30-30 Scam News : राठोडला मोबाईलवरून नातेवाईकाशी बोलणे महागात पडले, चौकशी सुरू...

Scams : साडेतीनशे कोटींच्या तीस-तीस घोटाळ्याचा राठोड हा मुख्यसुत्रधार आहे.
Thirty-Thirty Scam News, Aurangabad
Thirty-Thirty Scam News, AurangabadSarkarnama

Aurangabad : दोन वर्षांपुर्वी गाजलेल्या जिल्ह्यातील तीस-तीस घोटाळ्याचा मुख्य सुत्रधार संतोष राठोड याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेल्या संतोष राठोड (Santosh Ratohd) याने न्यायालयात जात असतांना आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीला फोन केला होता. त्या फोनवरील संभाषण व्हायरल झाल्यामुळे संतोष राठोडकडे फोन कसा आला? याबद्दल प्रश्न उपस्थीत केला जात होता.

Thirty-Thirty Scam News, Aurangabad
Chhagan Bhujbal; `ओबीसी`चे हक्क नाकारणाऱ्यांविरोधात एकत्रित लढा!

तसेच या संभाषणाची आणि राठोडला फोन कुणी पुरवला याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. (Scam) त्यानूसार राठोड आणि त्या व्यक्तीमध्ये झालेले संभाषण व मोबाईल कुणी पुरवला याची चौकशी तुरुंग प्रशासन तसचे शहर पोलिसांनी सुरू केली आहे. (Aurangabad) राठोड याने ज्या व्यक्तीला फोन केला होता, त्याला आपल्याला लवकरच जामीन मिळणार आहे, आणि या प्रकरणाची ईडी चौकशी करणे ही काही साधी गोष्ट नसल्याचे म्हटले होते.

हे संभाषण सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर हर्सूल जेल प्रशासनाने संतोष राठोड फोन संभाषण प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना संतोष राठोडने फोनवरून संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. राठोड सध्या हर्सुल कारागृहात आहे.

दरम्यान, याचप्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने या सर्व प्रकरणाची माहिती मागवली होती. ईडीने माहिती मागवल्यानंतर न्यायालयीन कोठडीत असलेला संतोष राठोड याने आपल्या नातेवाईकांशी फोनवरून संपर्क साधला होता. राठोडला न्यायालयात नेण्याची जबाबदारी असलेले शहर पोलिस देखील या व्हायरल आॅडिओ संभाषणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी देखील या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. साडेतीनशे कोटींच्या तीस-तीस घोटाळ्याचा राठोड हा मुख्यसुत्रधार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com