
गेली चार वर्षे भारतीय जनता पक्षात असलेले माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्यातील गेल्या तेरा वर्षांत असलेला अबोला मिटला. आमच्यात वैयक्तीक भांडण कधी नव्हतं. पण कार्यकर्त्यांना न्याय देताना आमच्यात मतभेद होते. पण ते आता मिटले आहेत, असा दावा दानवे आणि लोणीकर यांनी केला आहे.
मी माझ्या भागात करून दाखवलं म्हणून मी अंबाजोगाईला येऊन सांगतो की आपणही तसं करा. बरेच पुढारी येतात आणि असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, असे सांगतात. त्यांची शहरं एकदम घाण, भकास आणि बकाल असतात. मला सहा सहा वेळा अनेक पक्षांनी मला उपमुख्यमंत्री केलं किंवा मला अर्थमंत्रिपद दिलं. मला काहीतरी अक्कल आहे, म्हणूनच दिलं ना. आता माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीच मागं मला उपमुख्यमंत्री केलं. आता मी त्यांच्याबरोबर नाही, म्हणून आरोप करतात, हे वागणं बरं नव्हं, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील नतेमंडळींना लगावला.
नगरविकास मंत्री मीच आहे. नगरपालिका आणि नगरपंचायती माझ्याकडे आहेत, त्यामुळे कोणी कितीही आवाज केला तरी आवाज फक्त एकनाथ शिंदेंचाच चालेल, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
शहादा येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “लाडक्या बहिणीची ताकद ज्याच्या मागे त्याला कुणी हरवू शकत नाही,” तसेच पुढे जोडले, “भाजपाच्या हातात सत्ता दिली तर आम्ही खंबीर पाठीशी उभे राहू.”
रायगड : नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने रायगडमध्ये राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. कोण खरं बोलतोय, कोण खोटं बोलतंय यासाठी देवासमोरील फुल उचलण्याचं आव्हान एकमेकांना दिलं जात आहे. त्यातच आता शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले त्याहीपुढे गेल्याचं दिसतंय. विधानसभेत ज्याने कुणी चुकीचं काम केलंय, त्याचा सत्यानाश होऊ दे, वाटोळं होऊ दे असं भरत गोगावले म्हणाले. भरत गोगावलेंनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर निशाणा साधल्याचे दिसत आहे.
The passing of Dharmendra Ji marks the end of an era in Indian cinema. He was an iconic film personality, a phenomenal actor who brought charm and depth to every role he played. The manner in which he played diverse roles struck a chord with countless people. Dharmendra Ji was…
— Narendra Modi (@narendramodi) November 24, 2025
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन झाले असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही काळाने त्यांचे निधन झाले. 'धर्मेंद्र यांचं जाणं हे खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच अत्यंत शोकदायक असंच म्हणावं लागेल.' आपल्या अभिनयातून भारतीयांच्या भावना अचूकपणे मांडणारे कलाकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि चाहते मुंबईत त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमा होत आहेत.
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना पुन्हा रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. वृत्तानुसार, 'गेल्याच आठवड्यामध्ये त्यांना रुग्णालयातून घरी पाठवलं होतं आणि त्यानंतर आता ते पुन्हा एकदा रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलं जातंय'. काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती आणि आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक असेल, असे विधान केले होते. यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. बावनकुळे यांच्या मते, 'कुठलीही निवडणूक शेवटची नसते, प्रत्येक निवडणुकीचं वेगळं महत्त्व असतं'. ठाकरे हे भावनिक वातावरण तयार करून मते जिंकण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला.
अनंत गर्जेंच्या घरी फॉरेन्सिक पथक दाखल झाले आहे. फॉरेन्सिक पथकासोबत डॉक्टरही उपस्थित आहे. डॉ. गौरी आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेची चौकशी केली जाणार आहे.
कोल्हापूर जवळ विमानतळाशेजारील जागा खुली करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहे. पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली. रस्ता बंद असल्याने नागरिकांचे हाल होत आहे, आम्हाला जुनाच रस्ता पाहिजे, या मागणीवर तामगावचे ग्रामस्थ ठाम आहेत.
नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगाव जिल्ह्यात आज पहिली सभा होत आहे. नगरपरिषद निवडणुका तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय घोषणा करतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. फडणवीस यांच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात त्यांची जाहीर सभा होणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी जिल्ह्यातील पहिली प्रचारसभा आहे.
पुणे महापालिकेच्या प्रारूप मतदार यादीवर ४ दिवसात १७१ हरकती आल्या आहेत. सर्वाधिक हरकती हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडे आल्या आहेत. हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालयाकडे ५२ हरकती आल्या आहेत. वारजे, ढोले पाटील रोड, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात एक ही हरकतीची नोंद नाही.
देशाचे ५३ सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती न्यायमूर्ती सुर्यकांत यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे कोकण महोत्सवात येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक गाफील राहू नका, असे आवाहन केले. गाफील राहिला तर महापालिका मराठी माणसाच्या हातातून गेली म्हणून समजा असे ते म्हणाले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, यावेळेस फक्त एवढीच विनंती आहे की, जो कमळ चिन्हावर उभा राहील त्यालाच मतदान करा.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, चंद्रशेखर बावनकुळेसाहेब, काँग्रेसच्या नेत्यांकडे लक्ष देण्यापेक्षा सरकारी जमिनी लाटणा-या माफियांकडे लक्ष द्या! वाळू चोर, मुरुम माफियांकडे लक्ष द्या! तलाठी कार्याल, तहसील पासून मंत्रालयातल्या आपल्या कार्यालयात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीकडे लक्ष द्या! आपण राज्याचे महसूलमंत्री असून कोण कोणाकडे पहात आहेत याकडेच पहात बसला आहात आणि अजित पवारांचे चिरंजीव हजारो कोटींच्या सरकारी जमिनी नावावर करून घेत आहेत. जरा तिकडे लक्ष द्या नाही तर महसूल मंत्रीपद ही कोणीतरी नावावर करून घेईल.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. लातूर जिल्ह्यातील रेणापूर नगरपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाच्या 16 उमेदवारांपैकी 11 जणांनी माघार घेतली आहे. या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला पत्नीच्या आत्महत्ये प्रकरणी अटक केली आहे. गौरी गर्जेच्या आत्महत्येनंतर अनंत फरार होता. रविवारी रात्री मध्यरात्री वरळी पोलिसांनी त्याला अटक केली.
नगरपंचायत, नगरपरिषद निवडणुकीचा प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फोडणार आहेत. त्यांची पहिली सभा त्रंबकेश्वरमध्ये होणार आहे. तर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील नाशिक जिल्ह्यात आज प्रचार करणार आहेत. नाशिक जिल्ह्यातीलील सटाणा, मनमाड आणि सिन्नरमध्येमध्ये त्यांची सभा होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.