Maharashtra Politics Live : पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या छत्तीसगडमधील चकमकीत तीन पोलिस शहीद

Sarkarnama Headlines Updates : नगरपंचायत निवडणुकीत मतदानानंतर स्ट्राँगरुम बाहेर उमेदवारांचा पाहारा, जिल्हा परिषद निवडणूक जानेवारीमध्ये होण्याची शक्यता तर, डिसेंबरमध्येच महापालिका निवडणुकीची घोषणा होणार यासह 4 डिसेंबर 2025 च्या राज्य आणि देशातील घडामोडी एकाच क्लिकवर
Maharashtra Politics Live Update
Maharashtra Politics Live UpdateSarkarnama

Encounter between police and Naxalites : पोलिस आणि नक्षलवाद्यांच्या छत्तीसगडमधील चकमकीत तीन पोलिस शहीद

पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये छत्तीसगडमध्ये चकमक झाली. पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये सुमारे साडेचार ते पाच तास चकमक झाली. त्यात बारा नक्षलवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातले. छत्तीसगड पोलिसांनी चार जणांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. दरम्यान चकमकीदरम्यान चार पोलिसही शहीद झाले आहेत. पोलिसांनी या भागात आज पहाटे सर्च ऑपरेशन करण्यात आले.

Tapovan Tree Cutting Issue :  तपोवनमधील वृक्षतोडीचा विषय पोचला केंद्रीय सरकारच्या दरबारात

नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा आता देशपातळीवर पोचला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र पाठवून तपोवनमधील झाडं तोडण्याची परवानगी देऊ नये, असं म्हटलं आहे. केंद्रीय पातळीवरून आता कार्य निर्णय होतो, हे पाहावे लागणार आहे.

Rahul Gandhi : पुतिन  दौऱ्याअगोदर राहुल गांधींची नाराजी; विदेशी राष्ट्रप्रमुखांना विरोधी पक्षनेत्यांना भेटू दिलं जात नाही

रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतिन हे आजपासून (ता. 04 डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या धोरणाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. भारतात येणाऱ्या विदेशी राष्ट्रप्रमुखांना विरोधी पक्षनेत्यांना भेटू दिलं जात नाही. यापूर्वी धोरण होते. मात्र, नरेंद्र मोदी यांनी ते धोरण बदलले आहे. विदेश दौऱ्यावर जाणाऱ्या विरोधी पक्षाच्या लोकांना भेटू नका, असे सांगितले जात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

Narendra Modi : महाराष्ट्रातील खासदारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट

महाराष्ट्रातील खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्या भेटीत मोदी यांनी खासदारांना मार्गदर्शन केले आहे. लोकांशी संपर्क ठेवा. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा सर्व सामन्यांना कसा फायदा होईल, हे पाहावे. तसेच, लोकसभा आणि राज्यसभेतील उपस्थिती वाढवावी, अशा सूचना मोदींनी खासदारांना दिल्या आहेत.

Shivsena UBT : काँग्रेसच्या बड्या नेत्याने घेतली उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्वव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेस नेत्याने ठाकरे यांच्या भेटीला येणं महत्वाचं मानलं जात आहे.

Ravindra Chavan : रवींद्र चव्हाणांना समज दिली जाणार नसाल तर .... संजय शिरसाटांचा इशारा

महायुतीमध्ये झालेल्या चर्चेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून छेद दिला जात आहे. रवींद्र चव्हाण हे मनाप्रमाणे वागतात. मग ॲक्शनला रिॲक्शन होणार आहे. दमदार वाटचाल करणाऱ्या महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्यासारखे आहे. चव्हाण यांना समज दिली जाणार नसेल तर हे प्रकार भविष्यात वाढतील आणि त्याचे दुष्परिणाम महायुतीला भोगावे लागतील, असा इशारा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे.

Nitesh Rane : तपोवनातील वृक्षतोडीचे समर्थन करताना नीतेश राणेंचे वाद्‌ग्रस्त ट्विट

नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोडीस दिवसेंदिवस तीव्र विरोध होताना दिसत आहे. त्यात मंत्र्यांकडून वृक्षतोडीचे समर्थन होताना दिसत आहे. अगोदर मंत्री गिरीश महाजन यांनी वृक्षतोड कशी योग्य आहे, त्याबदलात आम्ही तेवढीच झाडे लावणार असल्याचे म्हटले होते. आता त्यांच्या जोडीला मंत्री नीतेश राणेही उतरले आहेत. तपोवनातील वृक्षतोडीचे समर्थन करताना त्यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की,तपोवनमधल्या वृक्ष थोडची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच.. ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत..तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असा सवाल त्यांनी केला आहे.

Prof. Honey Babu :  एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले प्रा. हनी बाबूंना पाच वर्षांनंतर जामीन मंजूर

एल्गार परिषद प्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून अटकेत असलेले दिल्ली विद्यापीठाचे माजी प्रा. हनी बाबू यांना मुंबई उच्च न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे, त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जमिनीला सरकारकडून विरोध करण्यात आला होता. हनी बाबू यांना खटल्याविना दीर्घकाळ तुरुंगात ठेवल्याचेही कोर्टाने म्हटलं आहे. संविधानाच्या कलम २१ चे उल्लंघन झाल्याचा युक्तिवादही हनी बाबू यांच्या वकिलाने केला आहे.

MNS News: राज ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर

मनसे प्रमुख राज ठाकरे हे आज दुपारी दिल्लीला रवाना होणार आहेत.पुढील २ दिवस राज ठाकरे दिल्लीत असतील. मिताली ठाकरे यांचे बंधू डॉ. राहुल बोरुडे यांचे उद्या लग्न आहे.

देशभरात विविध विमानतळांवरील 200हून अधिक उड्डाणं रद्द

अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे 'इंडिगो विमान कंपनीने देशभरातील विविध विमानतळांवरील 200 हून अधिक विमान उड्डाणे रद्द केली आहे. अनेक विमानांच्या उड्डाणाला विलंब झाला. प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, बंगळूर येथील विमानसेवा विस्कळीत झाली. देशभरातील प्रमुख विमानतळांवर प्रवाशांना बराचवेळ ताटकळत राहावे लागल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

Pune Live: शीतल तेजवानीला आज कोर्टात हजर करणार

पुणे जमीन व्यवहार प्रकरणातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानी हिला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. तिला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. शीतल तेजवानीची सखोल चौकशी केली जाणार आहे.

Narendra Modi News: महाराष्ट्रातील  खासदार मोदींच्या भेटीला

महाराष्ट्राच्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातील विविध मुद्दांवर खासदारांनी मोदींनी चर्चा केली.

Maharashtra Municipal Elections: हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरला संपल्यानंतर निवडणुकांची घोषणा

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या आधी राज्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आयोगाकडून तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाने राज्यातील २९ महापालिका आयुक्तांची आज बैठक बोलावली आहे. हिवाळी अधिवेशन १४ डिसेंबरला संपल्यानंतर त्याच दिवशी निवडणुकांची घोषणा होऊ शकते. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर आणि अहिल्यानगरसह २९ प्रलंबित महापालिकांची निवडणुकीची घोषणा होऊ शकते. तिसर्‍या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार असल्याचे समजतेय.

दिव्यांग पदन्नोती आरक्षणासाठी एसओपी

दिव्यांगांच्या शासकीय, निमशासकीय सेवेतील चार टक्के आरक्षणाच्या पदोन्नती संदर्भात तुकाराम मुंढेंनी मोठा निर्णय घेतला आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी एसओपी तयार करण्यात आला आहे.

मुंढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील यांची चौकशी होणार

 मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शितल तेजवानी यांना अटक झाली आहे. तसेच कॉमेडी कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्या देखील अडचणी वाढणार आहेत. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून पाच दिवसांपूर्वीच पाटील यांना नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

रविवारी जैन समुदायाचा मोर्चा

जैन मुनी निलेशचंद्र विजय महाराज यांच्या नेतृत्वाखाली जीव दया आणि कबुतर बचाव अभियानाअंतर्गत सात डिसेंबर (रविवार) मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा कुलाबामध्ये असलेल्या जैन मंदिरापासून सुरू होईल. त्यानंतर लालबाग, भायखळा, डोंगरी, लोअर परळ या मार्गे दादर कबुतरखाना येथे जाणार आहे.

दोन लाख ७२ हजार पदवीधरांची नावनोंदणी

पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार पुणे विभागात २ लाख ७२ हजार ६१ पदवीधरांची तर ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे.

लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार नोव्हेंबरचा हफ्ता

लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना नोव्हेंबरचा हफ्ता लवकच मिळणार आहे. नगर परिषदेच्या मतमोजणीच्या आधीच नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती आहे.

हलाल नियमावलीत बदल करा - मेधा कुलकर्णी

सध्या संसदेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातील झिरो आवरदरम्यान खासदार मेधा कुलकर्णी यांनी हलालचा मुद्दा उपस्थित केला. 'हलाल' सर्टिफिकेशन आणि त्यासंबंधित तांत्रिक व प्रशासकीय अनियमितता दूर करून ते सर्टिफिकेशन केवळ शासकीय प्रणालीद्वारेच देण्यात यावीत. आणि या नियमावलीत गरजे नुसार बदल करावेत, अशी मागणी डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सभागृहात केली आहे.

रोहित पवार यांना नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना ९ डिसेंबरला नाशिक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तत्कालीन कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतांनाचा व्हिडीओ रोहित पवार यांनी ट्विट करत काही आरोप केले होते. दरम्यान, चुकीच्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कोकाटे यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती. चौकशीत कोकाटे यांच्या आरोपात तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com