

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांना न्याय मिळावा म्हणून महाराष्ट्र रेल्वे पोलिसांनी अत्यंत सखोल तपास करून तपशीलवार अहवाल तयार केला. या तपासासाठी त्यांनी VJTI (Veermata Jijabai Technological Institute) सारख्या नामांकित तांत्रिक संस्थेच्या मदतीने घटनास्थळाचे बारकाईने विश्लेषण करून महत्त्वपूर्ण निष्कर्ष सादर केले. सध्या या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा लाल झेंडा. सर्वच जागा डाव्यांनी जिंकल्या. एबीवीपीला एकही जागा जिंकतां आली नाही. अदिती मिश्रा अध्यक्षपदी निवडून आल्या. के. गोपिका उपाध्यक्ष तर सुनील यादव महासचिव दानिश अली सहसचिव म्हणून निवड.
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी पार्थ पवार जमीन घोटाळ्याप्रकरणी मोठी मागणी केली आहे. त्यांनी या जमीन प्रकरणाची चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
मुंबईतील सीएसएमटी स्थानकात सुरू असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांची गर्दीला फटका बसला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मध्ये रेल्वेची वाहतूक कोलमडली आहे. याचदरम्यान,सॅण्ड हर्स्ट ते भायखळा दरम्यान, मध्य रेल्वे अपघातात तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एक महिला,दोन पुरुषांचा समावेश आहे.
मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात गुरुवारी (ता.6) अचानक आंदोलन सुरू केल्यामुळे मुंबई लोकलची सेवा ठप्प झाली आहे. यामध्ये मोटरमनसह इतर रेल्वे कर्मचारीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहे. या आंदोलनामुळे सायंकाळी 5 वाजून 40 मिनिटांपासून कल्याणच्या दिशेने एकही लोकल धावलेली नाही. त्यामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर, विशेषतः सीएसएमटी येथे प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थ पवार यांच्यावर होत असलेल्या जमीन खरेदी घोटाळ्याप्रकरणी मोठी मागणी केली आहे. त्यांनी तहसीलदार आणि तलाठ्यावर करण्यात आलेली निलंबन कारवाई मागे घेण्याची मागणी केली आहे. तहसीलदार आणि तलाठी यांची नोकरी गेली. पण ते म्हणत आहेत की आम्ही सहीच केली नाही. सही केलेली नसतानाही त्यांना कामावर काढून टाकण्यात आले. तो गरीब आहे, त्याला आवाज नाही म्हणून कामावर काढून टाकण्यात आले. हा अन्याय नाही का? असंही सुळे म्हणाल्या.
ण्यातील कोरेगाव पार्कमधील जमिनीचा मी कोणताही व्यवहार केलेला नाही. त्याबाबत मला काहीही माहिती नाही. या जमीन व्यवहारसंदर्भात आमच्याकडून कोणतीही परवानागी देण्यात आलेली नाही. या संदर्भात कोणी परवानगी दिली, काय झालं, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही. कोरेगाव पार्कमधील जमीन ही महार वतनाची होती. पण त्यांच्यातील व्यवहार हा दुय्यम निबंधक यांच्याशी संबंधित आहे. या जमिनीसंदर्भात कोणतीही फायल झालेली नाही किंवा ती प्रस्तावितही करण्यात आलेली नाही. माझ्यावर कारवाई का केली, हेच मला माहिती नाही, असे हवेलीचे निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांनी स्पष्ट केले.
पार्थ पवार यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी अंबादास दानवे यांनी केलेल्या आरोपासंदर्भात एकतरी कागद दाखवावा. दानवेंनी काय आरोप करायचा, हा त्यांचा लोकशाहीतील अधिकार आहे. पण त्यासंदर्भात पुरावे दिले पाहिजेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सांगितले.
पार्थ पवार यांच्या पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी समितीची घोषणा केली आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कथित जमीन गैरव्यहार प्रकरणावर बोलण्यास नकार दिला आहे. त्यांनी याबाबत नो कॉमेंटस असे म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहारप्रकरणी हवेलीचे क्रमांक तीनचे दुय्यम उपनिबंधक रवींद्र तारु यांचं निलंबन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी चौकशी समितीची घोषणा केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील चाळीस एकर जागेचा व्यवहार करून सरकार आणि मूळमालकांची फसवूक केल्या चा आरोप करण्यात येत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यातील शाखा अध्यक्षांची बैठक झाली. त्या बैठकीत राज ठाकरे यांच्याकडून शाखाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करण्यात आली. काम करायची इच्छा नसेल तर पद सोडा, राज ठाकरे यांनी शाखा अध्यक्षांना फटकारले. इतके दिवस काय काम केले हे दाखवा, मतदार याद्या पूर्ण का केल्या नाहीत, असा प्रश्न राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना विचारला आहे. . ज्यांनी काम केले नाही त्यांना काढून टाकण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले आहेत.
पदाधिकाऱ्यांच्या कामाच्या निरुत्साह पाहून राज ठाकरे बैठकीतच संतापले. राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली, त्यानंतर त्यांनी बैठक संपवून निघून जाणे पसंत केले. राज ठाकरे यांनी बैठकीत अनेक मुद्दे उपस्थित केले आहेत. मतदार यादी, बूथ लेव्हल वर होणारी कामं, पक्ष बांधणी, पक्ष संघटना यासारख्या अनेक विषयावर पदाधिकाऱ्यांकडून सकारात्मक उत्तरं न मिळाल्यामुळे राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते पुणे शहरातील मनसे शाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. बैठकीत राज ठाकरे पक्ष संघटन मजबूत करण्याबाबत आणि आगामी निवडणुकीसाठी रणनीतीवर चर्चा करणार आहेत. पुणे शहरातील सर्व मनसे नेते व कार्यकर्ते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत.
बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील 18 जिल्यांतील 121 जागांसाठी जोरदार चुरस पाहायला मिळत आहे. मतदारांमध्ये उत्साह असून सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या आहेत. प्रशासनाने सुरक्षेची कडक व्यवस्था केली आहे.
राज्यात अतिवृष्टीनं त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे महिन्याभरात दुसऱ्यांदा मराठवाड्यात पोहोचले. या दौऱ्यात त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन देत कर्जमाफीची मागणी केली. तसेच आज त्यांच्या या दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन केले. त्यांनी संघातील खेळाडूंना भेटून त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. मोदींनी त्यांच्या परिश्रम, जिद्द आणि देशासाठीच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
गणेश नाईक यांच्याकडे ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगपालिका निवडणुकीसाठी भाजपने निवडणूक प्रभारी पद दिले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना होण्याची शक्यता आहे.
आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यामध्ये युती होण्याची चर्चा होती. मात्र, या चर्चांमधील हवा काढत कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेंसोबत युती नको, असा स्पष्ट संदेश उद्धव ठाकरेंनी कार्यर्त्यांना दिला आहे..
कुंभमेळ्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण केले जाणार आहे. शिवाय रस्त्याच्या दुतर्फा 100 मीटर जागा संपादित होणार आहे. त्यासाठी एन एम आर डी एन ए कडून शेतकऱ्यांची घरे आणि बांधकामे पाडण्यात आली. संदर्भात शेतकरी आणि महिलांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची गाडी अडवून कैफियत मांडली. यावेळी महाजन गाडीतच बसून राहिले. त्याबाबत महिलांनी नाराजी व संताप व्यक्त केला
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठीचे मतदान सुरु झाले आहे. एनडीए विरुद्ध महागठबंधन अशी थेट लढत होत आहे. प्रशांत किशोर हे देखील या निवडणुकीत उतरले असून जनसुराजचे त्यांचे उमेदवार देखील विजयाचा दावा करत आहेत.
मनसे प्रमुख राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज ते निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याची शक्यता आहे. मुंबईत शिवसेनेसोबत युती होणार हे निश्चित मानले जात असताना पुण्याबाबत देखील ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
एकीकडे विकासकामांना निधी मिळत नसल्याचे आमदार किशोर पाटील सांगतात मात्र दुसरीकडे पूर्ण पाचोरा भडगाव मतदार संघ हा अतिवृष्टीत सर्वाधिक नुकसान झालेल्या असताना देखील बागायती ऐवजी जिरायती पंचनामा लावल्यामुळे अतिवृष्टी अनुदान मिळण्यात शेतकऱ्यांचे 30 ते 35 कोटी रुपयांचे नुकसान झाले याची मात्र काळजी आमदार किशोर आप्पा यांना नाही, अशी टीका भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी किशोप पाटलांवर केली
स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा भाजपचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रमुख म्हणून माजी आमदार नितेश राणे, आमदार प्रमोद जठार यांची निवड भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.