Maharashtra Live Update : पुणे आणि पिंपरी-चिंचवडबाबत महत्त्वाची अपडेट समोर, हवेची गुणवत्ता खालावली

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates : आज शुक्रवार 24 ऑक्टोबर 2025 रोजीच्या राज्यसह देशभरातील महत्त्वाच्या राजकीय तसंच प्रशासकीय बातम्या जाणून घेऊया.
Pimpri-Chinchwad
Pimpri-ChinchwadSarkarnama

पुणे आणि पिंपरी-चिंचवडबाबत महत्त्वाची अपडेट समोर, हवेची गुणवत्ता खालावली

पुणे आणि पिंपरी-चिंचवडबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या दोन्ही शहरात हवेची गुणवत्ता अतिशय खालावली आहे. सर्वाधिक गृहनिर्माण प्रकल्पांचा फटका बसला आहे. दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीनं त्यात अजून भर पडली आहे. पिंपरी-चिंचवडचा समावेश आता सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये झाला आहे.

जळगाव पोलीस मुख्यालयाच्या हद्दीत धक्कादायक प्रकार; कमरेला पिस्तूल लावून चक्क पैशांची उधळण

जळगाव पोलीस मुख्यालयाच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने कमरेला पिस्तूल लावून चक्क पैशांची उधळण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या तरुणाविरोधात पोलिसांनी कडक अॅक्शन घेतली असून अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2008 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी वारसदार कोण याचा निर्णय घेतला, नितेश राणेंचं विधान 

पंकजा मुंडे यांनी निवडणुका गोपीनाथ मुंडे यांचा वारसदार म्हणून निवडणुका लढवल्या आहेत. 2008 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी वारसदार कोण याचा निर्णय घेतला होता. वारसदार म्हणून पंकजा मुंडे यांचे नाव गोपीनाथ मुंडे यांनी घेतले होते असे वक्तव्य मंत्री नितेश राणे यांनी केले. 

Chandrashekhar Bawankule : मुरलीधर मोहोळांच्या मदतील धावले चंद्रशेखर बावनकुळे; धंगेकरांना म्हणाले पिसाळलेले लोक

आमच्या मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंंगेकरांचा मोठा पराभव केला. तसेच त्यांनी बिल्डरासोबत असलेल्या संबंधाची स्पष्टता दिलेली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आमचे कोणाशीही संबंध नाहीत, असे सांगितले आहे. याबाबत त्यांनी एकदा नव्हे तर चा वेळी स्पष्टीकरण दिले आहे. त्यानंतर हे पिसाळलेले लोक त्यांना राजकारण करायचे आहे. त्यांना मुरलीधर मोहोळ यांच्यावर बोलल्याशिवाय त्यांचे राजकारण जिवंत ठेवता येत नाही.

NCP : गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय वारसदाराबाबतच्या भुजबळांच्या विधानावर राष्ट्रवादीचे स्पष्टीकरण

धनंजय मुंडे यांचे राजकीय वारसदार कोण, हे जनता ठरवत असतं. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्र भाजपमधील सर्वोच्च नेते होते, त्यांचा राजकीय वारसदार कोण असावा, याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने भाष्य करण्याची गरज नाही. जनता ठरवत असते. छगन भुजबळ यांनी मात्र धनंजय मुंडे हेच गोपीनाथ मुंडे यांचे राजकीय वारसदार आहेत, असे विधान केले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्टीकरण आले असून ते भुजबळ यांचे वैयक्तिक मत आहे. गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसदाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेस बोलू इच्छित नाही, असे माजी खासदार आनंद परांजपे यांनी सांगितले.

Mahavikas Aghadi-MNS Morcha : निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चाच्या परवानगीसाठी मनसेचा पोलिसांकडे अर्ज

येत्या एक नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मतचोरीच्या मुद्यावर निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला परवानागी मिळावी, यासाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आला आहे. आम्ही मरीन ड्राईव्हपासून मोर्चा काढण्याला परवानगी मिळावी, अशी आम्ही मागणी केली आहे. यासंदर्भात आम्ही येत्या २८ ऑक्टोबर रोजी पोलिस आयुक्तांना भेटणार आहोत, असे मनसेचे बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

Phaltan Doctor death case साताऱ्यातील महिला डॉक्टराच्या आत्महत्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून पोलिसाच्या निलंबनाचे आदेश

सातारा जिल्ह्याच्या फलटणील येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली असून संशयित पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. पीएसआय गोपाळ बदने याला तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

CM Fadnavis News : नैसर्गिक शेतीसाठी मिशन

वातावरणीय बदलामुळे शेतीच्या उत्पादनात घट आहे. त्यावर नैसर्गिक शेती हा उपाय आहे. राज्यपालांच्या नेतृत्वाखाली नैसर्गिक शेतीसाठी मोठे मिशन राबविणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना सांगितले.

Chandrakant Patil News : 'ईश्वरपूर' हा ऐतिहासिक परंपरेचा गौरव

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलून ‘ईश्वरपूर’ करण्यास केंद्र सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. त्यावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, हा निर्णय केवळ नावबदल नाही, तर हिंदू अस्मिता, भारतीय संस्कृती आणि आपल्या ऐतिहासिक परंपरेचा गौरव पुनर्स्थापित करणारा आहे.

Phaltan Case update : मृत डॉक्टर व पोलीस बीडचे

फलटणमध्ये आत्महत्या केलेली महिला डॉक्टर आणि आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने हे दोघेही बीडमधील एकाच गावातील असल्याचे समोर आले आहे. त्यातूनच त्यांनी ओळख झालेली असावी, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Phaltan doctor Rape-suicide Case : पोलिसांत गुन्हा दाखल 

सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाच्या तपासासाठी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत. आत्महत्येपूर्वी महिला डाॅक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप केले आहेत.

Akola Politics : शेतकऱ्यांचे 'झोपा काढो' आंदोलन

अकोल्यातल्या जिल्हा पणन कार्यलयात शेतकऱ्यांनी 'झोपा काढो' आंदोलन केले आहे. हमीभावाने सोयाबीनची खरेदी सुरू करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे चालू करा, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन होतं. सोयाबीन खरेदी तात्काळ सुरू करण्यात यावी, जेणेकरून पुढील हंगामासाठी हातात पैसा असावा, अशी भूमिका या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Nilesh Ghaywal : नीलेश घायवळची आणखी एक वाहन पुणे पोलिसांकडून जप्त, जामखेडमध्ये इथं कारवाई

पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळची आणखी एक चार चाकी कार पोलिसांनी जप्त केली आहे. उसाच्या शेतात ही चारचाकी कार लपवून ठेवली होती. अहिल्यानगरमधील जामखेडमध्ये असलेल्या एका गावात ही गाडी लपवून ठेवण्यात आली होती. पुणे पोलिसांनी थेट जामखेडमधील खर्डा गावात जाऊन ही कारवाई केली आहे. याआधी निलेश घायवळच्या पुण्यातील घरावर छापा टाकला होता. त्याची बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत.

BJP Plitics : फडणवीस अन् जरांगे एका व्यासपीठावर एकत्र येणार, भाजप आमदारांकडून निमंत्रण

मंगळवेढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची शक्यता आहे. 26 नोव्हेंबरला मंगळवेढा इथं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाचे निमंत्रण मनोज जरांगे पाटील यांना मिळालं आहे. भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी जरांगे पाटील यांना हे निमंत्रण दिलं आहे.

Manoj Jarange Jalna : मनोज जरांगेंची पुन्हा आंदोलनाची तयारी; महाराष्ट्रातील शेतकरी संघटनांची बोलावली बैठक

मनोज जरांगे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन हाती घेतलं आहे. यासाठी येत्या 2 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता जालन्यात इथं शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातील सगळे अध्यक्ष, पदाधिकारी, शेती तज्ञ आणि अभ्यासक यांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे, असं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं आहे. सगळ्यांनी 2 तारखेला अंतरवाली सराटीत चर्चेला यावं, कोणीही फोनची वाट बघू नका, सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

Sindhudurg Politics : जिल्हा बँक अध्यक्षाला महायुतीवर बोलण्याचा अधिकार काय? राजन तेलींचा मनीष दळवींना टोला

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत युती होणार नाही, हे बोलण्याचा अधिकार जिल्हा बँक अध्यक्षाला नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षातील माजी आमदार राजन तेली यांनी मनीष दळवी यांना लगावला आहे. जिल्हा परिषद उमेदवारी मिळवण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्षांनी, अशी स्टेटमेंट करू नयेत. तो अधिकार जिल्हाध्यक्ष व जिल्हा प्रमुखांचा आहे, अशा शब्दात राजन तेलींनी मनीष दळवींना सुनावलं आहे.

निलेश घायवळची कार जप्त

कुख्यात गुंडे निलेश घायवळची चारचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. ऊसाच्या शेतात लपवून ठेवली होती चारचाकी.अहिल्यानगर मधील जामखेड मध्ये असलेल्या एका गावात ही गाडी लपवून ठेवण्यात आली होती ८०५५ नंबर असलेल्या या गाडीला "BOSS" अशी नंबर प्लेट होती.पुणे पोलिसांनी थेट जामखेड मधील खर्डा गावात जाऊन केली कारवाई

महिला डाॅक्टरची आत्महत्या, पोलिस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याची सुसाईड नोट

सातारा उपजिल्हा रुग्णालयातील महिला डाॅक्टर संपदा मुंडे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर महिला डाॅक्टरने सुसाईड नोट लिहिली आहे. यामध्ये पोलिस निरीक्षक गोपाळ बदने यांनी माझ्यावर ४ वेळा बलात्कार केला. तर, पोलीस प्रशांत बनकर यांनी माझा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले आहे.

इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामांतरलाला मंजुरी

राज्य सरकारने इस्लामपूर शहराचे नाव ईश्वरपूर केले होते. या नामांतराला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे.

पत्नीने केली पतीची हत्या

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची पत्नीने ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नकुल भोईर असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव असून त्याची पत्नी चैताली भोईर हिला पोलिसांनी अटक केली आहे. काल मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली.

वंचित आज काढणार आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबादमध्ये आरएसएस (RSS) च्या कार्यालयावर आज जनआक्रोश मोर्चा काढणार आहे. या जन आक्रोश मोर्च्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी राज्य कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. तसेच औरंगाबाद शहरातील फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारा मानणारे वेगवेगळ्या पक्ष, संघटनेतील नेते, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. क्रांती चौकातून सकाळी 11 वा. या मोर्च्याला सुरुवात होईल. आरएसएस कार्यालय, बाबा पेट्रोलपंप इथपर्यंत हा मोर्चा असेल.

Prakash Ambedkar : दलित तरुणाला अमानुष मारहाण; प्रकाश आंबेडकरांची ‘मकोका’ लावण्याची मागणी

अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई येथे मातंग समाजातील संजय वैरागर या तरुणाला गावातील काही गुंडांनी अमानुषपणे मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत पीडित तरुणाचे हात-पाय मोडले असून, त्याचा एक डोळा निकामी झाला आहे. आरोपींनी क्रूरतेची हद्द ओलांडत पीडित तरुणाच्या शरीरावर लघुशंका करून त्याला अज्ञातस्थळी फेकून दिले. या घृणास्पद घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणातील आरोपींवर ‘मकोका’ कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Kurnool Bus Fire : आंध्र प्रदेशात बसला आग, 11 जणांचा होरपळून मृत्यू

आंध्र प्रदेशमधील कुर्नूल या ठिकाणी मोठी भीषण दुर्घटना घडली आहे. एक बाईक व्होल्वो बसला येऊन धडकल्यामुळे बसने अचानक पेट घेतला आणि या आगीत जवळपास 11 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून बस पूर्णपणे जळून खाक झाल्यामुळे प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. त्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. तर ही बस हैदराबादवरून बंगळुरूकडे जात होती.

संघाच्या कार्यालयावर वंचितचा मोर्चा धडकण्यापूर्वी पोलिसांकडून कार्यकर्त्यांना नोटीस

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगर शहरातील आरएसएसच्या मुख्य कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे .मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असून पोलिसांनी रात्रीपासून वंचितच्या कार्यकर्त्यांना नोटीस दिल्या जात आहेत. मोर्चाला परवानगी नसताना मोर्चा काढल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधितांना दोषी धरण्यात येईल असं या नोटीसमध्ये लिहिलं आहे.

ऐन दिवाळीत पावसाची हजरी, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

ऐन दिवाळीत गुरूवारी (ता.23) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी दिवाळीच्या उत्साहावर पाणी पडले आहे. अशातच आता हवामान विभागाने राज्यात मुंबई आणि ठाण्यासह 7 जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात गुरुवारपासून शनिवारपर्यंत तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता असून मुंबई, ठाण्यासह दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारपर्यंत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी शुक्रवारीपर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्हा आणि घाट परिसराला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

संभाजीनगर शहरात रात्री जोरदार पाऊस

छत्रपती संभाजीनगर शहरात रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. ग्रामीण भागात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com