
जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतालगत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेतमजुराच्या लहान मुलावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात बाबु नारायण कापरे (वय ८) या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत महापालिका निवडणूकीचे बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इचलकरंजीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. 15 ते 19 डिसेंबरदरम्यान सभागृहात हजर राहा'असा व्हिप भाजपच्या खासदारांना बजावण्यात आला आहे. भाजप खासदारांना 3 ओळींचं व्हिप पाठवण्यात आला आहे.
ठाकरे सेनेतील नेत्य तेजस्वी घोसाळकर यांनी शिवसेनेला राम राम करुन आज भाजप मध्ये प्रवेश केला. भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.
राजगुरुनगर मध्ये विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला झाल्याची घटना सकाळी घडली होती. यात त्या मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात महायुतीत मोठा भाऊ कोण यावरून शिवसेना-भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. भाजप अंतर्गत सर्व्हेचा दाखला देत जास्त जागांसाठी आग्रही आहे. आतापर्यंतच्या निवडणुकांचा दाखला देण्यासही शिवसेना विसरली नाही. संभाजीनगर महापालिकेत कायमच शिवसेनेच्या जास्त जागा होत्या त्यामुळे नेहमीच ते मोठ्या भावाच्या भूमिकेत होते याची आठवणही शिवसेनेनं करून दिली आहे.
राजगुरूनगरमध्ये खासगी क्लासेसमध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केल्याचे समोर आले आहे. हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरून फरार झाला आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून तेजस्वी घोसाळकर हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली.
राज्य निवडणूक आयोगाची आज महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील २९ महापालिका निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर आचारसंहिता लागू होणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनाला मोठा धक्का बसणार आहे. माजी नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. 'साम टीव्ही'ने या संदर्भातील वृत्त सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
मावळमध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याची बातमी अत्यंत संतापजन आणि चीड आणणारी आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मान्य केलं, हे बरं झालं, आता या गुन्ह्यांना आळा घालण्याची जबाबदारीही राज्य सरकारवर आहे. त्यामुळं या गुन्ह्यातील आरोपीलाही फाशीची शिक्षा व्हावी तसंच हा खटला फास्टस्ट्रॅक कोर्टात चालवावा, ही विनंती! अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याच्या हस्ते अहिल्यादेवी होळकरांच्या अश्वारूढ पुतळयाचे होणार लोकार्पण होणार आहे. अहिल्यादेवी यांची त्रिजन्म शताब्दी साजरी होत असून यानिमित्ताने हा पुतळा उभारण्यात आला आहे.आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा सोहळा पार पडणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील,आमदार गोपीचंद पडळकरांसह विविधी मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.