Maharashtra Politics Update : मुंबईतील मोर्चा फॅशन स्ट्रीटपासून निघणार; काँग्रेसचे सर्वच नेते उपस्थित राहणार

Maharashtra Politics Breaking Live Marathi Headlines Updates : बच्चू कडू आज मुंबईत येऊ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार. कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद करणार कडूंचा इशारा, यासह 30 ऑक्टोबर 2025 रोजीच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया.
Maharashtra Political Live updates
Maharashtra Political Live updatesSarkarnama

MVA Meeting : शांततेत मोर्चा काढला जाणार

निवडणूक आयोगाच्या गैरकारभारा विरोधात व बोगस मतदार उघडकीस आणल्यानंतर आता मत चोरीच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी, मनसेचे नेते एकवटले आहेत. निवडणूक आयोगाचा गैरकारभार चव्हाटयावर आणण्यासाठी १ नोव्हेंबरला मुंबईत ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाच्या रणनीतीसाठी तयारी सुरु आहे. त्यासाठी गुरुवारी दुपारी बैठक पार पडली. या बैठकीनंतर माविआच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नेते सचिन सावंत उपस्तिथ होते.

पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मदाय आयुक्तांचे आदेश 

जैन बोर्डिंग आणि गोखले बिल्डर यांच्यातील जमीन व्यवहार रद्द. धर्मदाय आयुक्तांनी जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. गोखले बिल्डरला २३० कोटी सिव्हिल कोर्टोच्या आदेशाने परत मिळणार.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, ई- पीक पाहणीसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ 

राज्यातील शेतकऱ्यासाठी दिलासादायक बातमी, राज्यात 100% ई- पीक पाहणीसाठी 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ जाहीर, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश.

डॉक्टर आत्महत्या प्रकरणावर ग्रामस्थांचा संताप! कवडगावच्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; सुषमा अंधारे आंदोलनस्थळी दाखल

फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात एसटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. मात्र, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी कवडगाव येथील पाण्याच्या टाकीवर जाऊन आंदोलन पुकारले आहे. तात्काळ एस आय टी स्थापना करण्यात यावी नाही तर आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचा पण यावेळी आंदोलकांनी घेतला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आंदोलनस्थळी दाखल झाल्या आहेत.

Manoj Jarange Patil : बच्चू कडूंच्या आंदोलन मनोज जरांगेंचा सरकारला दिला इशारा

कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या महाऐल्गार आंदोलनाला आता मनोज जरांगे पाटील यांनीही पाठिंबा दिला आहे. मराठा आणि शेतकरी प्रश्नांवर लढा देणारे दोन्ही नेते आता एकाच मंचावर आले आहेत. जरांगेंच्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला आणखी बळ मिळालं आहे.

Bacchu Kadu : कर्जमाफीसाठी मरायलाही तयार : बच्चू कडू

कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचे सुरु असलेले आंदोलन आता निर्णायक टप्प्यात पोहोचलं आहे. कर्जमाफीसाठी मरायलाही तयार आहोत अशी तयारी दाखवत इशारा बच्चू कडूंनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Beed Protest : फलटणमध्ये ग्रामस्थांचे टाकीवर चढून आंदोलन

फलटण इथं डॉक्टर महिलेच्या मूळ गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव इथं हे आंदोलन सुरु आहे. ग्रामस्थांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत गावातील पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन सुरू केलं आहे. आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत असून या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी करत आहेत.

Nashik : नाशिकमध्ये गुंडांची दहशत, दुकानावर कोयत्याने हल्ला 

नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत वाढली आहे. कराड बंधूंच्या चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांनी कोयता आणि दगडाने हल्ला केला. सुदैवाने कोणी जखमी झाले नाही, मात्र दुकानाचे नुकसान झाले आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा नाशिक पोलीस कसून तपास करत आहेत.

एमडी ड्रग्स विकणाऱ्या पुण्यातील तस्कराला सोलापुरात अटक

एमडी ड्रग्स विकणाऱ्या पुण्यातील तस्कराला सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक लाख रुपये किमतीचे 32 ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. मोहम्मद अझर हैदरसाहब कुरेशी असं अटक केलेल्या तस्कराचं नाव आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला देखील लागले असून लवकरच निवडणुकींच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. पाच ते सात वर्षांपासून या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुकीला आता मुहूर्त मिळाला आहे. अशामध्येच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम लवकरच वाजणार आहे. ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत निघणार आहे.

अजित पवार यांची बनावट स्वाक्षरी...

बीडमध्ये अजित पवार यांच्या बनावट स्वाक्षरीचे पत्र आढळले आहे, बीड पोलिस याचा तपास करीत आहे.

नवी मुंबईत आज माथाडी कामगारांचा मेळावा

नवी मुंबईत माथाडी कामगारांचा आज मेळावा आहे. नवी मुंबई शहरामध्ये माथाडी कामगारांचा मेळावा व पश्चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईकरांच्या रहिवाशांचा संवादाचा आयोजन महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे. आगामी काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

Pune Jain Boarding : पुण्यातील जैन बोर्डिंग व्यवहारावर प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी

पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमीन व्यवहार प्रकरणी आज धर्मादायुक्तांकडे सुनावणी पार पडणार आहे. ट्रस्टच्या नावावर जागा झाली नाही तर, एक तारखेपासून जैन मुनींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. धर्मादाय आयुक्तांनी मागील सुनावणीत ट्रस्ट आणि बिल्डर गोखले यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा सूचना दिल्या होत्या.

बच्चू कडू आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करणार

सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी या मागणीसाठी बच्चू कडूंनी आंदोलन सुरू केलं असून अखेर ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत येण्यास तयार झाले आहेत. आंदोलन सुरू ठेवूनच ते मुंबईत चर्चेसाठी आज जाणार आहेत. शिवाय कर्जमाफीची तारीख न दिल्यास रेल्वे बंद करणार असा इशारा कडूंनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com