30-30 Scam News : कोट्यावधींचा घोटाळा, पण आरोपी राठोडच कंगाल..

Santosh Rathod: संतोष राठोडच्या विविध बँक खात्यात कोणतीही रक्कमही नाही. खरेदी केलेल्या गाड्याही विकून टाकल्या होत्या.
Santosh Rathod News, Aurangabad
Santosh Rathod News, AurangabadSarkarnama

Aurangabad News: दोन वर्षापुर्वी उघडकीस आलेल्या तीस-तीस घोटाळ्यात नव्याने मिळालेल्या डायरीत आणखी काही नावांचा उल्लेख आढळून आला. त्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचेही नाव आल्याने या प्रकरणाची नव्याने चर्चा होवू लागली आहे. नेमका हा तीस-तीस घोटाळा (Scam) काय आहे? हे देखील यानिमित्ताने पुन्हा समोर आले.

Santosh Rathod News, Aurangabad
Ambadas Danve News: तीस-तीस घोटाळ्यात दानवेंचे नाव ; पण ते म्हणतात, तो मी नव्हे..

डीएमआयसीमध्ये पाचपट भावाने जमीनी गेलेल्या शेतकऱ्यांसह, राजकारणी, सरकारी अधिकारी, आमदार, उद्योजक अशा सगळ्यांनाच तीस-तीस घोटाळ्याचा मास्टर माईंड असलेल्या संतोष राठोडने भुरळ घातली होती. (Aurangabad) कोट्यावधींचा घोटाळा, महागड्या गाड्या, ३० टक्के परतावा, असा तामझाम दाखवणारा राठोड प्रत्यक्षात जेव्हा पोलिसांनी अटक केली, तेव्हा कंगाल असल्याचे समोर आले होते. (Marathwada)

त्यांच्या बॅंक खात्यात खडखडाट होता, त्याच्या नावावर कुठेही संपत्ती नव्हती. त्यामुळे गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये गेले कुठे? असा सवाल उपस्थितीत केला जात आहे. मराठवाड्यातील गरीब शेतकऱ्यांकडून कोट्यवधींची लूट करणारा 30-30 घोटाळ्यातील आरोपी संतोष ऊर्फ सचिन राठोड याच्यासह ६ जणांविरोधात न्यायालयात तब्बल ५०० पानांचे आरोपपत्र ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केले होते.

पोलीस चौकशीत आरोपीच्या नावावर कोणतीही संपत्ती नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोट्यवधींचा घोटाळेबाज कंगाल असल्याने ज्या गरीब शेतकऱ्यांची लूट केली, त्या शेतकऱ्यांना पैसे मिळणे कठीण झाले. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात २१ जानेवारी रोजी 30-30 घोटाळ्याचा मुख्य आरोपी संतोष राठोड याच्यासह कृष्णा राठोड आणि पंकज चव्हाण यांच्या विरोधात दौलत राठोड यांच्या तक्रारीवरून फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल होताच, मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या, त्याच्या घर झडतीत सापडलेल्या डायरीत 300 जणांनी कोट्यवधीची गुंतवणूक केल्याच्या नोंदी सापडल्या होत्या. त्याशिवाय नाशिक, कोलकाता येथे संपत्ती जमा केल्याचीही चर्चा होती. मात्र, अधिकृतपणे कोठेही गुंतवणूक केली नसल्याचे आढळले, तसेच त्याच्या नावावर कोठेही संपत्ती आढळली नाही.

Santosh Rathod News, Aurangabad
Jalna Political : माझ्या जावयावरचे आरोप खोटे, गोरंट्याल यांचीच चौकशी करा..

संतोष राठोडच्या विविध बँक खात्यात कोणतीही रक्कमही नाही. आरोपीने खरेदी केलेल्या गाड्याही गुन्हा दाखल होण्यापूर्वीच विकून टाकल्या होत्या. त्यामुळे आता गुंतवणूकदार शेतकऱ्यांना पैसे मिळणे कठीण होऊन बसले. त्यामुळे कोट्यवधीची लूट करून त्यांनी पैसे कुणाला दिले, असा प्रश्न उपस्थित केला गेला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com