जाळपोळ-दगडफेक प्रकरणी नांदेडात ५० जणांना अटक; रजा अकादमीच्या सदस्यांवरही गुन्हे

(Nanded Police Fir Filed Against Protester) नांदेडमध्ये दगडफेकीच्या घटनेतील चारशे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी ८३ आरोपींची ओळख पटली आहे, पोलिसांनी यातील ५० आरोपींना अटक केली
Nanded Band
Nanded BandSarkarnama
Published on
Updated on

नांदेड ः उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील कथित मशीद जाळल्या प्रकरणी नांदेडात रजा अकादमीकडून पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान हिंसा भडकली होती. रस्त्यावर उतरलेल्या हजारोंच्या जमावाने, वाहने, दुकाने यांच्यावर दगडफेक करत जाळपोळ देखील केली होती. दंगेखोरांनी पोलिसांवरही दगडफेक केली होती. अखेर या प्रकरणी पोलिसांनी ५० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली आहे. तर बंदचे आवाहन करणाऱ्या रजा अकादमीच्या काही सदस्यांवर देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अतिरिक्त पोलिस महासंचालक संजय कुमार यांनी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली. ३० आॅक्टोबर रोजीच्या उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील एका घटनेचा दाखला देत त्याचा निषेध म्हणून महाराष्ट्रात रझा अकादमीसह काही मुस्लिम संघटनांनी बंदची हाक दिली होती. परंतु या बंद दरम्यान, राज्यातील नांदेड, अमरावती, मालेगांव शहरात प्रचंड हिंसाचार उसळला.

हजारोंचा जमाव रस्त्यावर उतरून दिसेल ती वाहने, दुकाने फोडत होता. दगडफेक आणि जाळपोळीमुळे संपुर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अमरावतीत या हिंसाचाराचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमेटले. हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनीही प्रत्युत्तर म्हणून जाळपोळ, दगडफेक केली. त्यामुळे अमरावती शहरात अजूनही संचारबंदी कायम आहे.

पंरतु पोलिसांनी आता बंद दरम्यान हिंसा घडवणाऱ्यांच्या मुसक्या आवळणे सुरू केले आहे. नांदेडमध्ये दगडफेकीच्या घटनेतील चारशे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैकी ८३ आरोपींची ओळख पटली आहे, पोलिसांनी यातील ५० आरोपींना अटक केली असून रजा अकादमीच्या आयोजकावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. व्यासपीठावरुन प्रक्षोभक भाषण करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी सांगितले.

दगडफेकीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून देखील बंदचे आवाहन करण्यात आले होते. परंतु हा बंद आता रद्द करण्यात आला आला असला तरी पोलिसांनी सतर्कता बाळगत बंदोबस्त वाढवला आहे. दंगेखोर उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक तयार करण्यात आल्याचेही संजय कुमार यांनी सांगितले. नांदेडमधील दगडफेक प्रकरण आणि आजच्या बंदचा आढावा घेण्यासाठी संजय कुमार नांदेड मध्ये आले होते.

Nanded Band
वक्फ मंडळाच्या जमिनीची अनधिकृत खरेदी-विक्री; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com