सेलूच्या नगराध्यक्षासह राष्ट्रवादीचे २० नगरसेवक काॅंग्रेसमध्ये ; मालेगावातील फोडाफोडीची परतफेड

मला खात्री आहे या पक्ष प्रवेशामुळे जिंतूर विधानसभा मतदार संघ आणि किनवट मधील मतदार संघात काँग्रेसला बळ मिळणार आहे. (Minister Ashok Chavan)
Minister Ashok Chavan
Minister Ashok ChavanSarkarnama

परभणी : गेल्या महिन्यात मालेगाव महापालिकेतील काॅंग्रेसच्या सगळ्या नगरसेवकांना गळा लावत राष्ट्रवादी काॅंग्रेसने त्यांच्या पक्ष प्रवेश करून घेतला होता. (Parbhnai) राज्याच्या सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले तीन्ही पक्ष फोडाफोडी करतांना मात्र कोणताच आघाडी धर्म पाळत नसल्याचे दिसून आले आहे. (Congress) पक्ष वाढीच्या नावाखाली एकमेकांचे नगरसेवक, सदस्य, पदाधिकारी फोडण्याची जणू स्पर्धाच या सत्तेतील पक्षामंध्ये लागल्याचे दिसते. (Ashok Chavan)

मालेगाव महापालिकेत राष्ट्रवादीने काॅंग्रेसचा करेक्ट कार्यक्रम केला. काॅंग्रेसचे सगळेच नगरसेवक पळवले. त्यानंतर महिभाभरातच काॅंग्रेसने या फोडाफोडीची परतफेड जशीच्या तशी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात केली. (Marathwada) सेलू नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षासह २० नगरसेवकांनी आज काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, आमदार सुरेश वरपूडकर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. सेलूच नाही तर जिंतूर तालुक्यातील राष्ट्रवादी, भाजप व काही अपक्ष नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांनी देखील काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, काॅंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीत प्रवेश करत आहेत. मालेगाव महापालिकेतील काॅंग्रेसच्या सगळ्याच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने काॅंग्रेसला मोठा धक्का बसला होता. संधीच्या शोधात असलेल्या काॅंग्रेसला अखेर परभणी जिल्ह्यात ती मिळाली.

सेलू, जिंतूर तालुक्यातील काॅंग्रेस व भाजपच्या नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले, पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विरोधक काॅंग्रेसवर तुटून पडले आहेत. याचाच अर्थ काॅंग्रेस या पाचही राज्यात चांगल काम करते आहे. त्यामुळे लक्ष विचलित न होऊ देता आपल्याला काम करावं लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुद्यावरून काॅंग्रेस व महाराष्ट्रावर टीका केली असली तरी या महामारीच्या काळात महाराष्ट्राने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे भविष्यात आपल्या पक्षाची वाटचाल देखील चांगलीच राहणार आहे, त्यामुळे ज्यांनी आज पक्षात प्रवेश केला त्या सर्वांचे मी मनापासन अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. मला खात्री आहे या पक्ष प्रवेशामुळे जिंतूर विधानसभा मतदार संघ आणि किनवट मधील मतदार संघात काँग्रेसला बळ मिळणार आहे.

Minister Ashok Chavan
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे थेट मणीपूरमध्ये प्रचाराला

विनोद बोराडे बंधूनी ही नगरपालिका एकहाती काँग्रेसच्या हाती ठेवली, संयम सोडला नाही. अडळकरांचाही यामध्ये सहभाग होता. सेलू भागात या निमित्ताने चांगले काम होईल, अशी मला खात्री आहे. जिंतूरमध्ये अडचणी आहेत, मात्र नांगरे यांचा प्रवेश झाला असल्याने मेहनत घेऊन काम करा, आव्हानात्मक परिस्थिती आहे, त्यामुळे सक्षम माणसं आज पक्षात घेतल्याने नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास देखील चव्हाण यांनी व्यक्त केला.

जिंतूरच्या विकासकामांसाठी ८० कोटी मंजूर केले आहेत, सेलूला ५० कोटी मंजूर करणार असल्याचेही चव्हाण यांनी यावेळी सांगितले.राज्यातील सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे, पण न घाबरता लोकांची कामे करत राहा. महामंडळावरील नियुक्त्या करतांना पक्षासाठी काम करणाऱ्यांनाच प्राधान्य देणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com