खुर्चीखाली फटाके फोडण्याचा इशारा, अन् बांधकाम विभाग लागला कामाला

(Maharashtra Navnirman Sena) जिल्हाप्रमुख दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व इतर अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले होते.
Suhash Dashrathe Mns Aurangabad
Suhash Dashrathe Mns AurangabadSarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद ः शहरातील व्हिआयपी रोड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच किलोमीटरच्या रस्त्यावर दोन हजार खड्डे असल्याचा आरोप करत मनसेने दहा दिवसांपुर्वी आंदोलन केले होते. रस्त्यातील खड्ड्यांवर जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकारी आणि कंत्राटदाराच्या नावाने श्राद्ध देखील घालण्यात आले. त्यानंतर पुन्हा मनसेने बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवले नाही, तर तुमच्या खुर्ची खाली फटाके फोडू असा इशारा दिला होता.

त्यानंतर अखेर बांधकाम विभाग कामाला लागला असून व्हिआयपी रोडवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मनसेच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली असली तरी जोपर्यंत रस्त्ता गुळगुळीत होत नाही, तोपर्यंत मनसे शांत बसणार नाही, अशा इशारा देखील मनसे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी दिला आहे.

रस्त्यातील खड्ड्यांची दुरावस्था पाहून मनसेने रस्ते विभागाच्या अधिकारी आणि कंत्राटारांच्या नावाने श्राद्ध घालत या विषयाकडे लक्ष वेधले होते. एवढेच नाही तर दहा दिवसांत काम सुरू केले नाही, तर याच खड्ड्यांमध्ये अधिकाऱ्यांना आणून बसवू, असा दम देखील मनसेने भरला होता.

दहा दिवसांचा अल्टीमेटम संपण्या आधीत जिल्हाप्रमुख दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व इतर अधिकाऱ्यांना भेटून निवेदन दिले होते.

यात पुन्हा आठ दिवसांची मुदत व्हिआयपी रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी दिली होती. अन्यथा अधिकाऱ्यांच्या खुर्चीखाली फटाके फोडण्याचा इशाराही दिला होता. मनसेच्या या आंदोलनाचा धसका घेत अखेर बांधकाम विभागाने या रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेतले.

Suhash Dashrathe Mns Aurangabad
देगलूर-बिलोलीचे नेतृत्व करणाऱ्यांना मंत्रीपद, खासदारकी अन् तालिका सभापतीपदही !

याची माहिती मिळताच मनसे जिल्हाध्यक्ष दाशरथे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून रस्ते गुळगुळीत व चकाचक करून देण्याची हमी घेतली. जर असे झाले नाही, तर पुन्हा मनसे रस्त्यावर उतरेल असा, इशारा देखील मनसेने दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com