बदनापूर नगर पंचायतीत शतप्रतिशत सत्ता; नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष दोन्ही भाजपचेच

नुकत्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपने बहुमतासह सत्ता मिळवली होती. राष्ट्रवादी दुसऱ्या तर काॅंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली. शिवसेनेला मात्र इथे खातेही उघडता आले नव्हते. (Bjp, jalna)
Mla Narayan Kuche-Mayor Mangal Bargaje
Mla Narayan Kuche-Mayor Mangal BargajeSarkarnama
Published on
Updated on

बदनापूर : बदनापूर नगर पंचायत अध्यक्ष पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. ,या निवडणुकीत भाजपच्या मंगल जगन्नाथ बारगजे यांची निवड करण्यात आली. (Mla Narayan Kuche) पंचायत निवडणुकीत भाजप-९ ,काँग्रेस-१ राष्ट्रवादी-०५ व अपक्ष २ असे बलाबल होते. बदनापूर (Jalna) नगरपंचायत नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून मंगल बारगजे आणि राष्ट्रवादीकडून नसीमाबी शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. (Bjp)

निवड प्रक्रिया पार पडली तेव्हा भाजपच्या मंगल बारगजे यांना त्यांच्या पक्षाच्या ९ व २ अपक्ष सदस्यांचाही पाठिंबा मिळाल्याने त्या ११ मतांनी विजयी झाल्या. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांची नगराध्यक्षदी निवड जाहीर करताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ व काँग्रेसचा एक सदस्य गैरहजर राहिला. त्यामुळे बारगजे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला.

उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून समीर शेख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या विरोधात कुणीच अर्ज दाखल न केल्याने त्यांची उपनगराध्य पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. भाजपचे आमदार नारायण कुचे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सर्व सदस्यांचे अभिनंदन केले.

Mla Narayan Kuche-Mayor Mangal Bargaje
गरीब मराठा समाजासाठी पुढाकार घ्या ; संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नुकत्यात झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपने बहुमतासह सत्ता मिळवली होती. राष्ट्रवादी दुसऱ्या तर काॅंग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिली. शिवसेनेला मात्र इथे खातेही उघडता आले नव्हते. आमदार नारायण कुचे यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष दोन्ही पद भाजपकडे घेत विरोधकांना चांगलाच दणका दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com