Fir Filed Against Bjp Mla T.Raja Singh in Nanded News
Fir Filed Against Bjp Mla T.Raja Singh in Nanded NewsSarkarnama

Nanded : हैदराबादमधील भाजप आमदार राजासिंह ठाकूर यांच्या विरोधात नांदेडमध्ये गुन्हा दाखल

सय्यद मोईन यांनी दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात आज त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Aimim)
Published on

नांदेड : हैदराबादमधील गोशमहल मतदारसंघाचे भाजप आमदार ठाकूर राजासिंह यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी नांदेडच्या (Nanded) इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजमेर येथील दर्ग्यातील धर्मगुरुंबद्दल राजासिंह यांनी अपशब्द वापरल्याची तक्रार एमआयएमच्या (Aimim) वतीने इतवारा पोलिसांकडे करण्यात आली होती. यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

सध्या देशात भाजपच्या (Bjp) प्रवक्त्यांकडून मुस्लीम धर्मगुरूंबद्दल अपशब्द काढल्याबद्दल संतापाचे वातावरण आहे. एवढेच नाही तर याचे पडसाद देशाबाहेर आखाती राष्टांमध्ये देखील उमटले असून तिथे भारतीय वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. कतारमध्ये भारताचे उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू यांना देखील विरोधाचा सामना करावा लागला.

त्यानंतर भाजपने त्या वादग्रस्त प्रवक्त्यांचे पक्षातून निलंबन केले. यावरून वाद सुरू असतांनाच आता नांदेडमध्ये हैदराबादमधील भाजपचे आमदारा राजासिहं ठाकूर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या भाषणात अजमेर दर्ग्याच्या धर्मगुरूंबद्दल अपशब्द काढल्याची तक्रार एमआयएमचे स्थानिक नेते सय्यद मोईन यांनी इतवारा पोलिसा ठाण्यात दिली होती.

आमदार राजासिंह ठाकूर हे आक्रमक भाषणासाठी ओळखले जातात. विशेषत: एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवेसी, अकबरुद्दीन ओवेसी या दोन बंधुंना ते जशास तसे उत्तर देतात म्हणून देशभरात प्रसिद्ध आहेत.

Fir Filed Against Bjp Mla T.Raja Singh in Nanded News
Asaduddin Owaisi : मुस्लिमांचे पुर्वज हिंदू होते, तर मग भागवतांचे पुर्वज बुद्धिस्ट होते का ?

सय्यद मोईन यांनी दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलिस ठाण्यात आज त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईच्या मागणीसाठी एमआयएमचे एक शिष्टमंडळ आज इतवारा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांना भेटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com