

चारकोप विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये मतदार यादीतील गंभीर विसंगती समोर आली आहे. मतदार यादी क्रमांक ३० मधील एका पानावर अनुक्रमांक २४४ आणि २५० वर एकाच व्यक्तीची नोंद दोनवेळा दिसत असून दोन्ही ठिकाणी फोटोही एकच आहे. मागील अनेक दिवसापासून निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभाराची पोलखोल चारकोप मनसे विधानसभा पदाधिकाऱ्यांकडून करण्याचे काम सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांच्या माध्यमातून हा प्रकार उघडकीस आला आहे.
वंदे मातरम गीतावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी गीत गायला नकार दिल्याने भाजप (BJP) कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आझमींच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. 'अगर भारत में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा', अशी घोषणा देत कार्यकर्त्यांनी आझमींच्या विरोधात तीव्र निदर्शने केली.
काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी मुंबईच्या महापौराबाबत मोठा दावा केला आहे. यावेळी त्यांनी मुंबईचा पुढील महापौर काँग्रेसचाच असेल आणि मुंबईकरांच्या समस्या सोडवणे हे त्यांचे प्रथम प्राधान्य असेल, असंही त्यांनी म्हटलं आहे. मतदारयाद्यांमधील गोंधळ, वंदे मातरम वाद यांसह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खुनाची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये अमोल खुणे या व्यक्तीचा समावेश आहे. त्यानंतर त्याचे कुटुंब समोर आले असून त्यांनी अमोलला अडविले जात असल्याचा आरोप केला आहे.
पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी मनसेकडून आज पुण्यातील तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणावरून वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी पोलिसांत काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून केला जात आहे. यापार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोघांमध्ये सुमारे ३० ते ४० मिनिटे चर्चा झाल्याचे समजते.
नगर परिषद निवडणुकीआधी रत्नागिरीत राजकिय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मतदारसंघातील रत्नागिरी शहरात रस्त्यांची कामे करताना डांबर घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेना उबाठाचे उपनेते, माजी आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.. यावेळी त्यांनी माहिती अधिकारात मागविलेली कागदपत्रे देखील सादर केली. रस्त्यांच्या कामात 10 वर्षात एकाच ठेकेदार कंपनीला 114 कोटींची कामं मिळाली आणि यामध्ये 44 कोटींचा डांबर घोटाळा झाला असल्याचा आरोप माने यांनी केला आहे. हे प्रकरण समोर आणल्याने आपल्या आणि कुटुंबियांच्या जीविताला धोका असून संपूर्ण कुटुंबाला संरक्षण देण्याची मागणी माने यांनी केली आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या मनोज जरांगे यांच्यासह माझी सीबीआय, नार्कोटेस्ट, ब्रेनमॅपिंग करा, अशी मागणी धनंजय मुंडें यांनी केली होती. त्यानंतर पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांनी नार्को टेस्ट, सीबीआय चौकशीची माझी तयारी असल्याचे मनोज जरांगे यांनी स्पष्ट करीत या प्रकरणात मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घालण्याची मागणी जरांगे यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली, असा सनसनाटी आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. त्यावर आता धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनोज जरांगे पाटलांनी एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे. कधी आहे तुमची तयारी? ईडब्ल्यूएसमध्ये जास्त आरक्षण मिळते की ओबीसीत मिळते. तारीख तुम्ही सांगा. जागा तुम्ही सांगा. महाराष्ट्र बघेल, दाखवून देऊ ईडब्ल्यूएसमध्ये जास्त मिळतं की ओबीसीत मिळतं असं यावेळी मुंडे यांनी म्हटले आहे.
गोपीनाथ मुंडे यांच्या संस्करातून मी घडलो आहे. परळीतील जरांगे यांच्या आंदोलनाला सर्व काही मदत केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठराव बीड जिल्हा परिषदेत व परळी नागरपालिकेत मांडला, असल्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
दहिसर विधानसभा मतदारसंघातून समोर आलेल्या एका धक्कादायक घटनेनुसार, एका मतदाराचे नाव मतदार यादीत चक्क दोन वेळा नोंदवले गेले आहे. या गंभीर त्रुटीवर प्रकाश टाकण्यासाठी मनसे च्या कार्यकर्त्यांनी अनोखे आंदोलन केले. बोरिवली पश्चिम येथील शिवाजी नगर भागातील ‘छोटी बावडी’ नावाच्या एका विहिरीमध्ये उतरून मनसे कार्यकर्त्यांनी दुबार नाव असलेल्या मतदाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
राज्यात नगरपरिषद नगर, पंचायतीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यादरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे बॅनर, पोस्टर, झेंडे त्याचबरोबर राष्ट्रीय पक्षांचे चिन्ह असलेले फलक हे हटवण्यासंदर्भात प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या कार्यालयावरील त्यांच्या नेत्यांचे फोटो असलेले बॅनर अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. जरांगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्दे आणि आरोपांवर गृह विभाग तपास करेल. धनंजय मुंडे असे काही करतील असे वाटत नाही. जरांगे यांनी मिडिया ट्रायल बंद करावी असे हाके यांनी सुनावले.
आपल्या हत्येचा कट धनंजय मुंडे यांनी रचना होता, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देण्यासाठी मुंडे यांची लवकरच पत्रकार परिषद होणार असल्याची माहिती आहे.
धनंजय मुंडे हा वंजारी समाजाला लागलेला कंलक-
मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली होती
मुंडेंनी चुकीच्या ठिकाणी हात घातला
आपल्या हत्येच्या कटात कोण सामील होते, याबाबत माहिती देताना मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे अप्रत्यक्षपणे नाव घेतले. मला गाडी द्या, मी गाडीने गाडी ठोकतो, असे आरोपीने मुंडे यांना सांगितले होते. कांचन नावाचा माणूस हा मुंडेंचा कार्यकर्ता आहे, त्याला मुंडे यांनी माझी गाडी घ्या, तीला बाहेरची पासिंग आहे, असे सांगितले होते. मुंडेंनी माझ्याविरोधात षडयंत्र रचले, असा आरोप जरांगेंनी केला.
मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटाबाबत जरांगे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. मी जिवंत असेपर्यंत शांत राहा. मी मेल्यावर काय करायचं ते करा, असे सांगत त्यांनी मराठा समाजा शांत राहण्याचा सल्ला दिला.
काही दिवसांपूर्वी पुण्यात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) केलेल्या कारवाईत अटक केलेल्या कोंढव्यातील जुबेर हंगरगेकरकडून जप्त केलेल्या कागदपत्रांत बॉम्ब बनविण्याची सविस्तर कृती सापडल्याची माहिती पुढे आली आहे. जुबेरच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी विविध तांत्रिक पुरावे आता तपासले जात आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात एसआयटीमार्फेत चौकशीची मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली होती. जरांगे यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे.
सुजित झावरे पाटील यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे पारनेर तालुक्यात आणि अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यांनी समाजकारणातून आणि जनतेच्या विश्वासातून स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांच्याकडे धनादेश नसला तरी जनादेश आहे असे सांगत एकनाथ शिंदेंनी त्यांचे कौतुक केले.
आमदार भास्कर जाधव यांच्या मुलाने दादागिरी करत मंत्री योगेश कदम यांच्या कार्यकर्त्याला मारहाण आणि शिविगीळ केली. ही घटना रत्नागिरीतील लोटे एमआयडीसीमध्ये घडली. बांधकामाच्या ठेक्यावरून ही मारहाण झाल्याची माहिती आहे.
पुण्यातील मुंढवा भागातील 40 एकर जमीनच्या गैरव्यवहार प्रकरणा सह जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची हत्या करण्याचा कट उघडकीस आला आहे. या कटाची सत्यता उघड होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे S.I.T मार्फत तपासाची मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.