Maharashtra Politics Live Update : निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणावर योगेश कदमांचे स्पष्टीकरण

Marathi latest Politics live news updates : उत्तर प्रदेशातील कानपूरमधील मूलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिश्री बाजारात काल संध्याकाळी एका मशिदीजवळ मोठा स्फोट झाला आहे. अशाच देशासह राज्यभरातील राजकीय आणि सामाजिक घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

हिवाळी अधिवेशन फक्त दहा दिवसांचे घेण्याचा प्रयत्न - रोहित पवार

राज्यात अतिवृष्टीने उध्वस्त झालेला शेतकरी, सरकारची तुटपुंजी मदत, कायदा व सुव्यवस्थेचे उडालेले धिंडवडे, आरक्षणाचे विषय, कोलमडलेली अर्थव्यवस्था, वाढता भ्रष्टाचार आणि एकूणच निर्माण झालेली अराजकता या परिस्थितीत हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवड्यांचं होणं गरजेचं आहे, परंतु दुर्दैवाने हे सरकार या ठिकाणी देखील पळ काढताना दिसत असून अधिवेशन केवळ दहा दिवसांचं घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.

महावितरण कर्मचारी संघटना संपावर जाणारा

महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या तीन दिवसीय संपाच्या कालावधीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन पूर्ण झाले असून राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून सर्व अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. रजेवरील कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर रूजू होण्याची सूचना देण्यात आली आहे.

OBC Reservation : OBC आरक्षणासाठी कुणबी बांधवांचा मुंबईत मोर्चा

'ओबीसी कोट्यात कुणालाही आरक्षण देऊ नये' आणि 'कुणबी समाजाला ओबीसी प्रमाणपत्र न देता आमचं आरक्षण अबाधित ठेवावं' या मागण्यांसाठी आज मुंबईत ओबीसी समाजाचं आंदोलन होत आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रायगडसह संपूर्ण कोकणातून हजारोंच्या संख्येने कुणबी बांधवांनी मुंबईकडे निघाले आहेत.

Yogesh Kadam : निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याच्या प्रकरणावर योगेश कदमांचे स्पष्टीकरण

गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर मंत्री योगेश कदम यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत लिहीलं की, 'शिक्षक आणि व्यावसायिक सचिन घायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात, पोलिस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार, सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हतं. उपलब्ध कागदपत्रे आणि न्यायालयाच्या निर्णयाने निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचे अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे. सध्या चर्चेत असलेल्या अन्य प्रकरणाशी अपीला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणे हे पूर्णपणे चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे'.

लाडक्या बहीणींसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला

राज्य सरकारने लाडकी बहीणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 410.30 कोटींचा निधी वळवण्यात आला आहे. महिला व बालविकास विभागाने हा निधी अनुसूचित जातीच्या व नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठी हा निधी वापरण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत. राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या निधीसंदर्भातील शासन निर्णय बुधवारी जाहीर केला आहे.

Express Way Accident : BMW आणि पोर्शे कारची शर्यत अंगलट, भीषण अपघातात चालक जखमी

मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस वेवर आज पहाटे एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये या कारचा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. पहाटेच्या सुमारास बीएमडब्ल्यू आणि पोर्शे कारची शर्यत लागल्याची माहिती समोर आली आहे. बोरिवलीहून अंधेरीला येणाऱ्या मार्गावर या दोन्ही गाड्यांची शर्यत सुरु होती. त्यावेळी पोर्शे कारच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यामध्ये पोर्शे कारचा चालक गंभीर जखमी झालाय तर बीएमडब्ल्यूच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Kanpur Mishri Bazaar blast : कानपूरात मशिदीजवळील स्कुटरमध्ये झालेल्या स्फोटात 6 जण गंभीर जखमी

उत्तर प्रदेशातील कानपूरमधील मूलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मिश्री बाजारात (बुधवार) संध्याकाळी एका मशिदीजवळ मोठा स्फोट झाला आहे. स्फोट घडल्यानंतर बाजारात एकच गोंधळ उडाला आणि पळापळ सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत एका महिलेसह एकूण सहा जण जखमी झाले आहेत. तर स्कूटरमध्ये ठेवलेल्या काही वस्तूमुळे स्फोट झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com