Farmers News : कृषीमंत्री सत्तारांच्या मतदारसंघात शेतकरी दाम्पत्याने जीवन संपवले..

Marathawada : सोयगाव तालुक्यातील या दाम्पत्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.
Farmers Suicide News
Farmers Suicide NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : अवकाळी, गारपीट, पिकांचे प्रचंड नुकसान अशा दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी खचत चालला आहे. कुठूनच दिलासा मिळत नाही म्हटल्यावर तो मृत्यूला जवळ करत आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या जिल्ह्यात आणि मतदारसंघात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे.

Farmers Suicide News
Gangapur Sugar Factory : गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर गंगापूर कारखान्यात पूजा, लवकरच होणार सुरू..

आता पुन्हा त्यांच्या मतदारसंघातील सोयगाव येथील एका (Affected Farmers)शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Marathwada) शेतामध्ये गेलेल्या पतीने गळफास लावून घेतला, तर त्याच्या पत्नीने विष प्राशन करून जीवन संपवल्याचे समोर आले आहे.

संदीप आळेकर, लताबाई आळेकर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकरी दांपत्याचे नाव आहे. सोयगाव तालुक्यातील महालब्दा गावातील हे दाम्पत्य असल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात आतापर्यंत ७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

सोयगाव तालुक्यातील या दाम्पत्याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी या शेतकरी दांपत्याचा मृतदेह घाटीत शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. मात्र या शेतकरी दांपत्यानेआत्महत्या सारखं टोकाचे पाऊल का उचलले याबाबत कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेने परिसरात मात्र खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com