Aam Aadmi Party : केजरीवालांचे लक्ष आता महाराष्ट्रातील या जिल्ह्यांवर ; सगळ्या निवडणूका लढवणार..

Aurangabad : औरंगाबाद महापालिका निवडणूका स्वबळावर लढवण्यासाठी ७६ उमेदवार निश्चित केलेले आहेत.
Aam Aadmi Party News, Aurangabad
Aam Aadmi Party News, AurangabadSarkarnama

Marathwada : दिल्लीत दुसऱ्यांदा, पंजाबमध्ये पहिल्यांदा आणि मोदींच्या गुजरातमध्ये दमदार एन्ट्री करणाऱ्या आम आदमी पक्षाने आपले लक्ष आता महाराष्ट्रातील मोठ्या शहरांवर केंद्रित केले आहे. आगामी काळातील सर्व निवडणुका (Aam Aadmi Party) आप स्वबळावर लढणार असून मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर या शहरांवर त्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

Aam Aadmi Party News, Aurangabad
Pankaja Munde : पंकजा म्हणतात, तिळाची उर्जा आणि गुळाचा गोडवा कायम राहावा..

आम आदमी पार्टी (Arvind Kejriwal) राज्यातील आगामी सर्व निवडणूका स्वबळावर लढणार आहे. यासाठी लवकरच राज्यभर रथयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती पार्टीचे राज्य उपाध्यक्ष माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिली. (Aurangabad)औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना आगमी काळात आपचा महाराष्ट्रातील निवडणुकांकडे पाहण्यचा दृष्टीकोन कसा असणार आहे, याबद्दल सांगितले.

हरिभाऊ राठोड म्हणाले, आम आदमी पार्टी ही लोकांच्या मनातील पार्टी झाली आहे. पंजाब मध्ये सत्ता मिळवल्यानंतर गुजरातमध्ये पाच जागा जिंकल्या असून ८७ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. पार्टीने तब्बल ४७ लाख मते घेऊन राष्ट्रीय पार्टीचा दर्जा मिळवला आहे. विविध पक्षातून पार्टीत येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. प्रत्येक पक्षाला रंग आहे, मात्र आम आदमी पार्टीला विशिष्ट रंग नाही, सर्व लोकांना सोबत घेऊन चालणारी प्रत्येकाच्या मनातील ही पार्टी आहे.

पक्षाने दिल्लीत शिक्षण आणि आरोग्यावर मोठे काम केले आहे. देशाला पुढे जाण्यासाठी शिक्षणाच्या सुविधा प्रत्येकाला मिळाल्या पाहिजे, त्यासाठीच पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत दर्जेदार शिक्षण आरोग्य सुविधा दिल्या आहेत. आगामी काळात महापालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, विधानसभा, लोकसभा अशा सर्वच निवडणूका पक्ष स्वबळावर लढणार आहे.

अन्य पक्ष भ्रष्टाचारी असल्याने कुठल्याही पक्षाशी युती करणार नसल्याची भूमिका केजरीवालांची असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस हा चांगला पक्ष आहे, कॉंग्रेसचे ध्येय धोरणेही चांगली आहेत, मात्र पक्षात तेच ते लोक पुढे येत आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळेच पक्षाला वाईट दिवस आल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपने सर्व यंत्रणा ताब्यात घेऊन राजकारण सुरु केले आहे. संविधानाची मोडतोड करण्याचे काम सुरु आहे.

Aam Aadmi Party News, Aurangabad
Shivsena News : एक पतंग अन् खैरे, दानवे, तनवाणींची ओढाओढी..

एकनाथ शिंदेंच्या सरकारबद्दल आठ दिवसात निर्णय अपेक्षीत असताना तारीख पे तारीख सुरु आहे. न्यायालय आणि निवडणूक आयोग एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी नाही, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची असल्याचे असेही राठोड म्हणाले. औरंगाबाद महापालिका निवडणूका स्वबळावर लढवण्यासाठी ७६ उमेदवार निश्चित केलेले आहेत.

उर्वरित उमेदवारांसाठी आठ दिवसात मुलाखती घेतल्या जाणार आहेत. वार्डावार्डात सदस्य नोंदणी सुरु केलेली आहे. आगामी काळात महाराष्ट्रात मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या शहरांवर अधिक लक्ष आहे. या शहरांमध्ये स्वतः अरविंद केजरीवाल येणार असल्याचे राठोड यांनी सांगीतले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com