Abdul Sattar : लोकल गाडीत बसण्याची इच्छा होती, पण मुख्यमंत्र्यांनी दिली लक्झरी..

राजकारणात गेल्या पस्तीस वर्षांपासून मी आहे. माझ्याकडे गडगंज संपत्ती नसली तरी कोणाच्या ओठात, पोटात आणि बटन दाबणाऱ्याच्या बोटात काय आहे एवढे ओळखण्याची कला अली आहे. (Abdul Sattar)
Minister Abdul Sattar News in Ausa, District Latur
Minister Abdul Sattar News in Ausa, District LaturSarkarnama

औसा : मंत्रीपादाच्या शर्यतीत मागे पडत असल्याने अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपद पदरात पाडून घेण्यासाठी किती आकांड तांडव केला हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. (Abdul Sattar) मात्र कृषी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडताच त्यांनी 'मुख्यमंत्र्यांना मी लोकल गाडीत बसविण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी कृषी मंत्रिपद देऊन लक्झरी गाडीत बसविले' अशी कबुली दिली.

औशाचे आमदार अभिमन्यू पवारांनी (Abhimanyu Pawar) त्यांच्या मतदारसंघात झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी येण्याची विनंती केल्यावर रविवारी (ता.२१) रोजी ते औसा तालुक्यातील सारोळा, जयनगर, कवठा आदी भागातील पिकाची पाहणी केली.(Latur) त्यानंतर पवारांच्या निवासस्थानी सत्तारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या बोलण्यातून कृषिमंत्री पदाची त्यांना लॉटरी लागल्याचे स्पष्ट दिसत होते.

सत्तार म्हणाले की, राज्यात आता शिंदे-फडणवीस सरकार आले असून या सरकारला राज्यासह दिल्लीपर्यंत लाईन क्लियर आहे. एक रिक्षा चालक स्वतःच्या कर्तृत्वावर मुख्यमंत्री पदी विराजमान होतो आणि आम्ही पन्नास लोकं असतांनाही मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रिक्षात आम्हाला सामावून घेतले. पन्नास लोकांना रिक्षात सामावणे ही रिक्षाची कमाल नसून एकनाथ शिंदेयांचे आमच्यावर असलेल्या प्रेमाची कमाल आहे.

राजकारणात गेल्या पस्तीस वर्षांपासून मी आहे. माझ्याकडे गडगंज संपत्ती नसली तरी कोणाच्या ओठात, पोटात आणि बटन दाबणाऱ्याच्या बोटात काय आहे एवढे ओळखण्याची कला अली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना गद्दार म्हणणाऱ्यांनीच पहिल्यांदा भाजप-सेना युती तोडून वेगळा घरोबा करीत भाजपा सोबत गद्दारी केली होती हे लक्षात ठेवावे.

आम्ही भाजपसोबत गेलो हे नवीन काहीही नाही. मूळ सेना-भाजपची नैसर्गिक युतीच आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगत ठाकरे यांचे नाव न घेता सत्तारांनी टोला लागावला. काही कृषी योजना व धोरणात बदल करण्याची गरज असून गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना विम्याच्या नियमात बसवून मदत देण्याचा माझा प्रयत्न राहील. मिळालेल्या संधीचे सोने केल्याशिवाय राहणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Minister Abdul Sattar News in Ausa, District Latur
BMC Election| एकनाथ शिंदे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका

सत्तारांनी आमदार अभिमन्यू पवारांचीही तोंडभरून स्तुती केली. महाराष्ट्राने आधी शरद पवारांची पॉवर पहिली आहे, मात्र आता अभिमन्यू पवारांची पॉवर राज्य पाहत आहे. ते शेतकरी आणि शेती बाबत करीत असलेले काम, त्यांची शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ पाहता पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी काढलेल्या धावा या येणाऱ्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरणार आहेत.

मी मुख्यमंत्र्यांच्या किती जवळचा आणि पवार उपमुख्यमंत्री यांच्या किती जवळचे आहेत हे कोणाला माहिती नाही असे नाही. त्यामुळे त्यांनी केलेल्या सूचना शंभर टक्के अमलात आणणार असल्याचेही सत्तार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com