेनेत प्रवेश

कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रातील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये विकास म्हात्रे, कविता म्हात्रे आणि नंदू धुळे - मालवणकर या तीन माजी नगरसेवकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला.

उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

पहिल्या टप्प्यात होणाऱ्या नगरपंचायत, नगपरिषदेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com