अब्दुल सत्तारांचा दानवेंना चकवा ; सोयगाववर भगवा फडकविला

काँग्रेस-राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाही.
Abdul Sattar won Soygaon Nagarpanachyat Election
Abdul Sattar won Soygaon Nagarpanachyat Electionsarkarnama
Published on
Updated on

औरंगाबाद : सोयगाव नगरपंचायतीमध्ये (Nagar panchayat Election) राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी १७ पैकी ११ जागा भगवा फडकविला आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला भोपळाही फोडता आलेला नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी या निवडणुकीत पदयात्रा आणि सभा घेतल्या होत्या, परंतु शिवसेनेचे (shivsena) राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना चकवा देत नगरपंचायत वर भगवा फडकवला आहे. (Abdul Sattar won Soygaon Nagarpanachyat Election)

अनेक महत्त्वाच्या राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा या निकालामुळे पणाला लागली आहे. औरंगाबाद येथील सोयगाव नगरपंचायतमुळे ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिष्ठा पणाला लागली होती. सोयगाव नगरपंचायत सत्ता कुणाच्या ताब्यात जाणार याकडे राज्याचे लक्ष होते.

Abdul Sattar won Soygaon Nagarpanachyat Election
कारंजा नगरपंचायतीत भाजपच्या चार उमेदवारांनी मारली बाजी

सत्तार यांच्या विधानसभा आणि दानवे यांच्या लोकसभा मतदारसंघात असलेल्या सोयगाव नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. पहिल्या टप्प्यात २१ डिसेंबर रोजी १३ जागांसाठी तर १८ जानेवारीला ०४ जागांसाठी निवडणूक पार पडली.

कारंजा नगरपंचायतीमध्ये भाजपच्या 4 उमेदवार विजयी झाले आहेत. 1)मंदा खंडारे विजयी 8 मताने, 2)रुखम खंडारे 164 मताने विजयी, 3) रमा दुर्गे 308 मताने विजयी, 4 ) राहुल जोरे 68 मताने विजयी झाले आहेत.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायतीसाठी ( Bodwad Nagar Panchayat election) झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली आहे. एकुण १७ जागासाठी मतदान झाले आहे. यापैकी तीन जागांचे निकाल लागले असून यात राष्ट्रवादीचा दोन, तर शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळविला आहे.

Abdul Sattar won Soygaon Nagarpanachyat Election
बोदवड नगरपंचायत : खडसेंची आघाडी, राष्ट्रवादी दोन, तर शिवसेना एका जागेवर विजयी

राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी अखेर करुन दाखवलं आहे. कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत विरोधकांचा धुरळा उडवला. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी पॅनेलने 10 जागांवर विजय मिळवून एकहाती सत्ता स्थापन केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com