Raj Thackeray Birthday News : `मराठी माणसाचे आधारकार्ड`, राज ठाकरेंना नवी उपाधी..

MNS : महाराष्ट्राला सक्षम, दूरदृष्टी असणारा आणि महाराष्ट्रासाठी परखड भूमिका घेणारा असा मुख्यमंत्री राज साहेबांच्या रूपाने मिळावा.
Raj Thackeray Birthday News
Raj Thackeray Birthday NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस मनसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. मुंबईत त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसैनिकांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. तर आज राज ठाकरे यांनी प्रत्यक्ष समर्थक आणि चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. (Raj Thackeray Birthday News) वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांना कुणी भावी मुख्यमंत्री म्हणतयं तर कुणी मराठी माणसांचे कैवारी, हिंदूजननायक. राज ठाकरे यांना अनेक उपाधी या निमित्ताने दिल्या जात आहेत.

Raj Thackeray Birthday News
KCR News Marathwada : खरंच केसीआर मराठवाड्यातून लोकसभा लढवणार ?

छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी देखील राज ठाकरे यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. (Raj Thackeray) राज ठाकरे यांचा `मराठी माणसाचे आधारकार्ड`, असा उल्लेख त्यांनी आपल्या शुभेच्छापर पोस्टमध्ये केला आहे. या हटके पोस्टची सर्वत्र चर्चा होत आहे. दरम्यान, (MNS) मनसेच्या वतीने राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सुपारी हनुमान गुलमंडी येथे महाआरती करण्यात आली.

गेल्या १७ वर्षापासून राज ठाकरेंना उदंड आयुष्य लाभो याकरिता ही आरती दरवर्षी करण्यात येते. यावर्षीची आरती खास आहे महाराष्ट्राला सक्षम, दूरदृष्टी असणारा आणि महाराष्ट्रासाठी परखड भूमिका घेणारा असा मुख्यमंत्री राज साहेबांच्या रूपाने मिळावा, अशी प्रार्थना देखील या निमित्ताने देवाकडे करण्यात आली. (Marathwada) जनहित कक्ष आणि विधी विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना छत्रपती संभाजीनगर शाखेच्या वतीने देखील रेणुका माता मंदिर एन-९ सिडको येथे महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी साहेब, जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, जिल्हा सचिव अनिकेत निल्लावार, जिल्हा चिटणीस प्रशांत जोशी, मनसे रस्ते व आस्थापना जिल्हा अध्यक्ष अशोक पवार पाटील, उपशहर अध्यक्ष गणेश साळुंखे पाटील, प्रतीक गायकवाड पाटील, जनहित कक्ष शहर अध्यक्ष अमितसिंग ठाकूर मकरंद पुराणिक, आकाश जाधव विजय वावरे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन जनहित कक्ष जिल्हाध्यक्ष अभय देशपांडे यांनी केले होते.

Edited By : Jagdish Pansare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com