
पैठणमध्ये उमेदवाराच्या घरासमोर जादूटोण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार मंगल कल्याण मगरे यांच्या घरासमोर लिंबू, नारळ, हळद, कुंकू एक बाहुली ,टाचण पिना आणि पुजलेली टोपली आढळून आलीये. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे. यामुळे पैठण शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईतील बांद्रा न्यायालयाला बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने आज मोठी खळबळ उडाली. ई-मेलद्वारे धमकी मिळताच सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयाचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला. पोलिस आणि बॉम्ब निरोधक पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. या पार्श्वभूमीवर दुपारी 3 वाजेपर्यंत न्यायालयाचे सर्व कामकाज तहकूब करण्यात आले.
सांगली जिल्ह्यातील राजकारणात मोठी उलथापालथ होत असून काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. सांगली–मिरज–कुपवाड महानगरपालिकेचे दोन माजी महापौर, एक माजी उपमहापौर आणि किमान १२ माजी नगरसेवक अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याने जिल्ह्यात राजकीय भूकंप झाला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.
छत्रपती संभाजीनगरजवळील ओहर गावात जमिनीच्या वादाने हिंसक वळण घेतलं. जुन्या वादातून 11 जणांच्या टोळक्याने माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची लोखंडी रॉड आणि लाठ्या-काठ्यांनी हल्ला करून हत्या केली. या हल्ल्यात अन्य तिघे जखमी झाले असून, संतप्त जमावाने आरोपींच्या दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा काबू पथक तैनात केले असून, याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे....
काँग्रेस विधान परिषदेच्याआमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे, त्यांनी राजीनामा विधीमंडळ सचिवांकडे सुपूर्द केला. त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
पुणे महापालिकेसाठी भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत बैठक होत आहे. या बैठकीत भाजपकडून आज चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर मुख्य शहरातील पदाधिकारी उपस्थित राहणा तर शिवसेनेकडून उदय सामंत, निलम गोऱ्हे, शहर प्रमुख नाना भानगिरे उपस्थित राहणार मात्र, एकनाथ शिंदेंचे पुणे महानगर प्रमुख असलेल्या रवींद्र धंगेकर यांना या बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.
आमदारा प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत. त्या विधान परिषदेच्या आमदारकीची राजीनामा देखील देण्याची शक्यता आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना भेटण्यासाठी वेळ मागितल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रभूषण प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे मध्यरात्री एकच्या सुमारास निधन झाले. नुकताच महाराष्ट्रभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकतीच त्यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केली होती.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माणिकराव कोकाटे यांचा सहज राजीनामा घेणे शक्य असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी तसे केले नाही. याचा अर्थ ते कोकाटेंच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा मलिन करत असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.