
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता 8 वी) शिष्यवृत्ती परीक्षा 2026 च्या तारखेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता ही परीक्षा 8 फेब्रुवारी 2026 ऐवजी आता 22 फेब्रुवारी 2026 ला घेतली जाणार आहे.
मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांमध्ये 11 लाखांहून अधिक दुबार मतदार आढळून आल्यानं खळबळ उडाली आहे.धक्कादायक बाब म्हणजे या दुबार मतदारांच्या यादीत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचंही नाव समोर आल्यानं राजकारण तापलं आहे. या संतापजनक प्रकारानंतर किशोरी पेडणेकर यांनी आगपाखड केली आहे. “निवडणूक आयोगाने कुणाच्या घरी बसून हे कांड केलं? यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.
हर्षवर्धन सकपाळ यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळाल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी जहरी शब्दात टीका केली आहे. सचिन गुजर यांचं अपहरण केल्यानंतर सकपाळ यांनी आज श्रीरामपुर येथे जाऊन गुजर यांची विचारपुस केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी जल्लाद म्हणून उल्लेख केला आहे. जल्लाद हा फासावर लटकवण्याचं काम करतो. तसंच देवेंद्र फडणवीस हे देखील लोकशाहीला फासावर लटवकण्याच काम करत असल्याची टीका सकपाळ यांनी केली आहे.
निवडणूक आयोगाने यापूर्वी प्रारुप मतदार याद्या जाहीर केल्या आहेत. मात्र, या मतदार याद्यांमध्ये अद्यापही घोळ आणि दुबार मतदारांची संख्या मोठी असल्याने आता नव्याने मतदार प्रारुप याद्या तयार करण्यात येणार आहेत. कारण, एकट्या मुंबईतच 11 लाख दुबार मतदार आढळून आल्याने ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला आहे. आता, मतदार यादीचा सुधारीत कार्यक्रम आयोगाकडून जाहीर करण्यात आलाय. यापूर्वी अंतिम मतदार यादीसाठी 5 डिसेंबर ही तारीख होती, आता 20 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
आमदार संतोष बांगर यांनी आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर थेट निशाणा साधला. बांगर यांनी दावा केला की, मुटकुळे यांचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून पळून गेले आहेत, तर आपले ३४ उमेदवार अजूनही मैदानात आहेत. मुटकुळे यांचे नाव न घेता, “मला कोणतंच व्यसन नाही,” असे सांगत बांगर यांनी टोला लगावला. त्यांच्या जलव्यामुळे मुटकुळेंची साखर ५५० पर्यंत पोहोचल्याचा दावाही त्यांनी केला. तसेच, मुटकुळेंना विविध ठिकाणी अडकल्याचे आणि त्यांच्या ड्रायव्हरवर गुन्हे असल्याचे बांगर यांनी सूचित केले.
सोलापूर सत्र न्यायालयाने उज्ज्वला थिटे यांचा अपील अर्ज फेटाळला आहे. या निर्णायविरोधात आम्ही उच्च न्यायालयात जाऊ अशी भूमिका उज्वला थिटे यांनी मांडली आहे. जर तिथूनही न्याय मिळाला नाही तर परमेश्वराचे दार तर आहेच. पण पुढच्या निवडणुकीत उज्वला थिटे पूर्ण पॅनल उभं करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सविस्तर निकाल आल्यानंतर आम्ही निर्णय घेऊ की याबाबतीत उच्च न्यायालयाय जायचं की नाही असेही थिटे म्हणाल्या. अंतिम आदेश हा जिल्हा न्यायालयाचा असतो. रिट करण्याचा हक्क असतो त्यावर उद्या निर्णय घेऊ असेही त्या म्हणाल्या.
एकीकडे मुंबईत 11 लाख दुबार मतदार वाढल्याचा आरोप केला जात असताना दुसरीकडे बोगस मतदारांची यादी चव्हाट्यावर आणली जात आहे. चेंबूर येथील पुरुष शासकीय भिक्षुक गृहातील 100 हून अधिक भिक्षुकांची मतदार यादीत मतदार म्हणून नोंदणी करण्यात आल्याचा प्रकार मनसेने उघडकीस आणला. तसेच या भिक्षुक गृहात सध्या राहत नसलेल्यांचीही नावे मतदार यादीत नोंदवण्यात आली आहेत. त्यामुळे मनसेने या भिक्षुक गृहावर धडक मोहीम राबवत अधिकाऱ्यांना जाब विचारला.
अनगर नगरपंचायत निवडणुकी मोठा ट्वीस्ट निर्माण झाला असून तो आता थांबला आहे. उज्वला थिटे यांचे अपील जिल्हा न्यायालयाने फेटाळले असून त्यांना न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. उज्वला थिटे यांच्या अर्जावर सुचकाची सही नसल्याने तो बाद झाला होता. त्यानंतर अनगर निवडणूक बिनविरोध झाली होती. या प्रकरणी थिटे यांनी न्यायालयात दाद मागितली होती. पण आज सुनावणीनंतर सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे.
शिंदे गटाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांना चपलीने मारले पाहिजेत असं वक्तव्य केल आहे. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे महिलांवर अत्याचार करणारे आहेत त्यांना वाशिम अकोला आणि हिंगोलीमध्ये रंगेहात पकडले असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केला आहे. हा धक्कादायक आरोप करताना अकोल्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्याचा बांगर यांनी संदर्भ दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही आठवड्यांपासून शहरात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यामध्ये आता आणखी एका घडामोडीची भर पडली असून काँग्रेसच्या विद्यमान जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले आहेत. पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार आपण हे राजीनामे दिल्याचे जिल्हाध्यक्ष पोटे यांनी सांगितले असले तरी या राजीनाम्यानंतर उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
रायगड जिल्ह्यात शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष उफाळून आला असून येथे नुकताच दाखल झालेल्या हसळ्यातील नगराध्यक्षांसह नगरसेवकांच्या स्वागत रॅलीला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले आहेत. यावेळी मंत्री भरत गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांची उपस्थिती होती. या प्रकरामुळे आता येथे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नगपालिका निवडणुकीच्या प्रचारात मत द्या, विकासासाठी निधी देतो अशी भूमिका बारामती, मराठवाड्यासह अकोल्यातही मांडली होती. यावरून राज्यात वाद सुरू झाला होता. विरोधकांनी यावरून जोरदार टीका केली होती. आता याच मुद्द्यावरून सत्ताधारी नेतेही अजित पवार यांच्यावर टीका करताना दिसत आहे. शिंदे सेनेचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दुसऱ्यांची पोरं आपली सांगू नका असा टोला लगावला आहे. ज्यानंतर आता शिंदेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीत सध्या जुंपल्याचे दिसून येत आहे.
2 कोटींहून अधिक मृत आधार कार्ड्स UIDAI ने रद्द केले आहेत. मृत व्यक्तींच्या नावावर सुरू असलेल्या संभाव्य गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. यामुळे विविध सरकारी योजनांमधील फसवणूक थांबण्यास मदत होणार आहे.
संविधान दिनानिमित्त काँग्रेस आयोजित गौरव 'मार्च' मुंबई येथे सुरूवात
काँग्रेसने आयोजित केलेल्या गौरव 'मार्च' मध्ये आरपीआय, आणि सीपीआय चे कार्यकर्ते एकत्र येणार
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक कुर्ला पासून ते डॅा. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर पर्यंत रॅली निघणार आहे.
खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात हा गौरव मार्च संप्पन्न होणार आहे
'मनसे'चे नेते अविनाश जाधव यांनी मतदार यादी दाखवत निवडणूक आयोगाची आणि ठाणे महानगरपालिकेचा घोळ उघड केला आहे.
महानगरपालिकेच्या आयुक्तांचा फोटो असलेल्या यादीमध्ये नवी मुंबई प्रभाग असलेले पत्ते आढळून आले आहेत..
यादी डीलीट नाही केली तर आम्ही लोकांना रस्त्यावर डिस्प्ले करून दाखवू
ठाणे महानगरपालिका वेब साईट मध्ये घोळ... ठाणे महानगरपालिकेच्या ऑनलाईन साईटवर ही यादी उपलब्ध आहे...
निवडणूक आयोगाचा पक्षपातीपणा सातत्याने समोर येत आहे. त्यासाठी आम्ही सत्याचा मोर्चा देखील काढला होता..
पुन्हा एकदा आयुक्तांना भेटून त्यांना प्रारूप यादीच्या संदर्भात जाब विचारणार आहे..
अजित पवारांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावा. आपण अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार असल्याचे देखील दमानिया यांनी म्हटले आहे.
अंबरनाथ मधील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी आणि ज्वेलर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष रााहीलेले रूपसिंग धल यांचा 'भाजपा'त प्रवेश रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हाती घेतलं कमळ
येऊ घातलेल्या नगरपारलिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर हा मोठा धक्का मानला जात आहे.
नाराज असलेल्या रूपसिंग धल यांनी अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा हात सोडला
बारामती नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्यामध्ये प्रमुख लढत होत आहे. बहुजन समाज पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काळूराम चौधरी यांच्या प्रचाराच्या गाडीच्या बॅनरवर राष्ट्रवादी काँग्रेस नेते मंत्री छगन भुजबळ यांचा फोटो असून त्याबरोबर लक्ष्मण हाके यांचा देखील फोटो आहे. मंत्री छगन भुजबळ यांचा प्रचाराच्या गाडीच्या बॅनरवर फोटो असल्याने बारामतीत मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आलं आहे.
अहिल्यानगरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांना मारहाण झाल्यानंतर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ अॅक्शन मोडवर आले आहेत. जखमी सचिन गुजर यांची भेट घेण्यासाठी सपकाळ अहिल्यानगरच्या श्रीरामपूर दिशेने निघाले आहेत. दुपारपर्यंत ते जखमी सचिन गुजर यांची भेट घेतील. तत्पूर्वी सपकाळ यांनी, भाजपच्या हिंदुत्वावादी गुंडशाहीवर जोरदार हल्ला चढवला. भाजपला देशात हुकुमशाही आणायची आहे, हे सरळ दिसतं आहे, असा घणाघात हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
भारतीय संविधान दिनानिमित्ताने संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करत, अमरावतीच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांचं नाव न घेता टीका केली. "काही नौटंकी लोकांचे भाषण ऐकलं, जातीवाचक लोक आहे. त्यांना आपण दूर ठेवलं पाहिजे, तर काँग्रेस पक्ष सर्वधर्म समभाव जपणारा सर्वांना एकत्र ठेवणारा पक्ष आहे. काँग्रेस संविधानाचा पालन करणारा पक्ष आहे, देशाचं भविष्य देखील काँग्रेस पक्ष आहे. नाहीतर उद्या देशात अराजकता पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर त्याला फक्त काँग्रेसच दाबू शकते," असे यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
बारामती इथं भाषणात वापरलेल्या शब्दावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. अकोला इथं प्रचार सभेत त्यांनी ही दिलगिरी व्यक्त केली. 'भिकारपणा' हा शब्द वापरायला नको होता. पण त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. 'बकाळपणा' असं आपल्याला म्हणायचे होते, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आदरांजली वाहण्यात आली. या हल्ल्याला 16 वर्षे झाली आहे. हा हल्ला 2008 मध्ये झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात 166 शहीद झाले होते. यात 24 देशांमधील नागरिक होते.
सातारा जिल्ह्यात 9 नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष, नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रीय नेते महादेव जानकर यासह काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी शशिकांत शिंदे यांनी सातारकरांना सर्व दडपशाही जुगारून माझ्या महाविकास आघाडीला संधी द्या, मी सातारचा विकास करून दाखवतो, असं आवाहन केलं.
अहिल्यानगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना सकाळी सातच्या सुमारास उघड झाली. सचिन गुजर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले त्यांना पूर्ण न्याय मिळाला आहे का? मी म्हणेन की आम्ही काही प्रमाणात न्याय दिला आहे, कसाबला कायदेशीर प्रक्रियेद्वारे मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु या हल्ल्याचा कट रचणारे अजूनही पाकिस्तानमध्ये लपून बसले आहेत.
केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी मुंबईत आयआयटीच्या कार्यक्रमात बोलताना, 'आयआयटीच्या नावातील बॉंबे तसंच ठेवलं त्याचं मुंबई केलं नाही, हे चांगलं झालं असं विधान केलं'. जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.
मतदार याद्यांमध्ये घोळ करून निवडणुका जिंकण्याचा भाजपचा डाव आम्ही पुराव्यानीशी उघड केला असता त्यावर ही राजकीय टीका असल्याचं म्हणणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण स्वतः अंबरनाथमधील मतदार याद्यांमधील घोळाची तक्रार करतायत. हा घोळ आधी आशिष शेलार साहेब आणि आता उशिरा का होईना रवींद्र चव्हाण साहेबांनीही मान्य केला, याबद्दल त्यांचे आभार. आता विरोधकांबरोबर सत्ताधारीही मतदार याद्यांवर आक्षेप घेत असेल तर राज्य निवडणूक आयोग ही निवडणूक जनतेवर का लादतोय? याद्यांमधील घोळाबाबत विरोधकांनी आरोप केल्यावर झोपा काढणाऱ्या निवडणूक आयोगाला आता जागं होऊन हे घोळ निस्तरावेच लागतील… कारण आता आरोप करणारे विरोधी पक्षाचे नाहीत तर खुद्द निवडणूक आयोगाचे ‘मालक’ आहेत…! आता किमान ‘मालकाचा आदेश’ तरी पाळला जातो की नाही, याकडं आमचं बारकाईने लक्ष आहे, अशी टीका रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर केली आहे.
मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणातील चुकांमुळे भारत एकाकी पडत आहे. उद्या युद्ध परिस्थिती आली आणि अमेरिका, रशिया किंवा चीन यांनी शत्रुराष्ट्राला शस्त्रपुरवठा केला तर आपण काय करणार? आपण जगाशी मैत्री तोडून फक्त नुसत्या भाषणांनी युद्ध जिंकणार आहोत का? असा प्रश्न जाहीर सभेत वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी विचारला
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.