Sharad Pawar's Friendship: मैत्री जपणारा नेता, मित्र आजारी असल्याचे समजताच पवारांची हाॅस्पीटलमध्ये धाव..

NCP Leader Sharad Pawar Meets Friend In Hospital : बोराडे यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्यानंतर पवारांनी समाधान व्यक्त केले.
Sharad Pawar News
Sharad Pawar News Sarkarnama

Marathwada : राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार तथा माजी मुख्यमंत्री शरद पवार हे मैत्री जपणारे नेते म्हणून ओळखले जातात. ५० वर्षाहून अधिकच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक मित्र बनवले. अगदी विरोधी पक्षात देखील त्यांना मानणारे अनेक नेते आहेत. शरद पवारांच्या राजकीय कारकीर्दीत मराठवाड्याचे देखील योगदान आहे.

Sharad Pawar News
Sharad Pawar On Communal riots : राज्यात धार्मिक दंगली घडत नाहीत, घडवल्या जातात; पवारांचा रोख कुणाकडे?

या भागात देखील त्यांचे अनेक जुने मित्र आहेत, त्यापैकीच एक म्हणजे महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त तथा ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रतापराव बोराडे. (Marathwada) मराठवाडा किंवा छत्रपती संभाजीनगरचा दौरा असला की शरद पवार (Sharad Pawar) आणि या जुन्या सहकाऱ्यांची भेट, गप्पा ठरलेल्या असायच्या.

शरद पवार कालपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी प्रतापराव बोराडे यांच्याबद्दल चौकशी केली, तेव्हा ते आजारी असून एमजीएममध्ये उपचार घेत असल्याचे कळाले.(Ncp) तेव्हा ताबडतोब पवारांनी त्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आणि हाॅस्पीटलमध्ये धाव घेतली. बेडवर पडून उपचार घेत असलेल्या बोराडे यांच्याकडे पाहून पवार हळहळले.

त्यांनी बोराडे यांच्या प्रकृतीची अस्वथेवाईकपणे चौकशी केली. एवढेच नाही तर त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वरिष्ठ डाॅक्टरांशी देखील त्यांच्या प्रकृतीत होत असणाऱ्या सुधारणा, उपचारांना प्रतिसाद यांचीही चौकशी केली. बोराडे यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याचे डाॅक्टरांनी सांगितल्यानंतर पवारांनी समाधान व्यक्त केले.

आपल्या या आजारी मित्राच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याबद्दल समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया पवारांनी दिली. महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य प्रताप बोराडे हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे एमजीएम रुग्णालयात दाखल असल्याचे समजताच आज रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असलेली पाहून समाधान वाटल्याचे पवारांनी फेसबुक पोस्ट करून म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com